पत्रक
ग्रामीण भागात कोविड चाचणी मोहीम सक्रियपणे राबवावी -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 16/06/2021चाचणी न करता दुकाने सुरू ठेवल्यास दंडात्मक करावाई ग्रामीण लोकसहभाग वाढवावा शंभर टक्के चाचण्या केलेल्यांना गौरान्वीत करावे औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका) – जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बाधीत दर कमी होण्याच्या दृष्टीने कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. त्यादुष्टीने व्यापारी, दुकानदार, ग्रामस्थांच्या सहभागातून यंत्रणांनी चाचणी मोहीम सक्रीयपणे राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित […]
गावातील प्रत्येकजण ‘कलेक्टर मित्र’ !
प्रकाशित केले: 14/06/2021हिरडपुरीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे मार्गदर्शन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन हिरडपुरीत मोठ्याप्रमाणात वाळू साठा जप्त नाथ मंदिर परिसरातील आस्थापनांवर कारवाई औरंगाबाद, दिनांक 13 (जिमाका) : पैठण तालुक्यातील हिरडपुरीतून वाळू चोरी संबंधात अनेक तक्रारी प्राप्त आहेत. यासाठी प्रशासनाकडून योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल. मात्र, या कामात ग्रामस्थांनी दक्ष नागरिकाची भूमिका बजावून प्रशासनास योग्य माहिती देण्यासाठी […]
जिल्हा क्रीडा संकुलाच्या संरक्षक भिंतीचे काम तत्परतेने करावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 11/06/2021औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका) : चिकलठाणा येथील जिल्हा क्रीडा संकुल उभारणीसाठीच्या जागेवर तत्परतेने हद्द खुणा करून संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, आ. हरीभाऊ बागडे, जिल्हा परिषदेचे मुख्य […]
मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम
प्रकाशित केले: 09/06/2021औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका) : मुख्य कार्यकारी अधिकारी, निती आयोग, भारत सरकार (राज्य अतिथी) अमिताभ कांत यांचा औरंगाबाद दौरा पुढील प्रमाणे राहील. शुक्रवार दिनांक 11 जून 2021 रोजी औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व हॉटेल रामा इंटरनॅशनलकडे प्रयाण. रात्री 7.50 वा. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आगमन व मुक्काम. शनिवार दिनांक 12 जून 2021 रोजी सकाळी 9.30 […]
महिलांसाठी घाटीत 40 खाटांचा नवीन वॉर्ड
प्रकाशित केले: 09/06/2021जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील जुन्या वॉर्ड क्रमांक चारचे नूतनीकरण करुन अद्यावत अशा प्रकारच्या 40 ऑक्सिजन असलेल्या खाटांचा स्वतंत्र नवीन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या वॉर्डमधे महिला रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. शिवाय वॉर्डमध्ये सर्व खाटांना ऑक्सिजनची सुविधा देखील आहे. जिल्हाधिकारी सुनील […]
फर्दापुर येथील शिवाजी महाराज स्मारक उभारणी प्रक्रिया गतीमान करावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 09/06/2021औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका) : सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे जाणता राजा शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठीची कामे तत्परतेने पूर्ण करत प्रक्रिया गतिमानतेने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा स्मारक समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी संबंधितांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या आढावा बैठकीत श्री. चव्हाण यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी आ. आंबादास […]
कोविडमुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या पाल्यांना योजनांचा लाभ तत्काळ द्या – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 08/06/2021जिल्हा कृती दलाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना जिल्ह्यातील 339 पाल्यांना महिला व बालविकास विभागाकडून मिळणार मदत विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ औरंगाबाद, दिनांक 08 (जिमाका) : कोविड 19 विषाणूमुळे आई वडिलांपैकी एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांच्या न्याय्य हक्काबरोबरच शासनाच्या योजनांचा लाभ तत्काळ मिळवून द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या. […]
आरटीपीसीआर तपासणी, लसीकरणावर अधिक लक्ष केंद्रित करण्यावर भर – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 07/06/2021स्तर (Level) एक अबाधित ठेवण्याचे नागरिकांना आवाहन व्यापाऱ्यांनी सात दिवसांत चाचणी करून घेणे बंधनकारक ग्रामीण भागात तपासणी नाके कार्यान्वित दर गुरूवारी जिल्हा प्रशासनाचा आढावा औरंगाबाद, दिनांक 07 (जिमाका) – कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू नये. शहराचा स्तर (Level) एक अबाधित रहावा. ग्रामीणचा स्तर (Level) तीनवरून एक करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. निर्बंधातील शिथिलतेमुळे कोरोना रूग्णांची […]
निर्बंधात शिथिलता असली तरी नियमांचे काटेकोर पालन करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 07/06/2021औरंगाबाद जिल्ह्यासाठी निर्बंधातील शिथिलतेच्या मर्यादेबाबत आदेश निर्गमित निर्बंधात शिथिलता असली तरी नियमांचे काटेकोर पालन करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण शहर 1 तर ग्रामीण भाग तिसऱ्या पातळीवर (Level) नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दर शुक्रवारी घेतला जाणार आढावा; संक्रमण वाढताच निर्बंध होणार अधिक कडक धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालय बंद दुकानांमधील कर्मचाऱ्यांच्या RTPCR चाचण्या बंधनकारक औरंगाबाद […]
पर्यावरण संरक्षण जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 07/06/2021गोगाबाबा टेकडी हरीतकरण कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद टेकडीवर 6 हजार वृक्षांची होणार लागवड पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा पर्यावरण संरक्षणाचा संदेश औरंगाबाद, दिनांक 5 (जिमाका) – वसुंधरेच्या रक्षणासाठी वृक्षलागवड आणि त्याचे संरक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये त्यांनी पर्यावरण संरक्षण हा जीवनाचा अविभाज्य भाग […]