औरंगाबाद लोकसभा मतदार संघात चार नामनिर्देशन पत्र दाखल

प्रकाशन दिनांक : 01/04/2019
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात चार नामनिर्देशन पत्र दाखल

         औरंगाबाद, दि.०१ (जि.मा.का.) – लोकसभा निवडणुकीसाठी दिनांक ०१ एप्रिल रोजी १९- औरंगाबाद लोकसभा मतदार  संघासाठी  चार नामनिर्देशन दाखल झालेले आहेत. यामध्ये संगीता निर्मळ, शेख नदिम शेख करीम, तर झांबड सुभाष माणकचंद यांनी दोन असे एकूण चार नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी कळविले आहे.                                                 ******