बंद

शासकीय, खाजगी रुग्णालयातील खाटा संनियत्रणासाठी कक्षाची स्थापना

प्रकाशन दिनांक : 11/09/2020

औरंगाबाद,दि. 11 (जिमाका) –जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात खाटा उपलब्ध करणे व त्याचे सनियंत्रण करणे, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना माहिती देणे व त्यासंबंधी माहितीचे संवहन करणे यासाठी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशान्वये अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये प्रशांत चौधरी प्र. उपायुक्त पशुसवर्धन मो. नं. 9011174819, सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी मो.नं 9527707230, गजानन बापूराव जोशी, सहाय्यक आयुक्त विक्रीकर 9850183153, हर्षा देशमुख , जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी मो.नं 8208806227 श्री. योगेश वासुदेवराव नेतनकर, सहायक आयुक्त विक्रीकर 9067779110, श्री. गोपालकृष्ण तुकाराम यादव, सहाय्यक आयुक्त विक्रीकर, 8425843109, मकरंद लक्ष्मणराव कंकाल, सहायक आयुक्त विक्रीकर मो.नं. 7588210924, धनंजय धरमराज कोळी, सहायक आयुक्त विक्रीकर, 9370369275, संदीप भिमराव शेजूळ, सहायक आयुक्त विक्रीकर 8805106979, नितीन भानूदास भोसले, सहायक आयुक्त विक्रीकर, 9923541616 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोना प्रतिबंध/उपचार व रुग्णालय बेड अलोकेशन मॅनेजमेंट संबंधी 24×7 हा नियंत्रण कक्ष कार्यरत असेल. सदर कक्ष नागरिक, रुग्णांचे नातवाईक, कुटुंबीय, परिजन यांचे करीता शासकीय व खाजगी रुग्णालयात कोविड-19 उपचारासंबंधी वैद्यकीय खाटाची उपलब्धता व वाटप इतर पूरक सुविधा संबंधी मदतीचे संवाहन करीता स्थापन करण्यात आला असून सदर अधिकारी यांना त्यांच्या वर नेमून दिलेले कामकाज यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यास मुभा राहील. नेमून दिलेल्या अधिकारी यांनी कर्तव्याच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

औरंगाबाद जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी हे सनियंत्रण अधिकारी म्हणून कार्य करतील व वैद्यकीय अधिकारी श्रीमती प्रेरणा संकलेच्या-बडेरा (मो.नं. 9371715841) व वैद्यकीय अधिकारी आरोग्य म.न.पा औरंगाबाद डॉ. निता पाडळकर ( मो. नं. 9764997041) या वैद्यकीय बाबी संबंधी समन्वय अधिकारी म्हणून भूमिका बजावतील.

उपरोक्त पथकातील सदस्य तथा अधिकारी यांनी जिल्हाधिकारी तथा घटना नियंत्रक (incident commander) यांचे पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये, अथवा रजेवर जाऊ नये, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत कलम 52 व 56 अन्वये सक्त कार्यवाही करण्यात येईल.

उपरोक्त अधिकारी यांचे कर्तव्य बजावण्याचे ठिकाण नियंत्रण कक्ष महानगरपालिका मुख्यालय प्रशासकीय इमारत, टाऊन हॉल जवळ औरंगाबाद शहर हे राहील असे आदेशात नमूद आहे.