पत्रक

Filter by:
औरंगाबाद, दि. 08 (जिमाका) : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत बुस्टर डोस घेण्याची सुविधा केंद्र सरकारच्या परिपत्रकाद्वारे करण्यात आली आहे. दुसऱ्या डोसनंतर सहामहिने झालेल्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तिसरा डोस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना सहा महिन्यांनी पात्र असलेल्यांना लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा, डॉ.लड्डा, डॉ. प्रेरणा संकलेजा यांच्यासह महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांना शासकीय रुग्णालये, महानगरपालिका आरोग्य केंद्रात तसेच खासगी रुग्णालयांमध्ये बुस्टर डोस मिळणार आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लसीकरण उपलब्ध असून सहा महिन्यापूर्वी कोरोना लस घेणाऱ्यांनी बुस्टर डोस घ्यावा तसेच दुसरा डोस आतापर्यंत घेतला नसल्यास तातडीने लसीकरण करुन घ्यावे असे आवाहनही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले. कॉर्बेव्हॅक्स, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या तीनही लसीची उपलब्धता असल्याने लसीकरण करुन घेण्याचे यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घ्यावा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 08/07/2022

औरंगाबाद, दि. 08 (जिमाका) : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत बुस्टर डोस घेण्याची सुविधा केंद्र सरकारच्या परिपत्रकाद्वारे करण्यात आली आहे. दुसऱ्या डोसनंतर सहामहिने झालेल्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तिसरा डोस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.             कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना सहा महिन्यांनी पात्र असलेल्यांना लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात अपर […]

छायाचित्र उपलब्ध नाही

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘मिशन झिरो ड्रॉप आउट’ प्रभावीपणे राबवावे -जिल्हाधिकारी, सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 05/07/2022

औरंगाबाद, दि. 04 (जिमाका) : ज्या बालकांनी शाळाच पाहिली नाही अशा 6 ते 14 वयोगटातील मुलांना शाळेत प्रवेशित करण्यासाठी तसेच एक महिन्या पेक्षा जास्त कालावधीत वर्गात गैरहजर राहिल्याने मुल शाळाबाह्य झाली आहेत, अशांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ सर्व घटकांच्या सहकार्याने प्रभावी रावबावे व मुलांना शिक्षणाचा मुलभूत हक्क प्राप्त करुन द्यावा, असे निर्देश […]

छायाचित्र उपलब्ध नाही

लसीकरणासह कोविड चाचण्या वाढवा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 05/07/2022

औरंगाबाद दि 04 (जिमाका): कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. लसीकरणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढून संक्रमणाला अटकाव होतो. लसीकरणासह जिल्ह्यात कोविड चाचण्या करण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.           जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडच्या अनुषंगाने जिल्हा टास्क फोर्सची बैठक पार पडली त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश […]

छायाचित्र उपलब्ध नाही

तरुणांनी आर्मी भरतीमध्ये सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 05/07/2022

औरंगाबाद दि 04 (जिमाका): औंरगाबाद मध्ये 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान आर्मीची भरती होणार आहे. या भरतीमध्ये औरंगाबाद, बुलढाणा, हिंगोली, जालना, नांदेड, परभणी आणि जळगांव या जिल्ह्यातील तरुण सहभागी होणार आहेत. तेव्हा या भरतीमध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.           जिल्हाधिकारी कार्यालयात या भरतीच्या अनुषंगाने 1 जुलै रोजी […]

छायाचित्र उपलब्ध नाही

महाराष्ट्रातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी अतिरक्त दोन इको बटालियनची केंद्राकडे मागणी

प्रकाशित केले: 17/06/2022

मराठवाडा इको बटालियनला पाच वर्षांची मुदतवाढ महापालिका क्षेत्रात मियावाकी वन विकसित करा- मुख्यमंत्री मुंबई दिनांक १७: राष्ट्रीय वन नीतीनुसार एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक असून महाराष्ट्रात आजघडीला हे प्रमाण २० टक्के आहे. ज्या जिल्ह्यात आणि विभागात वृक्षाच्छादन कमी आहे तिथे इको बटालियनच्या सहकार्यातून वृक्षलागवड करून हरित क्षेत्र वाढवण्याचे प्रयत्न  करण्याच्यादृष्टीने औरंगाबाद […]

छायाचित्र उपलब्ध नाही

रेशनकार्ड धारकांना आधार सिडींग करुन घ्यावे – जिल्हा पुरवठा अधिकारी

प्रकाशित केले: 17/06/2022

औरंगाबाद, दिनांक 17 (जिमाका) :  औरंगाबाद जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अन्न धान्याचा लाभ देण्यात येत आहे. सदर लाभार्थ्यांना epos मशीनद्वारे अन्न वाटप करण्यात येते. त्या अनुषंगाने शिधापत्रिका आरसीएमएस वर ऑनलाईन करुन त्यांचे आधारसिडींग पात्र लाभार्थांन अन्न धान्य वाटप करण्यात येत, उर्वरित लाभार्थ्यांचे आधार सिडींग पूर्ण झाल्यानंतर ज्या लाभार्थीं राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत अन्न […]

छायाचित्र उपलब्ध नाही

पालक, शिक्षकांसह मित्रांचा आदर बाळगा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 15/06/2022

शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवात जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती जिल्हाभरातील शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत शहरातील अशोक नगर, औरंगाबाद तालुक्यातील गारखेडा नं.1 शाळेला भेट औरंगाबाद,दिनांक 09 (जिमाका) : शालेय विद्यार्थी जीवनापासून प्रत्येकाने पालक, शिक्षक आणि मित्रांचा आदर बाळगावा. जगातील उत्तम नागरिक बनण्याचा ध्यास धरावा. खूप कष्ट करावेत, पर्यावरणावर प्रेम करावे, अधिकाधिक वाचन करावे. या सर्व गुणांमुळे तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी […]

छायाचित्र उपलब्ध नाही

गोगा बाबा टेकडीवरील वृक्ष लागवडीचा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आढावा

प्रकाशित केले: 20/05/2022

औरंगाबाद, दिनांक 19 (जिमाका) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील गोगा बाबा टेकडी व परिसरात लावण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीसंदर्भातील आढावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात यासंबंधी बैठक पार पाडली. या बैठकीस उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, इको बटालियनचे कॅप्टन हित मेहता, सामाजिक वनीकरण विभागाच्या वन अधिकारी श्रीमती के. के. जमदाडे- कोकाटे, क्षेत्रीय […]

आपत्ती निवारणात सर्व यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक

आपत्ती निवारणात सर्व यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक – जिल्हाधिकरी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 20/05/2022

औरंगाबाद, दिनांक 19 (जिमाका) : भविष्यातील पाण्याची आवश्यकता पाहता पुढील 30 वर्षातील मुबलक पाण्यासाठी जल जीवन मिशनअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. यासंबंधीची सर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित अभियंत्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात […]

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निराधार व दिव्यांगाना रेशनकार्डचे वाटप

प्रकाशित केले: 20/05/2022

औरंगाबाद,दिनांक 19 (जिमाका) : समाजातील वंचित, निराधार दिव्यांग, तृतीयपंथीय आणि देहविक्री करणाऱ्या महिलांना मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी रेशनकार्डाच्या माध्यमातून मदत केली जात आहे. आज जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने नवीन 200 रेशन कार्डचे वाटप जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका प्रशासक आस्तिकुमार पांडेय, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार […]