पत्रक
ग्रामीण भागात ३७(१)(३) कलम लागू
प्रकाशित केले: 05/02/2019औरंगाबाद,दि.४ (जि.मा.का.) – औरंगाबाद ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ च्या ३७(१) व (३) कलमान्वये जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत दिनांक १६ फेब्रुवारी २०१९ पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी कळविले आहे.
लोकशाही दिनात 26 तक्रारी प्राप्त
प्रकाशित केले: 05/02/2019औरंगाबाद, दि. 4 (जिमाका) – जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या लोकशाही दिनात एकूण 26 तक्रारी दाखल झाल्या. त्यामध्ये जिल्हा परिषद-04, महसूल विभाग -14, पोलिस विभाग-02, इतर विभाग- 04, प्रकरण निकाली/अप्राप्त-2 अशा अशा एकूण 26 तक्रारी दाखल झाल्या.
अल्पसंख्याक समाजाच्या मागण्यांचा आयोगाकडून सकारात्मक विचार -ज.मो.अभ्यंकर
प्रकाशित केले: 04/02/2019औरंगाबाद,दि.३ (जिमाका) – औरंगाबाद जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाज मोठ्याप्रमाणात असल्याने त्यांच्या विकासासाठी अल्पसंख्यांक आयोगामार्फत शासनाकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी आज सांगितले. अल्पसंख्यांक समाजातील विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थाचालक तसेच शिक्षण विभागाची सुभेदारी विश्रामगृह येथे श्री. अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. यावेळी श्री. अभ्यंकर बोलत होते. […]