नाताळ निमित्त जनतेला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या सूचना
प्रकाशन दिनांक : 24/12/2020
औरंगाबाद, दिनांक 24 (जिमाका): फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 नुसारऔरंगाबाद जिल्हयासाठी ( पोलिस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळुन ) दिनांक 25/12/2020 रोजी साजरा होणा-या नाताळ सणानिमित्त औरंगाबाद जिल्हयातील सर्व जनतेला काय करावे आणि काय करु नये याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित केल्या आहेत.
|
अ.क्र. |
काय करावे |
काय करु नये
|
|
01 |
1. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करावे. |
कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारे शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे उल्लंघन करण्यात येऊ नये.
2. |
|
02 |
3. नाताळ सण यावर्षी साध्या पध्दतीने साजरा करावा. 4. |
सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर मोठया संख्येने एकत्र येऊ नये. |
|
03 |
5. चर्चमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे व त्या ठिकाणी Social Distancing राखले जाईल याची काळजी घ्यावी. 6. |
चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी गर्दी करु नये. |
|
04 |
7. चर्चमध्ये प्रभु येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस टूी अगर काही वस्तू ठेवल्या जातात त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग व स्वच्छतेचे नियम पाळावेत व चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.
8. |
चर्चच्या बाहेर व परीसरात दुकाने/स्टॉल लावण्यात येऊ नयेत.
|
|
05 |
9. चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत (Choir )गाण्यासाठी जास्तीत जास्त 10 गायकांचा समावेश करण्यात यावा व त्यावेळी वेगवेगळया माईकचा वापर करावा. 10. |
गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये. |
|
06 |
11. आयोजकांनी60 वर्षावरील नागरीकांसाठीव 10 वर्षाखालील बालकांसाठी ऑनलाईन प्रार्थनेची (Online Masses)सुविधा उपलब्ध करुन दयावी. |
60 वर्षावरील नागरीकांनी व 10 वर्षाखालील बालकांनी शक्यतो घराबाहेर जाऊ नये. |
|
07 |
12. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोर पालन करण्यात यावे. |
13. फटाक्याची आतषबाजी करण्यात येऊ नये. |
|
08 |
14. 31 डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना (Thanks Giving Mass) ही मध्यरात्री आयोजित न करता संध्याकाळी 7.00 वा.किंवा त्यापुर्वी घेण्याचे नियोजन करण्यात यावे. |
चर्चमध्ये होणारी प्रार्थना ही मध्यरात्री आयोजित करण्यात येऊ नये. |