पत्रक
अवैध गौनखनिज वाहतूक करताना जप्त करण्यात आलेल्या वाहनांची मूल्यांकन प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 17/02/2022तुकडेबंदीचे फेर तात्काळ थांबविण्याचे निर्देश नोटिसांना प्रतिसाद न देणाऱ्यांवर बोझाची कारवाई करा वाळू चोरी करणाऱ्या व्यक्तीस मदत करण्यावर गुन्हे दाखल करा औरंगाबाद दि 16 (जिमाका ) :अवैध गौनखनिजाची वाहतूक करताना जप्त केलेल्या वाहनांचा नोटीस कालावधी संपल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून मूल्यांकन करण्याची प्रक्रिया तात्काळ करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. शासनाने ठरवून दिलेल्या महसूल […]
संत सेवालाल महाराज जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी
प्रकाशित केले: 16/02/2022औरंगाबाद, दि. 15 (जिमाका) : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शिशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, प्रभोदय मुळे, संगीता चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष झुंझारे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही संत […]
अल्पसंख्यांक शाळेच्या सुविधेसाठी संस्थाचालकानी प्रस्ताव सादर करावेत- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 10/02/2022औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका) : अल्पसंख्यांक विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे परिपत्रक क्र. अविवि-२०२१ / प्र.क्र.६८/का.६ दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२ अन्वये सन २०२१-२२ या वर्षासाठी जिल्हयात अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका व नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्याबाबत कळविले आहेत. सदर योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याकरिता अल्पसंख्यांक विकास विभाग, शासन निर्णय […]
पैठण तालुक्याचे महसूल वसूलीबाबत नियोजन करावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 10/02/2022औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका) : शासनाने ठरवून दिलेल्या महसूल वसूलीबाबत उदिष्ट पूर्ण करण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी नियोजन करून उदिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पैठण तहसिल कार्यालयात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले. अकृषक कर, तुकडेबंदी, शर्तभंग प्रकरण यांच्या बरोबरच अनधिकृत वाळू , मुरुम व इतर गौण खनिजाच्या चोरीबाबत दंडात्मक […]
“ऑक्सीजन प्लांट बिडकीनच्या आरोग्य सुविधेला पुरक” – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 07/02/2022औरंगाबाद, दिनांक 04 (जिमाका) : बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालायात उपचारासाठी खेड्यापाड्यातील रुग्ण येत असतात.या रुग्णालयात बालरोग विभाग, प्रसुती कक्ष तसेच कोविड बाधीतावर उपचार केले जातात यामध्ये ग्रामीण भागतील रुग्णांना आरोग्य सुविधा सहज आणि तत्पर मिळण्यासाठी पीएस.ए.प्लांट पुरुक ठरणार असल्याचे प्रतिपादन बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील पीएस.ए.प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी संगीता […]
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
प्रकाशित केले: 26/01/2022औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, अप्पासाहेब शिंदे, संदीप पाटील, तहसीलदार शंकर लाड आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
विभागीय क्रिडा संकुलात सुरक्षेच्या अत्याधुनिक सुविधा उभारा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 19/01/2022औरंगाबाद दि 19 (जिमाका): विभागीय क्रिडा संकुलात अनेक खेळाडू सराव करतात तसेच अनेक क्रिडा सामन्यांचे देखील संकुलात आयोजन करण्यात येते. संकुलामध्ये सामान्य नागरिक देखील मॉर्निग वॉकसाठी नियमित येतात. खेळाडू तसेच सामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विभागीय क्रिडा संकुलात प्रवेशव्दारापासून ते संकुलातील प्रत्येक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक सुविधा उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना दिले. […]
रुंद वरंबा सरी (बी.बी.एफ) लागवड तंत्रज्ञान, ठरत आहे पर्जन्य आधारीत शेतीस वरदान -सुनील चव्हाण, भाप्रसे
प्रकाशित केले: 18/01/2022देशाला कृषिप्रधान करणाऱ्या शेतीव्यवस्थेला प्रगतशील करण्यासाठी बी.बी.एफ. पेरणी पद्धत महत्वाची भुमीका बजावत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ याचा सामना शेतकरी करत असतात आणि याचाच परिणाम पिकांवर होऊन उत्पादनात घट होते. अशावेळी पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे, उत्पादन वाढीसाठी रुंद वरंबा […]
समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेली ‘पोकरा’च्या गावांची यादी चुकीची-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
प्रकाशित केले: 18/01/2022औरंगाबाद, दिनांक 17 (जिमाका) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांमध्ये (पोकरा) एक हजार 175 नवीन गावांचा समावेश झाल्याची यादी सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामुळे या यादीच्या सत्यतेबाबत कृषी विभागाकडे सतत विचारणा होत आहे. सामाजिक माध्यमांमध्ये व्हायरल होत असलेली संबंधित यादी चुकीची आहे. त्यावर विश्वास ठेऊ नये. पोकरामध्ये नव्याने कोणत्याही गावांची निवड झालेली नाही. जिल्ह्यात […]
‘पोकरा’च्या 327 गावांसाठी 130.88 कोटींचा आराखडा मंजूर-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 17/01/2022नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या सनियंत्रण समितीची बैठक औरंगाबाद, दिनांक 17 (जिमाका) : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) योजनेंतर्गत जिल्ह्यातील 327 गावच्या 130.88 कोटींच्या मृद व जलसंधारण प्राथमिक अंदाजपत्रीय आराखड्यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज मंजुरी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) योजनेसंदर्भात जिल्हा सनियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली. बैठकीस […]