भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
प्रकाशन दिनांक : 18/04/2019
औरंगाबाद, दि.१४ (जि.मा.का.) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, अव्वल कारकुन डी.पी.पेंडलवार, संजय पवार, संतोष राठोड, बालाजी पालेकर, सचिन घुगे, शेख चाँद पाशा आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0000