शहर भागात 37(1)(3) कलम लागू

प्रकाशन दिनांक : 03/03/2021

औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका): औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र  पोलीस अधिनियम 1951 च्या  37 (1) व (3) कलमान्वये  जिल्ह्याच्या  शहरी हद्दीत दिनांक 14 मार्च 2021 पर्यंत  शस्त्रबंदी आणि जमावबंदी  आदेश  लागू केला आहे, असे डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.