बंद

स्पर्धेत सहाभागी होण्याचे आवाहन निवडणूक आयोगाची मतदार जागृती सुरु “माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य”

प्रकाशन दिनांक : 24/02/2022

औरंगाबाद, दि.22, (जिमाका) : सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्व पटवून देण्यासठी, भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत माझे भविष्य- एका मताचे सामर्थ्य” ही राष्ट्रीय मतदार जागृती स्वर्धा सुरु केली आहे. SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation)  मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमाअंतग्रत राष्ट्रीय मतदार जागृती स्पधा्र आयोजित करुन निवडणूक आयोग सामान्य लोकांच्या प्रतिभा आणि येणार आहे. सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक मताचे महात्व विशद करण्याच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कल्पना व मजकूरांचा गौरव करण्यात येणार आहे.

मध्यवर्ती संकल्पना म्हणूज माझे मत माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य” असा आशय असणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत 5 प्रकाराच्या स्पधा्र होत आहेत यामध्ये प्रश्नमंजूषा स्पर्धा, घोषवाक्य स्पधार, गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पधार आणि भित्तिचित्र स्पधार याचा समावेश आहे.

प्रश्नमंजूषा स्पर्धा : प्रश्नमंजूषा स्पर्धा स्पर्धा ही जिज्ञासू मनांना सहभागी करुन त्यांची निवडणूकीबाबतची जागरूकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. या स्पर्धेमध्ये 3 स्तर असतील (सुलभ मध्यम आणि अवघड) स्पर्धेच्या तीनही स्तरांची पूर्तता केल्यास सर्व सहभागींना ई – प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

घोषवाक्य स्पधार : या स्पर्धे सहभाणी व्हा आणि दिलेल्या मध्यवर्ती संकल्पनेवर तुमचे शब्द गुंफून इतरांना प्रेरणा देण्यासाठी आकर्षक घोषवाक्य तयार करणे, 

गीत स्पर्धा : शास्त्रीय समकालीन आणि रॅप इत्यादीसह कोणत्याही स्वरुपातील गीताच्या माध्यमातून स्पर्धकाच्या सर्जनशील मनाची प्रतिक्षा आणि क्षमता जोखणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. सहभागी स्पर्धक दिलेल्या मध्यवर्ती संकल्पनेवर मूळ गौतरचना तयार आणि शेअर करु शकतात. कलाकार आणि गायक त्यांच्या आवडीचे कोणतेही वाद्य वापरु शकतात. गाण्याचा कालावधी तीन मिनिटांपेक्ष्ज्ञा जास्त नसावा.

व्हिडिओ मेकिंग स्पर्धा: व्हिडिओ मेकिंग स्पर्धेतून कूमेराप्रेमींना भारतीय निवडणूकांचा उत्सव आणि त्यातील विविधता साजरी करणारा व्हिडिओ (चित्र फीत) तयार करण्याची संधी मिळते. स्पर्धेच्या मुख्य विषयाव्यतिरिक्त, खालील विषयांवर देखील सहभागी स्पर्धक व्हिडिओ बनवू शकतात- माहितीपूर्ण आणि नैतिक मतदानाचे महत्व (प्रलोभनमुक्त मतदान) मतदानाची शक्ती:- महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि नवीन मतदारांसाठी मतदानाचे महत्तव प्रदशित करणे. सहभागी स्पर्धकांना वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर केवळ एक मिनिट कालावधीचा व्हिडिओ करायचा आहे.

व्डिडिओ, गाणे आणि घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रवेशिका भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीनूसार कोणत्याही अधिकृत भाषेत दिल्या जाऊ शकतात.

भित्तिचि स्पर्धा – वरील मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आणि विचारप्रवर्तक अशी भित्तिचित्रे तयार करु शकणाऱ्या चित्रकार आणि कलाप्रेमींसाठी ही स्पर्धा आहे. सहभागी स्पध्रक डिजिटर भित्तीचित्र, आरेखन किंवा रंगवलेली भित्तिचित्रे पाठवू शकतात भित्तित्रांचे रेझोलयूशन (रंगणणांचं पथक्करण) चांगले असले पाहिजेू.

स्पर्धा श्रेणी :

संस्थात्मक श्रेणी –शाळा महाविद्यालये, विद्यापीठे अशा केंद्र किंवा राज्य सरकारच्या संबंधित कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्थांना या संस्थात्मक श्रेणीमध्ये भाग घेता येईल.

व्यावसायिक श्रेणी– ज्या व्यक्तीचा उदरनिवाहाचा मुख्य स्त्रोत गायन,व्हिडिओ मेकिंग, भित्तिचित्र असा आहे.किंवा गायन,व्हिडिओ मेकिंग, भित्तिचित्र याच्याशी संबंधित एखादे काम हा जिच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे अशी व्यक्ती व्यावसायिक म्हणून गणली जाईल. निवड झाल्यास, सहभागी स्पर्धकाला व्यावसासायिक श्रेणी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

हौशी श्रेणी-हौशी जी व्यक्ती गायन, व्हिडीओ मेकिंग, भित्तिचित्र हा छंद म्हणून, सृजनाची आस म्हणून करते, परंतु तिच्या, त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत इतर कोणत्या तरी माध्यमातून असतो तिला हौशी म्हणून गणण्यात येईल.

पुरस्कार आणि सन्मान :-

गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्रे स्पर्धाचे तीन श्रेणीमध्ये वर्गीकरण केले आहे. संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी, प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जातील. याव्यतिरिक्त, प्रत्येक श्रेणीला विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिके दिली जातील. संस्थात्मक श्रेणीमध्ये 4 विशेष उल्लेखनीय तर व्यावसायिक आणि हौशी श्रेणीसाठी 3 विशेष उल्लेखनीय पारितोषिके दिली जातील.

क-गीत स्पर्धा

श्रेणी

पहिले बक्षीस

दुसरे बक्षीस

तिसरे बक्षीस

विशेष उल्लेखनीय

संस्थात्मक

1,00,000

50,000

30,000

15,000

व्यावसायिक

50,000

30,000

20,000

10,000

हौशी

20,000

10,000

7,500

3,000

ख- व्हिडीओमेकिंग स्पर्धा

श्रेणी

पहिले बक्षिस

दुसरे बक्षिस

तिसरे बक्षिस

विशेष उल्लेखनीय

संस्थात्मक

२,००,०००

१,००,०००

७५,०००

३०,०००

व्यावसायिक

५०,०००

३०,०००

२०,०००

१०,०००

हौशी

३०,०००

२०,०००

१०,०००

५,०००

ग- भित्तिचित्र स्पर्धा

श्रेणी

पहिले बक्षिस

दुसरे बक्षिस

तिसरे बक्षिस

विशेष उल्लेखनीय

संस्थात्मक

५०,०००

३०,०००

२०,०००

१०,०००

व्यावसायिक

३०,०००

२०,०००

१०,०००

५,०००

हौशी

२०,०००

१०,०००

७,५००

३,०००

सर्व आकडे भारतीय रुपयांमध्ये आहेत.

घ- घोषवाक्य स्पर्धा:

प्रथम पारितोषिक- रू. २०,०००/-, द्वितीय पारितोषिक- रू. १०,०००/-, तृतीय पारितोषिक- रू. ७,५००/-. सहभागी होणाऱ्यांपैकी ५० स्पर्धकांना प्रत्येकी रू. २,०००/- विशेष उल्लेखनीय पुरस्कार म्हणून देण्यात येतील.

ड- प्रश्नमंजूषा स्पर्धा:

विजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू देण्यात येतील. तसेच तिसरी पातळी पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना इ-प्रमाणपत्रे देण्यात येतील.

५- ज्युरी

विविध श्रेणींमधील प्रवेशिका भारत निवडणूक आयोगाद्वारे गठित परीक्षण मंडळाकडे पाठवण्यात येतील आणि विजयी प्रवेशिकांची निवड करण्यात येईल. पुनर्मूल्यांकनाच्या दाव्यांशी संबंधित विनंत्यांचा विचार केला जाणार नाही.

६- सहभागी होण्यासाठी

  • स्पर्धकांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest/ येथे भेट द्यावी..
  • स्‍पर्धेत प्रवेशासाठी नाव, पत्ता आणि दूरध्‍वनी क्रमांकासह स्‍पर्धकाने आपली थोडक्‍यात ओळख द्यावी.
  • स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका सर्व तपशिलांसह voter-contest@eci.gov.inइथे ईमेल कराव्यात. ईमेल करतांना स्पर्धेचे नाव <स्पर्धा> आणि <श्रेणी> याचा विषयात उल्लेख करावा.
  • प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी.
  • भारताच्या पहिल्या मतदार जागृती स्पर्धेत आता सहभागी व्हा. भित्तिचित्र, गीत, व्हिडिओ,     

घोषवाक्य आणि प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  https://ecisveep.nic.in/contest/वर लॉग इन करा. तुमच्या प्रवेशिका voter-contest@eci.gov.in या ईमेलवर १५ मार्च २०२२ पूर्वी  पाठवावेत असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी कळविले आहे.