शासन आदेशानुसार मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध सुकर जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश जारी
प्रकाशन दिनांक : 16/10/2020
औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका):- कोराना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून औरंगाबाद जिल्ह्यात सुनील चव्हाण, जिल्हादंडाधिकारी, औरंगाबाद यांच्या द्वारे फौजदारी दंड प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) दिनांक 31 ऑक्टोबर 2020 चे 24.00 वाजेपर्यत मनाई आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. तसेच शासन आदेशानुसार मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध सुकर करण्यात आलेले आहेत.
त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व फौजदारी दंड प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी ( पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशान्वये लागू केलेल्या सुधारणा यापुर्वी लागू करण्यात आलेल्या सुधारणासह दिनांक 31 ऑक्टोबर 2020 चे 24.00 वाजेपर्यंत लागू करीत आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्राबाबत पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे आदेश अंमलात राहतील.
कोव्हीड-19 च्या व्यवस्थापनासाठी परिशिष्ठ-1 मध्ये निर्दिष्ठ केलेले राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांचे संपूर्ण औरंगाबाद जिल्हयात अनुपालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. यापूर्वी मान्यता दिलेल्या बाबी/व्यवहार आणि परिशिष्ठ-2 मध्ये नमूद केलेल्या बाबी/व्यवहार सुरु राहतील आणि आधीचे सर्व आदेश या आदेशाशी संलग्न राहतील आणि ते यापुढे दिनांक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत लागू राहतील. पुनश्चः प्रारंभ अभियानांतर्गत शिथीलीकरणाबाबतचे पुढील आदेश यथावकाश अधिसूचित करण्यात येतील.
शासन अधिसूचनेनुसार साथरोग अधिनियम खंड 2 (1) नुसार कोव्हीड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. मुख्य सचिव यांच्या निर्देशानुसार आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद यांना औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये बाजार/दुकाने यांचे नियंत्रण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेले आहे. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊनबाबत आयुक्त, महानगरपालिका औरंगाबाद यांचे आदेश लागू राहतील.
सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा.दं.वि. 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे आदेशात नमूद आहे.
परिशिष्ट-1 पुनश्चः प्रारंभ अभियान (MISSION BEGIN AGAIN)
कोविड-19 च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश
- चेहरा झाकणे– सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवास करतांना , चेहरा झाकणे अनिवार्य आहे.
- सामाजिक अंतर राखणे- सार्वजनिक ठिकाणी, सर्व व्यक्तींनी कमीत कमी 6 फुट (2 गज की दूरी) इतके अंतर राखले पाहिजे.
दुकानदार , ग्राहकांमध्ये शारीरिक अंतर राखण्याची सुनिश्चिती करतील आणि एकावेळी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना मुभा देणार नाहीत.
- एकत्र जमणे – मोठी सार्वजनिक संमेलने/भव्य सभा यांना मनाई असेल.
विवाह संबंधित कार्यक्रमात एकत्र जमणे-पाहुण्यांची कमाल संख्या 50 पेक्षा अधिक असणार नाही.
अंत्यसंस्कार/अंत्यविधी यासंबंधातील कार्यक्रमात व्यक्तींची संख्या 20 पेक्षा अधिक असणार नाही.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे, संबंधित स्थानिक प्राधिकरणाव्दारे, त्यांचे कायदे , नियम, विनियम यांनुसार विहित करण्यात येईल अशा दंडाच्या शिक्षेस पात्र असेल.
- सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखु, इत्यादींच्या सेवनास मनाई आहे.
कामाच्या ठिकाणांबाबतचे अतिरिक्त निर्देशः
- घरातुन काम करणे – शक्य असेल तेथवर, घरुन काम करण्याची पध्दत अनुसरण्यात यावी.कार्यालये , कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा आणि औद्योगिक व वाणिज्यिक आस्थापना यांमध्ये कामाच्या/कामकाजाच्या वेळांची सुनियोजितपणे आखणी करावी.
