पत्रक
खरिप कर्ज वितरण उद्दिष्ट तत्काळ पूर्ण करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 05/07/2021औरंगाबाद, दि. 2 (जिमाका) – सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ सुरु आहे. कापूस, सोयाबीन,मका आदी पिके शेतकरी घेत आहेत. त्यांना आवश्यक असणारे खरीप पिकाचे कर्ज बँकांनी शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन तत्काळ मंजूर करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप पीक कर्ज वितरण आढावा बैठक श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा उपनिंबधक […]
कोविड नियमावलीच्या अमंलबजावणीसाठी यंत्रणांनी सर्तक राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
प्रकाशित केले: 05/07/2021मंगल कार्यालयांच्या लग्न, समारंभाच्या बुकींगची यादी यंत्रणांनी घ्यावी औरंगाबाद, दि. 2 (जिमाका) – जिल्ह्यातील कोविड-19 चा संसर्ग आटोक्यात येत असून नागरिकांनी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका रोखण्याच्या दृष्टीने कोवीड नियमावलीचे कटाक्षाने पालन करणे बंधनकारक आहे. त्याची प्रभावी अमंलबजावणी होण्यासाठी यंत्रणांनी सर्तक राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत कोवीड उपाय योजना आढावा बैठकीत […]
गट नं. 233 व 234 मधील सनद रद्द : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
प्रकाशित केले: 02/07/2021औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे निर्गमित अकृषिक सनद मधील अट क्र.09 ची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 258 अन्वये जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी चित्तेगाव ग.न.233 व 234 मध्ये औरंगाबाद येथील संजीवकुमार हरकचंद कांकरिया मे. रघुविर कॅपिटल सर्व्हीसेस, सुभाष मानकचंद झांबड व सुशील बलदावा यांचे नावे फेब्रुवारी रोजी […]
जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक जयंती साजरी
प्रकाशित केले: 02/07/2021औरंगाबाद, दि. 1 (जिमाका) – जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, मंदार वैद्य, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, सहायक पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर यांची उपस्थिती होती.
कोवीडमुळे पालक गमावलेल्या पाल्यांच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाहीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
प्रकाशित केले: 29/06/2021औरंगाबाद, दिनांक 29 (जिमाका) : कोविड संसर्गाने आई-वडील यापैंकी एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या पाल्यांना शासन निर्देशानुसार आवश्यक सहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. सुनील चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बाल विकास अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश […]
कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 29/06/2021पर्यटन स्थळे क्षमतेच्या 50 टक्के प्रमाणे खुले राहणार अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद औरंगाबाद दि. 28 (जिमाका): राज्यातील Delta Plus Variant चा संभावित संसर्गाचा धोका लक्षात घेऊन कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे (Levels of Restrictions for Safe Maharashtra) नुसार सर्व जिल्हयांना Level-3 च्या दिलेल्या निर्बधाच्या सुधारित अटी व शर्तीचा अवलंब अनिवार्य […]
मनपाने आपल्या स्तरावर पदभरती प्रक्रिया राबवावी – पालकमंत्री सुभाष देसाई
प्रकाशित केले: 28/06/2021औरंगाबाद, दिनांक 28(जिमाका)- शहर विकासाची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेत पूरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मनपाने आपल्या स्तरावर पदभरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मनपाच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक […]
कोवीडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची क्षमता बांधणी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
प्रकाशित केले: 28/06/2021औरंगाबाद, दिनांक 25 (जिमाका) – जिल्ह्यात कोवीड संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत सर्व यत्रंणा समन्वयपूर्वक चांगले काम करत असून याच पध्दतीने संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी प्रशिक्षित मनुष्यबळ, उपचार सुविधा, साधन सामग्रीसह सज्ज होत जिल्ह्याची क्षमता बांधणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोवीड उपाययोजनांच्या आढावा बैठकीत श्री.चव्हाण बोलत […]
कालबध्दरित्या, वेगात क्रीडा संकुल उभारा – पालकमंत्री सुभाष देसाई
प्रकाशित केले: 28/06/2021चिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन औरंगाबाद, दि.27, (जिमाका) :- मराठवाड्याच्या राजधानीत क्रीडा संकुल साकारण्यात येत आहे ही आनंदाची बाब आहे. या संकुलातून उच्च दर्जाचे गुणवंत खेळाडू निर्माण होतीलच. त्यासाठी प्रशासनाने कालबध्दरित्या, वेगाने क्रीडा संकुलाची निर्मिती करावी, अशा सूचना उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केल्या. शालेय शिक्षण व […]
पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम
प्रकाशित केले: 25/06/2021औरंगाबाद, दिनांक 27 (जिमाका) : औरंगाबाद, दिनांक 27 (जिमाका) : उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई 2 दिवस औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे रविवार, 27 रोजी सायकांळी 05.00 वा.औरंगाबाद येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन (स्थळ:जिल्हा क्रीडा संकुल, चिकलठाणा) औरंगाबाद येथे मुक्काम.सोमवार, 28 रोजी सकाळी 9.45 वा महानगरपालिका संचालित प्रगती पेट्रोलपंपाचे उदघाटन […]