पत्रक
ओमायक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरणावर भर द्यावा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 28/12/2021लसीकरणासाठी हर स्कूल,कॉलेज दस्तक मोहिम 25 डिसेंबरच्या निर्णयाची अंमलबजावणी 325 विनामास्क वाहन धारकावर प्रशासनाची कायदेशीर कारवाई औरंगाबाद, दि.27 (जिमाका) ओमायक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरणावर भर देणे आवश्यक आहे. दुसऱ्या डोसचे नियोजन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. 60 वर्षावरील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याबरोबरच 15 वर्षावरील मुलांच्या लसीकरणासाठी तसेच आरोग्य सेवेतील कर्मचारी (फ्रंटवर्कर) यांच्या 03 जानेवारीपासून 2022 सुरू होणाऱ्या […]
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून तंबाखू विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे कौतुक
प्रकाशित केले: 27/12/2021औरंगाबाद, दि.24 (जिमाका) – तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून होणारे दुष्परिणाम, व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश आरोग्य विभागाकडून लोककला व पथनाट्यामार्फत जिल्हाभरात देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात लोककला पथकाने तंबाखू विरोधी जनजागृतीपर कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. जिल्हाधिकारी यांनी कलापथकातील कलाकारांचे कौतुक करून प्रभावीपणे जनजागृती करण्याच्या सूचनाही […]
नागरिकांनी ग्राहक हक्काबाबत जागरुक राहावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 27/12/2021औरंगाबाद, दि.24 (जिमाका) – नागरिकांनी ग्राहक म्हणून कोणत्याही वस्तुची खरेदी करित असताना, पक्क्या बिलाच्या पावतीची मागणी करावी, जेणेकरुन वस्तूच्या खरेदीत बनावट वस्तूच्या खरेदीतून फसवणूक टाळता येईल, तसेच नोंदणी कृत पावती असलेल्या विक्रेत्याकडून नागरिकांनी खरेदी करुन स्वत:च्या ग्राहक हक्काबाबत जागरुक राहावे असे आवाहन आज जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन प्रबोधनात आयोजित जाणिव जागृतीच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील […]
ग्रामीण भागात 37(1)(3) कलम लागू
प्रकाशित केले: 27/12/2021औरंगाबाद, दि.24 (जिमाका) – औरंगाबाद ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 च्या 37(1) व (3) कलमान्वये जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत 9 जानेवारी 2022 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे अपर जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी कळविले आहे.
खाद्यपदार्थाची गुणवत्ता तपासणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
प्रकाशित केले: 27/12/2021औरंगाबाद, दि.24 (जिमाका) – औरंगाबाद जिल्हा पर्यटनाची राजधानी असल्याने येथे येणाऱ्या पर्यंटकांना स्वच्छ व सुरक्षित अन्न देण्याची जबाबबदारी अन्न औषध प्रशासनाची असल्याने ही जबाबदारी चोखपणे पार पडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ऍडव्हायझरी कमिटी फॉर सेफ फूड अँड हेल्दी डाएट’ या विषयाच्या अनुषंगाने पार पडलेल्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत […]
टास्क फोर्स समितीत घेतलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 21/12/2021ओमायक्रानच्या पार्श्वभूमीवर जिल्हा टास्क फोर्स समितीने घेतले विविध निर्णय औरंगाबाद, दिनांक 20 (जिमाका) : कोविड संसर्गचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व ओमायक्रॉन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा टास्क फोर्स समितीने अनेक निर्णय घेतलेले आहेत. या निर्णयांची संबंधित यंत्रणेने काटेकोर अंमलबजावणी करून ओमायक्रोन विषाणू संसर्गापासून आपल्या जिल्ह्याचे संरक्षण करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी […]
कोविड मृतांच्या नातेवाईक, वारसदारांना सहायता निधीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
प्रकाशित केले: 17/12/2021औरंगाबाद, दिनांक 17 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यातील कोविडमुळे मृत झालेल्या कुटुंबियाच्या नातेवाईक, वारसदार यांना रु.50 हजार सहायता निधी देण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु आहे, पात्र नातेवाईक, वारसदारांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे. सहायता निधीसाठी पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह mahacoivd19relief.in या संकेतस्थळावर नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी संकेतस्थळावर आवश्यक आहे. संकेतस्थळ, सेतू […]
पीक नुकसानीवर ‘पीक विम्याचे’ संरक्षण कवच सुनील चव्हाण (भाप्रसे), M.Sc(Agri) – जिल्हाधिकारी, औरंगाबाद
प्रकाशित केले: 17/12/2021प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६ पासून सुरु करण्यात आली आहे. ही सध्याची प्रमुख पीक विमा योजना आहे. खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांसाठी ही योजना असून राज्य शासनाने निर्धारित केलेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांना कमीतकमी हप्ता भरून पीक विमा उतरवता येतो. विविध पिकांसाठी जोखीमस्तर, जोखमीच्या बाबी, विमा संरक्षित रक्कम, इत्यादी बाबींच्या आधारे विमा […]
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा समिती गठित
प्रकाशित केले: 17/12/2021डॉ. अंभुरे, डॉ.वावगे, मगर, कुमठेकर समितीचे अशासकीय सदस्य औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका) : मराठी भाषा व साहित्याचे अभ्यासक डॉ. कैलास अंभुरे यांच्यासह डॉ.सविता वावगे, ग्रंथालय चळवळीचे गुलाबराव मगर, प्रकाशक अशोक कुमठेकर या अशासकीय सदस्यांची औरंगाबाद जिल्ह्यात मराठी भाषा समितीच्या सदस्य पदी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नियुक्ती केली आहे. मराठी भाषा सरकारी कामकाजात वापरली जावी आणि […]
वनस्टॉप सेंटर ‘सखी’ साठी घाटी रुग्णालयात जागा उपलब्ध करुन देणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 15/12/2021औरंगाबाद,दि.14 (जिमाका) –संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या (सखी) One Stop Crises Center या योजनेअंतर्गत तात्पुरता निवारा, आरोग्य तसेच इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी घाटी रुग्णालय परिसरात जागा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती सखी सेंटरच्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. यावेळी याबैठकीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रमोद […]