- परिक्षण (स्क्रीनिंग) व स्वास्थ्य – औष्णिक परीक्षण (थर्मल स्कॅनिंग), हात स्वच्छ करण्याचे द्रव्य (हॅंडवॉश) व निर्जंतुकीकरण द्रव्य (सॅनिटायझर) हे सर्व प्रवेशव्दाराजवळ व निर्गमन व्दाराजवळ आणि सामाईक क्षेत्रांत पुरविण्यात येईल.
- वारंवार निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) – संपुर्ण कामाच्या ठिकाणाचे, सामाईक सुविधांचे व मानवी संपर्कात येणा-या सर्व जागा यांचे, उदाहरणार्थ दरवाजांच्या मुठी (डोअर हॅण्डल) , इत्यादींचे कामाच्या पाळयांमध्ये वारंवार निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्याची सुनिश्चिती करण्याची दक्षता घ्यावी.
- सामाजिक अंतर राखणे- कामाच्या ठिकाणांच्या सर्व प्रभारी व्यक्ती, कामागारांमध्ये पुरेसे अंतर राखणे, कामाच्या पाळयांदरम्यान पर्याप्त अंतर ठेवणे, दुपारच्या जेवणाच्या वेळेत पुरेसे अंतर राखणे, इत्यादींव्दारे सामाजिक अंतर राखण्याची दक्षता घेतील.
परिशिष्ट-2 पुनश्चः प्रारंभ अभियान (MISSION BEGIN AGAIN)
- प्रतिबंधीत क्षेत्र
- महाराष्ट्र शासनाचे आदेश दिनांक 19 मे 2020 व दिनांक 21 मे 2020 मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्राची वर्गवारी पुढील आदेशापर्यत कायम राहील.
- प्रतिबंधीत क्षेत्र निश्चित करण्याबाबत व त्यातील क्रियाबाबत केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले मार्गदर्शक तत्वे पुढील आदेशापर्यत लागू राहतील.
iii. साथरोगाचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी अथवा महानगरपालिका आयुक्त हे स्थानिक क्षेत्रात परवानगी असलेले परंतु अत्यावश्यक नसलेल्या गतीविधीना तसेच लोकांच्या हालचालीस मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे लेखी पुर्व परवानगीने प्रतिबंधीत करु शकतील.
- सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तु असलेली दुकाने /आस्थापना यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे सुरु राहतील.
- वेळोवेळी परवानगी दिलेल्या बाबी/क्षेत्रे या पुर्वीच्या आदेशाप्रमाणे दिनांक 31 ऑक्टोबर, 2020 पर्यत पुर्ववत सुरु राहतील.
- खालील बाबी/गतिविधी यांना प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर परवानगी राहील.
प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर खालील बाबी व्यतिरिक्त सर्व बाबींना परवानगी राहील.
- गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक.
- शाळा, कॉलेज, शैक्षणीक संस्था, खाजगी शिकवण्या विद्यार्थ्यासाठी आणि नियमित वर्गासाठी दिनांक 31 ऑक्टोबर 2020 पर्यत बंद राहतील.
- a)ऑनलाईन/दुरस्थ शिक्षण सुरु राहील व त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल.
- b)दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पासून प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील भागात एकूण क्षमतेच्या 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दुरस्थ शिक्षणाच्या कामासाठी परवानगी राहिल. याबाबतची आरोग्य व सुरक्षा उपाययोजनेबाबतची मार्गदर्शक तत्वे शालेय शिक्षण विभागामार्फत निर्गमित करण्यात येतील. शालेय शिक्षण विभाग याबाबत आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने निश्चित केलेले मार्गदर्शक तत्वे तसेच शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करेल.
iii. कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षणास राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास संस्था किंवा भारत सरकार किंवा राज्य शासनाने परवानगी दिलेल्या अल्प कालावधीचे प्रशिक्षण देणा-या मान्यता प्राप्त / नोंदणीकृत संस्था यांना परवानगी राहिल.
National Institute for Entrepreneurship and Small Business Development (NIESBUD), Indian Institute of Entrepreneurship (IIE) आणि त्यांच्या प्रशिक्षण संस्थाना परवानगी राहिल.
सदरील परवानगी दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पासून राहिल आणि याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचा अवलंब करण्यात यावा.
- उच्च शैक्षणीक संस्थामध्ये ऑनलाईन/दुरस्थ शिक्षणास प्रोत्साहन देण्यात यावे. उच्च शैक्षणीक संस्थातील संशोधन करणारे विद्यार्थी (Ph.D) आणि विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यासाठी दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पासून प्रयोगशाळा सुरु करण्यास खालील प्रमाणे परवानगी राहिल.
- a)केंद्रीय अनुदानीत उच्च शिक्षण संस्थेचे संस्थाप्रमुख संशोधन (D) करणा-या आणि विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यासाठी प्रयोगशाळेची खरोखर आवश्यकता असल्याची स्वतः खात्री करतील.
- b)इतर उच्च शिक्षणसंस्था उदा. राज्य विद्यापिठे, खाजगी विद्यापिठे इत्यादी संशोधन (D) करणा-या आणि विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यासाठी प्रयोगशाळा सुरु करु शकतील.
यासाठी उच्च शिक्षण विभाग गृह मंत्रालयाच्या सल्याने परवानगी देईल. यासाठी उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान विभाग आवश्यक ते मार्गदर्शक तत्वे निर्गमित करतील.
- दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पासून सर्व शासकीय व खाजगी ग्रंथालये कोव्हीड-19 च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर सुरु ठेवता येतील. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडील निर्गमित होणा-या मार्गदर्शक प्रणालीचे (SOP) पालन करणे बंधनकारक राहिल.
- विवाह आणि इतर वैयक्तीक कौटुबिंक कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त 50 व्यक्तींना आणि अंत्यविधीसंबंधीत कार्यक्रमास जास्तीत जास्त 20 व्यक्तींना परवानगी राहिल.
vii. उद्याने, पार्क, सार्वजनिक खुली मैदाने मनोरंजक उद्देशासाठी अटी व शर्तीचे पालन करून खुले ठेवता येतील.
viii. दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पासून प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर औद्योगिक प्रदर्शनास परवानगी राहिल. यासाठी उद्योग मंत्रालयाने लागू केलेली मार्गदर्शक तत्वे लागू राहतील. उद्योग मंत्रालय, भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करेल.
- प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर स्थानिक आठवडी बाजार व जनावरांची खरेदी-विक्री करणारे बाजार दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पासून सुरु करण्यास परवानगी राहि
- ल. अशा बाजारांना स्थानिक स्वराज्य संस्थेने ठरवून दिलेले कोव्हीड-19 चे निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहिल.
- गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर बाजार/खरेदी केंद्रे/वाणिज्यिक आस्थापना सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यत सुरु राहतील.
- विमानतळावर आगमन होणा-या स्थानिक प्रवाश्यांची कोव्हीड-19 च्या लक्षणाच्या अनुषंगाने तपासणी करावी. तसेच संबंधीत प्रवाशास तात्काळ न मिटणा-या शाईने मोहर लावण्यात यावी.
- रेल्वे स्थानकावर महाराष्ट्रात आगमन होणा-या प्रवाशांची तपासणी करून तात्काळ न मिटणा-या शाईने मोहर लावण्यात यावी. सर्व प्रवाशांना कोव्हीड-19 संबंधीत मार्गदर्शक तत्वे, सामाजिक अंतर, निर्जतूकीकरण यांचे पालन करणे बंधनकारक राहिल.
- कोणत्याही विशेष/सर्वसाधारण आदेशाप्रमाणे परवानगी दिलेल्या बाबी चालू राहतील.
- याव्यक्तीरिक्त प्रतिबंध सुकर करणे आणि प्रतिबंधीत बाबी खुल्या करण्याची कार्यवाही टप्याटप्याने करण्यात येईल. व त्याबाबतचे आदेश कार्यपध्दती मार्गदर्शक तत्वे निर्गमित करण्यात येतील.