पत्रक
.
प्रकाशित केले: 11/10/2021कोविड लसीकरण अधिक करण्यावर भर द्या
प्रकाशित केले: 08/10/2021कोविड लसीकरण अधिक करण्यावर भर द्या – अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे · जिल्ह्यात आजपासून मिशन कवच कुंडल औरंगाबाद, दि.07 (जिमाका) : कोविड आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी यंत्रणांनी अधिकाधिक प्रमाणात लसीकरण करण्यावर भर द्यावा. 08 ऑक्टोबर ते 14 ऑॅक्टोबर दरम्यान मिशन कवच कुंडल मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेत उत्सफूर्तपणे नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन अप्पर […]
नवरात्रोत्सवानिमित्त काय करावे करु नये याबाबत प्रशासनाचे
प्रकाशित केले: 07/10/2021औरंगाबाद, दिनांक 06 (जिमाका) : सार्वजनिक नवरात्रोत्सव 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शासनाने नवरात्रोत्सव 2021 साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार औरंगाबाद जिल्हयात कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार औरंगाबाद जिल्हयातील सर्व जनतेला सार्वजनिक नवरात्रौत्सव 2021 साजरा करण्याबाबत काय करावे आणि […]
जिल्हाधिकारी यांनी केली वेरुळ, घृष्णेश्वर लेणी परिसराची पाहणी
प्रकाशित केले: 07/10/2021औरंगाबाद, दिनांक 06 (जिमाका) : कोविडच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच कालावधी पासून बंद असलेल्या पर्यटन स्थळ वेरुळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर तसेच वन विभागाचे उद्यान या ठिकाणी पाहणी करुन वन विभाग तसेच, पुरात्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना लेणीचे संवर्धन व पर्यटकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना केल्या, यामध्ये बस वाहतुक, स्वच्छता, जेवण इतर अनुषांगिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी योग्य ती कार्यवाही […]
जीवनात खचून न जाता नव्या उर्जेने उभे राहा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 07/10/2021‘उभारी 2.0’ उपक्रमात साहित्य वाटप औरंगाबाद, दिनांक 06 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाचा महत्वकांक्षी उपक्रम म्हणून जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना सर्व प्रकाराची मदत ‘उभारी 2.0’ या प्रकल्पातुन केली जात आहे. आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील महिला व मुलांनी खचून न जाता पुन्हा नव्या उर्जेने उभे राहण्याचे बळ देण्याचे काम जिल्हा प्रशासन करीत असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी […]
मराठवाड्याचा कायापालट घडवणाऱ्या प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्रकाशित केले: 18/09/2021मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन मराठवाड्याचा कायापालट घडवणाऱ्या प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निजामकालीन शाळांचा पूर्ण कायापालट परभणीत 200 खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना पूर्णत्वास नेणार औरंगाबाद, दि. १७: शिक्षण, आरोग्य, परिवहन, नगर विकास, पायाभूत सुविधा, कृषी अशा विविध क्षेत्रात मराठवाड्याचा आमुलाग्र कायापालट घडवणारे अनेक […]
बाधित भागातील ग्रामस्थांना सर्व सोयी सुविधा तत्काळ द्या – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 06/09/2021कन्नड तालुक्यातील नुकसानीबाबत आढावा बैठक सहायक अनुदानाचे बाधितांना वाट औरंगाबाद, दिनांक 06 (जिमाका) : कन्नड तालुक्यातील सात मंडळांमध्ये मोठ्याप्रमाणात अतिवृष्टीने नुकसान झालेले आहे. नुकसान झालेल्या बाबी, सोयी सुविधा तत्काळ दुरुस्त कराव्यात, आवश्यक त्या ठिकाणी नवीन बाबींचा समावेश करावा. बाधित झालेल्या भागातील नागरिकांची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने सर्व त्या उपाययोजना कराव्यात, ग्रामस्थांना सोयी सुविधा तत्काळ […]
अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या भागाची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
प्रकाशित केले: 02/09/2021कन्नड-चाळीसगाव औट्रम घाटात नुकसान औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका) : कन्नड तालुक्यातील महसूल मंडळांपैकी 7 मंडळाचा अतिवृष्टी झाली.अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी यांनी नागद, सायगव्हाण, भिलदरी येथील भागातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अतिवृष्टीने कन्नड-चाळीसगाव औट्रम घाटात मोठ्याप्रमाणात दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली, नागरिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टी आणि […]
गणेश उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा : पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता
प्रकाशित केले: 31/08/2021शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन औरंगाबाद, दिनांक 30 (जिमाका) : गणेश उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी कामे करावीत. उत्सव काळात नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विहित वेळेत आवश्यक असणारी कामे पूर्ण करावीत, अशा सूचना पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी केल्या. पोलीस आयुक्तालयात गणेश उत्सव 2021 अनुषंगाने आयोजित बैठकीत […]
विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ द्या – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 26/08/2021कन्नड येथे तालुकास्तरीय आढावा बैठक औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका): उभारी, बाल संगोपन, रोजगार हमी, जल जीवन मिशन, कृषी, महावितरण आदी विषयांसह शासनाच्या विविध योजना, उपक्रमांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांना केल्या. त्याचबरोबर अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावेत, असेही ते म्हणाले. कन्नड येथील गजानन हेरिटेज येथे तालुकास्तरीय आढावा बैठक पार […]