पत्रक
ग्राहकांनी खरेदी करताना अधिक जागृत राहावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण · जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
प्रकाशित केले: 26/12/2020औरंगाबाद, दिनांक 24 (जिमाका) : ग्राहकांनी बाजारातून खरेदी करताना अधिक सजग व जागृत राहून खरेदी केलेल्या वस्तूचे पक्के देयक दुकानदारांकडून घ्यावे, तो त्यांचा अधिकार आहे. या जबाबदारीची जाणीव ठेऊन ग्राहकाने राष्ट्र निर्माणात योगदान द्यावे, असे मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभाग्रहात वेबिनारव्दारे राष्ट्रीय ग्राहक दिन श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात […]
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली शहरातील विविध रस्त्यांची पाहणी
प्रकाशित केले: 26/12/2020औरंगाबाद, दिनांक 25 (जिमाका) : जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त सुनील चव्हाण यांनी शहरातील विविध रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून रस्ते, पदपथ आदी कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना मनपा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांच्या अधिकाऱ्यांना आज दिल्या. या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त यांच्यासमवेत महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र […]
मिपा संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या शुभेच्छा
प्रकाशित केले: 24/12/2020औरंगाबाद, दिनांक 24 (जिमाका) : निपुण स्मरणिकेतील सर्वच भाग वाचनीय आहे. यातून संस्था सर्वापर्यंत पोहचणार आहे. LEAD या ऑनलाईन कार्यक्रमातून अधिकाऱ्यांचे सक्षमीकरण होण्यास निश्चितच मदत होईल. अधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक वृध्दीची संधी व त्यातून शालेय शिक्षणाचा विकास व्हावा. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी हा कोर्स करावा, अशी अपेक्षा व्यक्त करुन रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त मिपा संस्थेस शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड […]
नाताळ निमित्त जनतेला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या सूचना
प्रकाशित केले: 24/12/2020औरंगाबाद, दिनांक 24 (जिमाका): फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 नुसारऔरंगाबाद जिल्हयासाठी ( पोलिस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळुन ) दिनांक 25/12/2020 रोजी साजरा होणा-या नाताळ सणानिमित्त औरंगाबाद जिल्हयातील सर्व जनतेला काय करावे आणि काय करु नये याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित केल्या आहेत. अ.क्र. काय करावे काय करु नये 01 1. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग […]
जिल्ह्यात 43346 कोरोनामुक्त, 596 रुग्णांवर उपचार सुरू
प्रकाशित केले: 24/12/2020औरंगाबाद, दिनांक 23 (जिमाका) औरंगाबाद जिल्ह्यात आज 78 जणांना (मनपा 65, ग्रामीण 13) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 43346 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 70 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45134 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1192 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 596 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा […]
कर्ज प्रकरणाच्या समस्या निवारणासाठी प्रतिसाद कक्ष स्थापन करा : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 24/12/2020v मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 1527 प्रस्तावांची बँकांना शिफारस औरंगाबाद, दिनांक 23 (जिमाका) : जिल्ह्यातील विविध भागाातील नागरिक कर्ज प्रकरणे, त्यासंबंधी तक्रारी घेऊन जिल्हाधिकारी यांना भेटत असतात. त्यांच्या तक्रारीची वेळीच दखल घेण्यात यावी व कर्ज मागणा-या अर्जदारांना वेळीच कर्ज उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून सर्व शासकीय योजनांच्या कर्जाकरिता संबंधित अर्जदारांना अडचण असल्यास त्यासंबंधीची दाद आता अर्जदाराला प्रतिसाद […]
शहरातील विविध कार्यालयांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली भेट
प्रकाशित केले: 22/12/2020औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : औरंगाबाद उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, ग्रामीण, अपर तहसील कार्यालय शहर, संजय गांधी निराधार योजना कार्यालय आणि सेतू सुविधा केंद्राची तसेच परिसराला भेट देऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज पाहणी केली. औरंगाबाद उपविभागीय अधिकारी कार्यालयात कर्मचा-यांची बैठक व्यवस्था, उपस्थितीबाबत विचारणा श्री.चव्हाण यांनी भेटी दरम्यान केली. तसेच कार्यालयात स्वच्छता ठेवावी, अभिलेख […]
कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील सर्वांची नोंदणी तत्परतेने पूर्ण करावी -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 22/12/2020औरंगाबाद दि.22 (जिमाका) : कोविड-19 लसीकरणाची प्रक्रिया जिल्ह्यात यशस्वीरित्या राबवण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय महत्वाचा असून पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी आरोग्य क्षेत्रातील सर्वजणांची नोंदणी तत्परतेने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड-19 लसीकरण बाबत जिल्हास्तरीय कार्यशाळेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश […]
औरंगाबाद, पैठण, गंगापूर तालुक्यातील पीक नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी
प्रकाशित केले: 22/12/2020केंद्रीय पथक समितीतील सदस्यांनी शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद औरंगाबाद, दिनांक 21 (जिमाका): औरंगाबाद तालुक्यातील निपाणी, पिंपळगाव पांढरी, पैठण तालुक्यातील गाजीपूर, निलजगाव, शेकटा आणि गंगापूर तालुक्यातील मुरमी, ढोरेगाव, जाखमाथा आणि वरखेड येथील शेतकऱ्यांशी त्यांच्या थेट बांधावर जाऊन केंद्रीय पथक प्रमुख तथा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव रमेश कुमार गंता, केंद्रीय वित्त मंत्रालयाचे सल्लागार आर.बी.कौल यांनी आज […]
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा केंद्रीय पथकाकडून आढावा
प्रकाशित केले: 21/12/2020औरंगाबाद, दिनांक 20 (विमाका):- मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता केंद्रीय पथक आज औरंगाबादेत दाखल झाले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज आयोजित बैठकीत पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यात अतिवृष्टी व पुरपरिस्थीतीमुळे झालेल्या शेतातील पिके व इतर नुकसानीची यावेळी सविस्तर माहिती सादरीकरणाव्दारे दिली. बैठकीस केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा राष्ट्रीय […]