पत्रक
मान्सुनच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर
प्रकाशित केले: 10/05/2022औरंगाबाद, दि.10, (विमाका) :- मान्सुन काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजनांची तयारी पूर्ण करुन घ्यावी. जिवीत व वित्त हानी टाळण्याकरीता क्षेत्रीय सर्वेक्षण करुन यंत्रणा सज्ज ठेवावी. यासाठी सुक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज मान्सुनपूर्व तयारी बाबत श्री.केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक […]
कोविड प्रतिबंधक लस देण्यावर भर द्या : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 09/05/2022औरंगाबाद,दिनांक 09 (जिमाका) : कोविड प्रतिबंधात्मक लस हे कवच कुंडल आहे. प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे. जनतेमध्ये लसीबाबत जन जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणेने नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड नियंत्रण आढावा बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे […]
नाथ षष्ठी दिंडीतील वारकऱ्यांनी कोविड लस घेणे आवश्यक – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 21/03/2022नाथषष्ठी सोहळ्यात कोविड नियमांचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन सर्व व्यवस्थेसह चोख बंदोबस्त ठेवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना औरंगाबाद, दिनांक 20 (जिमाका) : राज्यासह इतर राज्यातून लाखो भाविक पैठणच्या नाथ षष्ठी सोहळ्यासाठी येतात. यामध्ये जवळपास 600 दिंडी दाखल होतात. या दिंडी प्रमुखांनी पैठणमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांच्या दिंडीतील सदस्यांसह कोविड लस घेणे आवश्यक आहे. तसा लस घेतल्याबाबतच्या पुराव्यासोबत ओळखपत्र […]
आदिवासी बांधवांना शासन नियमानुसार योग्य न्याय देणार : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 15/03/2022औरंगाबाद, दिनांक 14 (जिमाका) : आदिवासी बांधवांना शासनाच्या निर्णयातील नमूद नियमांनुसार योग्य तो न्याय देण्यास प्रथम प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज भेटावयास आलेल्या आदिवासी बांधवांना दिले. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, शेत मजूर युनियन व सत्यशोधक शेतकरी सभा यांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. […]
मतदान प्रक्रियेतील महिला, नवमतदारांचा सहभाग महत्वाचा – केंद्रीय निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडेय
प्रकाशित केले: 15/03/2022औरंगाबाद,दि.14 (विमाका) :- मतदान प्रक्रिया सर्वंकषरित्या यशस्वी होण्यासाठी महिला, नवमतदार यांचा सहभाग महत्वाचा आहे, हे लक्षात घेऊन त्यांची परिपूर्ण नोंदणी करुन सर्व पात्र मतदारांचा मतदान प्रकियेतील सहभाग वाढवण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडेय यांनी आज येथे दिल्या. औरंगाबाद येथील हॉटेल ताज विवांता मध्ये आयोजित मुख्य निवडणूक कार्यालयाच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वीप (सिस्टमॅटिक […]
महिलांनी आर्थिकदृष्टया स्वावलंबी व सक्षम व्हावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 09/03/2022औरंगाबाद, दि. 08 (जिमाका) : महिलांनी आपल्या कार्यकतृत्वाचा ठसा उमटवण्याबरोबरच आर्थिक दृष्टया स्वावलंबी व सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावे, प्रत्येक महिलांनी कार्यरत असणाऱ्या क्षेत्रामध्ये उत्तम योगदान देण्याबरोबरच इतर महिलांनाही सहकार्य आणि प्रेरणा बनण्याचे प्रयत्न करावे असे आज जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, […]
लोकशाही दिनात 11 तक्रारी प्राप्त
प्रकाशित केले: 08/03/2022औरंगाबाद, दिनांक 07 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात 7 मार्च रोजी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकशाही दिनात एकूण 11 तक्रारी दाखल झाल्या. त्यामध्ये पाटबंधारे विभाग सिचंन -01, महसुल विभाग-03, इतर निवेदन -07 समावेश होता.
कोरोनामुळे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांस धनादेशाचे वितरण
प्रकाशित केले: 01/03/2022औरंगाबाद, दिनांक 28 (जिमाका) : कोविड-19 मध्ये निधन पावलेल्या कर्तव्यावरील शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास 50 लक्ष रुपयाचे सानुग्रह सहाय्य अनुदान शासना तर्फे दिले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले अव्वल कारकून कै.सचीन साळवे यांच्या कुटुंबियाना 50 लक्ष रुपयाच्या धनादेशाचे वितरण आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब शिंदे व कार्यालयातील इतर कर्मचारी […]
स्पर्धेत सहाभागी होण्याचे आवाहन निवडणूक आयोगाची मतदार जागृती सुरु “माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य”
प्रकाशित केले: 24/02/2022औरंगाबाद, दि.22, (जिमाका) : सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्व पटवून देण्यासठी, भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत माझे भविष्य- एका मताचे सामर्थ्य” ही राष्ट्रीय मतदार जागृती स्वर्धा सुरु केली आहे. SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation) मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमाअंतग्रत राष्ट्रीय मतदार जागृती स्पधा्र आयोजित करुन निवडणूक […]
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य सर्वांसाठी प्रेरणादायक – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 20/02/2022औरंगाबाद, दिनांक 19 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण कार्यात समाजातील सर्व जाती- धर्मातील लोकांना सोबत घेवून कार्य केले. त्यांच्यातील युध्दकौशल्य, गुणग्राहकता, कामकाजातील समन्वय, शुद्ध हेतूने व आत्मीयतेने रयतेसाठी केलेले कार्य प्रत्येकाच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयात सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमापूर्वी जिल्हा […]