पत्रक

Filter by:
-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

गृह विलगीकरणातील रुग्णांशी नियमित संपर्क ठेवावा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 17/01/2022

औरंगाबाद दि 17 (जिमाका): जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्या जरी वाढत असली तरी रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या कमी आहे. अनेक रुग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. असे उपचार घेणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून नियमितपणे संपर्क साधला जात आहे. अशाच प्रकारे ग्रामीण भागातील गृह विलगीकरणातील रुग्णांशी देखील नियमितपणे संपर्क साधून […]

नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामांची गती अधिक वाढवा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामांची गती अधिक वाढवा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 12/01/2022

औरंगाबाद, दिनांक 12 (जिमाका) : औरंगाबाद शहराला मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी 1680 कोटींची नवीन पाणी पुरवठा प्रकल्प योजना राबविण्यात येत आहे. औरंगाबाद शहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. औरंगाबाद शहराचा विस्तार आणि येथील नागरिकांना आवश्यक मुबलक पाणी मिळावे, यासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेची कामे गतीने सुरू आहेत. येथील नागरिकांना लवकर मुबलक पाणी देण्यासाठी सुरू असलेली योजनेतील […]

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्हाधिकारी साहेबांशी संपर्क साधायचाय… 9156695872 या क्रमांकावर करा व्हिडिओ कॉल….!

प्रकाशित केले: 12/01/2022

औरंगाबाद दि 11 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त अनेक अभ्यागतांचा राबता असतो. अनेकजण आपली तक्रार घेऊन जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेतो आणि आपली समस्या मांडतो. परंतु सध्या  जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात देखील कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याने अभ्यागतांच्या भेटीवर निर्बंध्‍ आले आहेत. परंतु सामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लागाव्यात […]

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस

प्रकाशित केले: 11/01/2022

औरंगाबाद,दिनांक 10 (जिमाका) : कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व या आजारावर नियंत्रणासाठी उपयोगी ठरणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस (बूस्टर) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज घेतला. यावेळी त्यांनी  शासकीय यंत्रणेतील फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सहविकार असलेले नागरिकांनी दुसऱ्या डोसला 9 महिने पूर्ण झाल्यानंतर लशीचा तिसरा डोस घेण्याचे […]

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 11/01/2022

औरंगाबाद दि 10 (जिमाका): जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणासह कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी कोविड 19 ओमिक्रॉन व्हेरीयंट संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनुरूप वर्तनाची तपशीलवार मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आले आहेत. या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई […]

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते रायफल शुटींग रेंजचे भूमिपूजन

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते रायफल शुटींग रेंजचे भूमिपूजन

प्रकाशित केले: 11/01/2022

खेलो इंडिया जिल्हा केंद्राचेही केले उद्घाटन             औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका) :   उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रेरणेने व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून आणि ए.एम.पटेल इन्फ्रा प्रा. लि.चे भावेन अमीन यांच्या सहकार्याने तयार करण्यात येत असलेल्या विभागीय क्रीडा संकुल येथे 25/50 फायर शुटींग रेंजच्या कामाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते आज झाले. खेलो इंडिया जिल्हा केंद्राचेही त्यांनी उद्घाटन केले. […]

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाभरात नऊ भरारी पथकांची नियुक्ती

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाभरात नऊ भरारी पथकांची नियुक्ती – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 10/01/2022

पथकाव्दारे गर्दीचे होणार चित्रिकरण पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन वाळु घाट लिलावासाठी भाग घेण्याचे आवाहन अवैध वाळू उपसा व वाहतूक करण्याऱ्यांविरुध्द कठोर कारवाई औरंगाबाद दि 09 (जिमाका): कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु काही ठिकाणी अद्यापही गर्दी असल्याचे निदर्शनास येत आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाभरात […]

पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 08/01/2022

औरंगाबाद दि 07 (जिमाका): कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करुन घेणे सर्वात महत्वाचे आहे. लसीरणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढुन संक्रमणाला अटकाव होतो.  त्यामुळे जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.           जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका यांच्या सौजन्यातून शहरातील ज्ञानदिप फाऊंडेशनच्या प्रांगणात येथे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विशेष […]

ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लागु

ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लागु

प्रकाशित केले: 06/01/2022

रुग्णांना गृह विलगीकरणात राहायचे असल्यास घरातील इतर सर्व सदस्यांचे लसीकरण बंधनकारक – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण रुग्णालयांनी बेड्सची संख्या वाढवावी गर्दीच्या ठिकाणी राहणार कॅमेऱ्यांची नजर हुर्डापार्टी/फॉर्म हाऊसवर पूर्णपणे बंदी: उल्लंघन केल्यास पोलिस कारवाई मंगल कार्यालयातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मंगल कार्यालय व्यवस्थापणाची शासकीय/निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द औरंगाबाद, दिनांक 05 (जिमाका) : सध्या जिल्ह्यात कोविडचे रुग्ण वाढत आहेत. […]

15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्रातून शुभारंभ लसीकरणामुळे प्रतिकारशक्तीत वाढ होत असल्याने कोरोना संक्रमणाला अटकाव होणार - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्रातून शुभारंभ लसीकरणामुळे प्रतिकारशक्तीत वाढ होत असल्याने कोरोना संक्रमणाला अटकाव होणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 04/01/2022

औरंगाबाद दि 03 (जिमाका) लसीकरणामुळे प्रतिकारशक्तीत वाढ होत असल्याने कोरोना संक्रमणाला अटकाव होणार आहे. 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींची प्रतिकारशक्ती या लसीकरण मोहिमेने प्रबळ होणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.             प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर […]