पत्रक
जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर मार्फत नवीन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी जाहिरात – 2026
प्रकाशित केले: 14/08/2026जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर मार्फत नवीन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी जाहिरात – 2026
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ध्वजारोहणाच्या शासकीय समारंभाचे थेट प्रक्षेपण
प्रकाशित केले: 17/09/2025*मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ध्वजारोहणाच्या शासकीय समारंभाचे थेट प्रक्षेपण* मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ध्वजारोहणाच्या शासकीय समारंभाचे थेट प्रक्षेपण जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/DIOCSNagar/ या फेसबुक पेजवर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५
प्रकाशित केले: 15/07/2025जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ – अंतिम प्रभाग रचना अधिसूचना (पाहण्यासाठी येथे क्लिक करा..) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ – प्रारुप प्रभाग रचना अधिसूचना (पाहण्यासाठी येथे क्लिक करा..) प्रेस नोट पंचायत समिती सभापती आरक्षण प्रेस नोट जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडत जिल्हा परिषेदतील प्रारूप आरक्षणाबाबत अधिसूचना जिल्हा […]
लंपी स्किन आजाराबाबत सतर्क राहा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 06/09/2022औरंगाबाद, दिनांक 05 (जिमाका) : औरंगाबाद तालुक्यातील तिसगाव, सिल्लोडमधी बाळापूर, सोयगावातील फर्दापूर या ठिकाणी जनवारांमध्ये लंपी स्किन या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे. या रोगाचा प्रार्दुभाव वेगाने पसरू नये, यासाठी पशुपालकांनी घेण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधयक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. लंपी स्किन या रोगात जनावरांना खूप ताप येतो. जनावर चारा, पाणी कमी घेते अथवा घेणे बंद करते, नाका डोळ्यातून चिकट […]
शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य द्यावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 06/09/2022क्षमता बांधणीबाबत प्रशिक्षणाची आवश्यकता उत्पादन वाढविण्यासाठी प्रशिक्षण गटशेती बरोबरच यांत्रिकीकरणावर भर द्यावा औरंगाबाद, दिनांक 05 (जिमाका): मराठवाड्यात मोसंबीची मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जात आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेमध्ये मोसंबी कच्चा मालाच्या स्वरुपात विक्रीसाठी नेण्यापेक्षा मोसंबीवर प्रक्रिया करुन विकल्यास चांगली किंमत (दर) मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र शासन […]
‘आझादी का अमृत महोत्सव’ विविध उपक्रमाने होणार साजरा
प्रकाशित केले: 04/08/20229 ते 15 ऑगस्ट दरम्यान महत्त्वपूर्ण उपक्रम औरंगाबाद, दि. 03 (जिमाका) : देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 75 वर्ष होत आहेत. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी स्वराज्य या सामुहीक राष्ट्रगीत गायन, 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ याबरोबरच सैन्यभरतीची अग्नीवीर सुरवात केली जाणार आहे. या दोन्ही उपक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी […]
जिल्ह्यातील 17 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब अनुदानास पात्र
प्रकाशित केले: 29/07/2022औरंगाबाद, दि. 29 (जिमाका) : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत एकूण 17 प्रकरणे ठेवण्यात आली होती, ती सर्व पात्र ठरवण्यात आली. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी, पोलिस, महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
एचआयव्ही बाधितांचे वयोगटनिहाय सर्वेक्षण करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 29/07/2022औद्योगिक क्षेत्रात बसविणार कंडोम व्हेंडिंग मशीन प्रधानमंत्री आवास योजना, एसटी प्रवास सवलतींचा लाभ द्या औरंगाबाद, दि. 29 (जिमाका) : जिल्ह्यात पाच हजारांच्या जवळपास एचआयव्हीग्रस्त आहेत. त्यांचे वयोगटनिहाय सर्वंकष सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांना केल्या. बाधितांसह त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण समिती व एचआयव्ही, […]
जीवनाच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे योगदान महत्वपूर्ण -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 21/07/2022औरंगाबाद दि. 21 (जिमाका) : प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्पर्धेचे अनन्यसाधारण महत्व आहे. जीवनाच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सुद्धा क्रीडा स्पर्धेचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन आज जिल्हास्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व औरंगाबाद महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी चषक फुटबॉल […]
श्रीक्षेत्र घृष्णेश्वर आराखडा सर्व सुविधायुक्त तयार करावा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 20/07/2022औरंगाबाद, दि. 19 (जिमाका) : घृष्णेश्वर मंदीर भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असून येथे दर्शनासाठी व पर्यटनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. भविष्यकालीन सुविधांच्या अनुषंगाने घृष्णेश्वर आराखडा समितीने सर्व सुविधायुक्त आराखडा तयार करावा, असे घृष्णेश्वर मंदीर प्रारंभिक आराखड्याच्या बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. उपजिल्हाधिकारी संगिता सानप, जिल्हा नियोजन अधिकारी राजेंद्र झुंजारे, जीवन प्राधिकरणाचे अजय […]