शहर भागात 37(1)(3) कलम लागू
प्रकाशन दिनांक : 02/09/2020
औरंगाबाद, दि.01 (जिमाका) :- औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या 37 (1) व (3) कलमान्वये औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दिनांक 1 ते 15 सप्टेंबर 2020 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे उप आयुक्त, (मुख्यालय) औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.