पत्रक
पात्र नागरिकांनी 15 डिसेंबर पर्यंत दुसरा डोस न घेतल्यास कडक कारवाई करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 13/12/2021जिल्हास्तरीय टास्क फोर्स आढावा बैठक पात्र नागरिकांनी 15 डिसेंबर पर्यंत दुसरा डोस न घेतल्यास कडक कारवाई करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण औरंगाबाद: दिनांक 13 (जिमाका) : ओमायक्रॉन पासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे त्यामुळे पात्र नागरिकांनी तात्काळ लसीकरण करुन लसीकरण मोहिमेला प्रतिसाद देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील जे नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत परंतु […]
जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी हक्क दिनाचे आयोजन
प्रकाशित केले: 10/12/2021औरंगाबाद, दिनांक 08 (जिमाका): मानवी हक्काबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच समाजातील तळागाळापर्यंत जनतेला मानवी हक्काचे ज्ञान होण व त्याबद्दल जनजागृती होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दि 10 डिसेंबर शुक्रवार, सकाळी 10.वा.प्रमुख वक्ते म्हणून ॲड विष्णू ठोबळे यांनी आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास, सर्व विभाग प्रमुखांनी त्यांचे अधिपत्याखालील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उपस्थित रहावे, […]
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक संपन्न ओमायक्रॉनला रोखण्यासाठी पात्र नागरिकांनी तात्काळ लसीकरण करुन घ्यावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 10/12/2021पात्र लाभार्थ्यांनी दुसरा डोस 15 डिसेंबरपर्यंत घ्यावा नसता दंडात्मक कारवाई महाविद्यालय/खाजगी क्लासेस मधील शिक्षकांनी कोविड चाचणी करणे बंधनकारक कोविडमुळे निधन पावणा-या मृतांच्या वारसांना तात्काळ साहाय्य देण्याचे निर्देश Vaccination on Wheel & Vaccination on Demand अंतर्गत पथक स्थापन औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका) : ओमायक्रॉन पासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे त्यामुळे पात्र नागरिकांनी तात्काळ […]
कोविड-19 आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकानी सानुग्रह सहाय्यला ऑनलाईन अर्ज करावेत
प्रकाशित केले: 09/12/2021औरंगाबाद, दिनांक 08 (जिमाका): कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्यात बाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 04.10.2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी प्रसारीत केला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online web portal विकसित केले असून, […]
ग्रामपंचायत पोट निवडणूक 2021 साठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
प्रकाशित केले: 03/12/2021औरंगाबाद,दि. 2 (जिमाका) : निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेलया ग्रामपंचायतीतील रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणूकीबाबतचा कार्यक्रम मा. राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांचेकडून जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतीतील 185 रिक्त सदस्य पदांचया ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकासाठी तालुका निवडणूक निरीक्षक म्हणून खालील अधिकारी यांची याद्वारे नियुक्ती करण्यात येत आहे. तालुका […]
परदेशी प्रवास करून आलेल्या प्रवाशांची माहिती कळवा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 30/11/2021ओमिक्रॉन, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक औरंगाबाद, दिनांक 29 (जिमाका) : सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये कोव्हिड-19 च्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूचा प्रकार आढळून आला असून, सदर विषाणू हा अत्यंत घातक असून, त्याची प्रादूर्भाव क्षमता ही पूर्वीच्या विषाणूपेक्षा 500 % अधिक असल्याचे आढळून आले आहे. ओमिक्रॉन या विषाणूचा संसर्ग आपल्या देशात रोखण्यासाठी विमानाद्वारे येणाऱ्या प्रवाशांच्या […]
ग्रामपंचायत पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
प्रकाशित केले: 25/11/2021औरंगाबाद, दिनांक 24 (जिमाका): निवडणूक कार्यक्रमानुसार राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी परिशिष्ट अ व ब नुसार दिलेल्या तसेच संपूर्ण निवडणूक कार्यक्रम बारकाईने वाचन, अवलोकन करुन सदर निवडणूक कार्यक्रमानुसार टप्पेनिहाय वेळोवेळी अचूक कार्यवाही करण्यात यावी व टप्पेनिहाय केलेल्या कार्यवाही बाबतचा अनुपालन अहवाल त्या त्या दिवशीच न चुकता जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याबाबतची दक्षता घेण्यात यावी. सदर प्रकरणी […]
लस न घेतल्यास संबंधितांवर होणार कारवाई – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 23/11/2021ऑटो रिक्षा, ट्रॅव्हल्स, आस्थापना, हॉटेल्स, खानावळी, मद्य विक्री करणाऱ्यांनी लस घेण्याचे आवाहन औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : ऑटो रिक्षा, ट्रॅव्हल्स एजन्सी, सर्व आस्थापना, हॉटेल्स, खानावळी, मद्य विक्री करणा-या चालक, मालक, कर्मचारी, कामगारांनी कोविड 19 प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे. संबंधितांनी ती घ्यावी, अन्यथा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार यथायोग्य कारवाई करण्यात […]
नियमांचे पालन करण्याच्या अटीवर बाबा पेट्रोल पंप सुरु – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 23/11/2021औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) :कोविड-19 अनुषंगाने आवश्यक असलेल्या शिष्टाचाराचे पालन करण्याच्या अटीवर आणि ग्राहकांचे कोविड लसीकरण झाल्याच्या खात्रीनंतर बाबा पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल मिळणार आहे. कोविड नियमांचे पालन न केल्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बाबा पेट्रोल पंपवर कारवाई (ता.21) केली होती. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने आणि बाबा पेट्रोल पंप मालक यांनी कोविड-19 अनुषंगाने सर्व नियमांचे पालन […]
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते लसीकरण जनजागृती चित्ररथाचा शुभारंभ
प्रकाशित केले: 23/11/2021औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लस, असंघटित कामगारांसाठी योजना, मतदार पुनरीक्षण कार्यक्रम आदींबाबत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने तयार केलेल्या चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते आज फीत कापून झाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जनजागृती चित्ररथास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी […]