पत्रक

Filter by:
प्रशासन आणि डॉक्टरांच्या समन्वयाने लसीकरण मोहिम यशस्वी करुयात

प्रशासन आणि डॉक्टरांच्या समन्वयाने लसीकरण मोहिम यशस्वी करुयात – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 13/01/2021

औरंगाबाद, दिनांक, 12 (जिमाका): कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता आपण यशस्वी झालो आहोत. यात पुढचा टप्पा म्हणजे लसीकरण होय. तरी ही लसीकरणाची मोहिम प्रशासन आणि सर्व डॉक्टरांच्या समन्वयाने यशस्वी करुया, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले. औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने कोविड-19 लसीकरण संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. […]

छायाचित्र उपलब्ध नाही

जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

प्रकाशित केले: 12/01/2021

औरंगाबाद, दिनांक, 12 (जिमाका): राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांना आज जयंती दिनानिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, नायब तहसिलदार ए. जी. […]

छायाचित्र उपलब्ध नाही

औरंगाबाद ग्रामीण भागात 31 (1) (3) कलम लागू

प्रकाशित केले: 11/01/2021

औरंगाबाद, दिनांक 11  (जिमाका) :  औरंगाबाद ग्रामीण भागात सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (37) (3) अन्वये प्रतिबंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. यामध्ये औरंगाबाद ग्रामीण भागात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा त्यांच्या जवळपास […]

नामविस्तार दिनानिमित्त नागरिकांनी गर्दी टाळावी -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

नामविस्तार दिनानिमित्त नागरिकांनी गर्दी टाळावी -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 11/01/2021

औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका):  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या  नामविस्तार दिनानिमित्त  कोरोनाची ‍पार्श्वभूमी लक्षात घेता नागरिकांनी गर्दी टाळण्याचे  आवाहन  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार वर्धापण दिनानिमित्त कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली  त्यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. श्री. चव्हाण म्हणाले की शहरात कोरोना विषाणुचा प्रसार […]

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली कोविड लसीकरणाची रंगीत तालीम

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली कोविड लसीकरणाची रंगीत तालीम

प्रकाशित केले: 11/01/2021

v भगतसिंग शाळेत प्रात्यक्षिकातून कळले कोविड लसीकरण औरंगाबाद, दिनांक 08 (जिमाका):  कोविड लसीकरण करण्यासाठी प्रशासनाच्या पूर्वतयारीची रंगीत तालीम (ड्राय रन) बजाज नगरातील भगतसिंग शाळेमध्ये प्रत्यक्ष जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली.  प्रशासनामार्फत सर्वोतोपरी योग्य पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे. याबाबत समाधान आहेच, मात्र, नागरिकांनी देखील प्रशासनास लसीकरण मोहिमेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी यावेळी […]

लीज होल्ड जमिनींचे फ्री होल्डसम करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

लीज होल्ड जमिनींचे फ्री होल्डसम करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

प्रकाशित केले: 11/01/2021

औरंगाबाद, दिनांक 07 (जिमाका) :  औरंगाबाद शहरातील सिडको प्रकल्पातील लीज होल्ड असलेल्या जमीन धारकांना बँकेत कर्ज घेताना अडचणी येतात, टीडीआर लोड करण्यासाठी, बेस एफएसआय 1.1 झाल्यामुळे सिडको क्षेत्रातील मालमत्तांच्याबाबत 0.1 एफएसआय संदर्भात आकारण्यात येणारे प्रिमियम शुल्क कमी करणे, 20 मीटर रस्त्याखालील निवासी  तसेच वाणिज्य मालमत्तांना बेसरेटच्या 75 टक्के आणि 20 मीटर रस्त्यांवरील मालमत्तांना  100 टक्के प्रिमियम आकारणी करण्यात येते. सदरील प्रिमिअम शुल्क […]

कोविड लसीकरणाचा आज ड्रायरन -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

कोविड लसीकरणाचा आज ड्रायरन -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 11/01/2021

v सकाळी 9 ते 11 यावेळेत होणार रंगीत तालिम औरंगाबाद, दिनांक 07 (जिमाका) :  कोविड लसीकरणाची पूर्वतयारीची रंगीत तालिम म्हणजेच कोविड लसीकरणाचा ड्रायरन जिल्ह्यातील ग्रामीण भागात दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या बजाज नगरच्या शहीद भगतसिंग शाळा आणि वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवार, 08 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 11 या कालावधीत प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. तरी प्रातिनिधिक […]

छायाचित्र उपलब्ध नाही

श्रीसंत जनार्धन स्वामी पुण्यतिथीनिमित्त यात्रेबाबत जिल्हाधिकारी यांच्या सूचना

प्रकाशित केले: 07/01/2021

औरंगाबाद, दिनांक 06 (जिमाका): शासन निर्देश व कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता दौलताबाद किल्‍ला येथे 09 जानेवारी रोजी श्रीसंत जनार्धन स्‍वामी पुण्‍यतिथीनिमित्‍त गर्दी करुन यात्रा भरु नये. भाविक सामाजिक अंतरासह दर्शन करू शकतील, याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवश्‍यक ती कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्राव्दारे त्यांना कळविले आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही

पतंगासाठीच्या नायलॉन दोरा निर्मिती, विक्री, वापरावर बंदी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 07/01/2021

औरंगाबाद, दिनांक 06 (जिमाका): औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्याच्या परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत पतंग उडविण्यासाठी तयार करण्यात येणारा नायलॉन दोरा निर्मिती, विक्री व वापर यावर बंदी घालत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा कालावधी नसल्याने तसेच वन्य पशु पक्षांचे जिवितास धोका निर्माण होऊ नये […]

छायाचित्र उपलब्ध नाही

विद्युत वाहिनी व डी.पी स्थलांतरितासाठी 2.80 कोटी खर्चास मंजुरी

प्रकाशित केले: 07/01/2021

औरंगाबाद, दिनांक 06 (जिमाका) : जालना रोडवरील एपीआय कॉर्नर ते कलाग्राम –गरवारे स्टेडिअममार्गे प्रोझोन मॉल रस्त्यांतर्गत बाधित होणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिनी व ङिपी स्थलांतरीत करण्यासाठी  2.80 कोटी खर्चास उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मंजुरी दिली आहे. या रस्त्यांची  प्रत्यक्ष पाहणी नुकतीच तत्कालीन मनपा प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांसह केली होती. या स्थळ […]