अवर्गीकृत
औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम प्रत्यक्ष भेट देऊन पाहणार काम गतीने पण दर्जेदार करा – मुख्यमंत्र्यांचे निर्देश
प्रकाशित केले: 17/06/2022जलवाहिनी, जलकुंभ उभारणी आणि खोदकामास वेग मुंबई दि १७: औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने करतांना कोणत्याही अडचणी येणार नाही याची दक्षता घ्या आणि कामाचा सर्वोत्कृष्ट दर्जा ठेवा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मी स्वत: प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची पाहणी करणार आहे असेही ते म्हणाले. आज मुख्यमंत्र्यांनी संकल्प कक्षामार्फत करावयाच्या कामात समाविष्ट झालेल्या […]
जल जीवन मिशन योजना जिल्ह्यात यशस्वीरित्या राबवा – केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड
प्रकाशित केले: 23/05/2022औरंगाबाद, दि.21, (विमाका) :- जल जीवन मिशन योजने अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘हर घर नल, हर घर जल’ या योजनेच्या बिद्रवाक्याप्रमाणे पाणी पोहचविण्याकरीता हे मिशन यशस्वीरित्या राबविण्याच्या सूचना केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कामासंदर्भात आढावा बैठक डॉ.कराड यांच्या अध्यक्षतेखाली […]
कल्याणकारी शासन योजनांची माहिती देणारे उपयुक्त प्रदर्शन – पालकमंत्री सुभाष देसाई
प्रकाशित केले: 02/05/2022शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्त आयोजित प्रदर्शनाचे जल्लोषात उद्घाटन. औरंगाबाद, दि.01 मे, (विमाका) :- ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षात राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहचविणारे उपयुक्त प्रदर्शन असून उस्फुर्तपणे प्रदर्शनात जनतेने सहभागी होण्याचे आवाहन उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले. माहिती […]
खरीप हंगाम पूर्व बैठक संपन्न
प्रकाशित केले: 02/05/2022शेतकऱ्यांना खत वापराबाबत प्रशिक्षणातून जागृत करावे – पालकमंत्री सुभाष देसाई ‘जिरेनिअम’चा नाविन्यपूर्ण योजनेत समावेश पिकनिहाय लागणाऱ्या बियाण्याचे नियोजन औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका) : खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे व खतांचा वेळेत पुरवठा केला जाणार आहे. खते व बियाणांची मुबलक प्रमाणात उपलब्धता असली तरी शेतकऱ्यांना खत वापराबाबत प्रशिक्षणातून जागृत करावे. तसेच शेतकऱ्यांना करण्यात येणारा कृषी […]
शासन शेतकरी, कष्टकरी, सामान्यांच्या पाठिशी – पालकमंत्री सुभाष देसाई
प्रकाशित केले: 02/05/2022शिवभोजनचे 26 लाखांहून अधिक लाभार्थी प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राज्यात जिल्हा प्रथम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या चित्र प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन पर्यटन विकासासाठी अर्थसंकल्पात 1 हजार 704 कोटींची तरतूद शहाजी राजे भोसले स्मारक परिसराच्या सुशोभीकरणास भरीव निधी औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका) : कोविड परिस्थिती, मिशन वात्स्ल्य, ऑरिकमधील सुविधा, उभारी 2.0 उपक्रम, संतपीठाची सुरूवात, पर्यटन […]
सरस प्रदर्शनासह अजिंठा महोत्सवाचे परिपूर्ण नियोजन करावे – राज्यमंत्री अब्दुल सत्तार
प्रकाशित केले: 20/04/2022औरंगाबाद, दि.19, (विमाका) :- ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत बचतगट समूहाच्या उत्पादनांची विक्री आणि प्रदर्शन करणाऱ्या ‘सरस प्रदर्शनाचे’ आयोजन मे महिन्यात अजिंठा येथे होणार आहे. त्याच कालावधीमध्ये अजिंठा महोत्सवाचे ही आयोजन करण्यात येणार आहे. या दोन्ही उपक्रमांचे परिपूर्ण नियोजन करण्याच्या सूचना महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित यंत्रणांना आज येथे […]
विद्यापीठातील ॲथलेटिक ट्रॅक सिंथेटिक करणार – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड
प्रकाशित केले: 19/02/2022औरंगाबाद,दि. 18 :- (विमाका) :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मातीचा ॲथलेटिक ट्रॅक आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक ट्रॅक करण्याकरीता ‘खेलो इंडिया’ योजनेअंतर्गत प्रलंबित निधी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात औरंगाबाद शहरातील खेळाडू सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, माजी महापौर […]
फर्दापूर येथील ‘शिवस्मारक’ आणि ‘भीमपार्क’चे काम गतीने पुर्ण करावे – राज्यमंत्री अब्दुल सत्तार
प्रकाशित केले: 16/02/2022अंजिठा लेण्याच्या परिसरात सौर विद्युत प्रकल्प उभारावा सिल्लोड तालुका क्रीडा संकुल, मुलींच्या वसतिगृह संविधान सभागृहाचे प्रस्ताव तात्काळ सादर करा औरंगाबाद, दि. 15 (जिमाका) : सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्धेसह सर्व प्रक्रीया तात्काळ पुर्ण करुन बांधकामास प्रत्यक्षात सुरूवात करण्यात यावी, असे महसूल व […]
पर्यटन स्थळे अद्यावत सोईसुविधायुक्त करण्यावर भर – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
प्रकाशित केले: 27/01/2022औरंगाबाद, दि. 26, (जिमाका) – पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्राचे महत्वपूर्ण स्थान असून अजिंठा, वेरुळ या जागतिक पर्यटन स्थळांमुळे औरंगाबाद विभाग महत्वपूर्ण ठरतो, त्यादृष्टीने औरंगाबाद येथे अद्यावत सोईसुविधायुक्त पर्यटन स्थळांचा सर्वांगिण विकास करण्याच्या सूचना पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मराठवाड्यातील पर्यटन स्थळांच्या विकासा संदर्भात आढावा […]
“माझी वसुंधरा” अभियानात लोकसहभाग वाढवावा – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
प्रकाशित केले: 27/01/2022औरंगाबाद, दि. 26, (जिमाका) – बदलत्या वातावरणामध्ये सुरक्षित राहण्यासाठी पृथ्वीचे तापमान आणि पर्यावरणाचे जतन करणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “माझी वसुंधरा अभियानात” लोकसहभाग वाढवण्याच्या सूचना पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित “माझी वसुंधरा” अभियानाच्या आढावा बैठकीत श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी महसूल […]