अवर्गीकृत
शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांनी खचून न जाता उमेदीने उभे राहावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रकाशित केले: 11/10/2021प्रशासनाने सर्व घटकांना धीर देउन मदत करावी. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अतिवृष्टीच्या मदतीसाठी अतिरिक्त् वाढीव 10 टक्के निधीची तरतूद. मराठवाड्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढवावे. औरंगाबाद, दि.09, (जिमाका) :- मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे व पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, याबाबत मदत म्हणून शासन पीक विमा वेळेत देण्याबाबत काम करत असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या मदतीने […]
पावित्र्य राखून मंदिराचा जीर्णोध्दार करणार – पालकमंत्री सुभाष देसाई
प्रकाशित केले: 11/10/2021औरंगाबाद, दि.08, (जिमाका) :- प्राचीन मंदिर पुनर्विकास योजनेत खंडोबा मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात येणार असून या करिता उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे समिती मार्फत संपूर्ण अभ्यासपूर्ण पावित्र्य राखून जीर्णोध्दार करण्यात येणार असल्याचा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला. येथील सातारा परिसरातील पुरातन हेमाडपंथी खंडोबा मंदिराची पाहणीच्या वेळी श्री.देसाई बोलत होते. यावेळी […]
बाधित शेतकऱ्यांना मदत करणार – पालकमंत्री सुभाष देसाई
प्रकाशित केले: 08/10/2021औरंगाबाद, दिनांक 7 (जिमाका) : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सरसकट पंचनामे करुन जास्तीत जास्त मदत करणार असल्याची ग्वाही उद्योग व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शेतकऱ्यांना दिली. गंगापूर तालुक्यातील आसेगाव व वैजापूर तालुक्यातील सोनेवाडी येथील बाधित झालेल्या शेतपिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी […]
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड
प्रकाशित केले: 07/10/2021औरंगाबाद, दिनांक 06 (जिमाका) : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बळीराजाला जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी प्रशासनाने शासनाकडे लवकरात लवकर प्रस्ताव द्यावा. या प्रस्तावाच्या माध्यमातून शेतक-यांना वाढीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची […]
पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम
प्रकाशित केले: 07/10/2021औरंगाबाद, दिनांक 06 (जिमाका) : उद्योग व खनिकर्म आणि मराठी भाष विभाग तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. गुरुवार, दि.07 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 04.45 वा. औरंगाबाद येथे आगमन. सायं 04.45 वा. औरंगाबाद विमानतळावरुन गंगापूर- वैजापूर तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी, पाहणी करण्यासाठी रवाना. सायं 07.00 वा. माजी […]
ऑरिक सिटीमध्ये अधिक गुंतवणुकीसाठी प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्रकाशित केले: 18/09/2021औरंगाबाद, दि. 17 (विमाका) — राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील ऑरिक सिटी प्रकल्पाची पाहणी केली. ऑरिक सिटी प्रकल्पात मोठया प्रमाणावर गुंतवणूक होण्यासाठी राज्य शासन निश्चितपणे प्रयत्न करेन, असे येथे त्यांनी सांगितले. उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार अनिल देसाई, आमदार संजय शिरसाट, आमदार […]
जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्रकाशित केले: 18/09/2021मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनने जोडण्याचा पुनरुच्चार पैठणच्या संतपीठाचे उद्घाटन महानगरपालिकेच्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण. औरंगाबाद, दि.17, (जिमाका) :- येथील जिल्हा परिषद इमारतीचे बांधकाम अद्ययावत, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत करावे. यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली. औरंगाबाद जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकाम भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. याच कार्यक्रमात पैठणच्या संतपीठाचे ऑनलाइन […]
लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड
प्रकाशित केले: 23/08/2021लासूर स्टेशन येथे बजाज समूह आणि जिल्हा प्रशासनात सामंजस्य करार आळा घालण्यासाठी उपाययोजना औरंगाबाद, दिनांक 23 (जिमाका) : कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी शासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. यासह प्रत्येक पात्र नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी नागरिकांना केले. बजाज […]
ऑक्सिजनची नागरिकांना आवश्यकता भासूच नये – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
प्रकाशित केले: 15/08/2021मेल्ट्रॉन कोविड रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण औरंगाबाद, दिनांक 15 (जिमाका) : कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. यासाठी सर्वांनी जबाबदारीने या संकटापासून वाचण्यासाठी सातत्याने मास्कचा वापर, गर्दी टाळणे आणि सामाजिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) याचे पालन करणे आवश्यक आहे. मेल्ट्रॉन येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे (पीएसए प्लांट) आज लोकार्पण झाले. तरी या प्रकल्पातून निर्मित होणाऱ्या ऑक्सिजनची अधिक […]
जिल्ह्याचा विविध क्षेत्रात सर्वांगिण विकास – पालकमंत्री सुभाष देसाई
प्रकाशित केले: 15/08/2021ई-पीक पाहणीची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी पोखरा प्रकल्पात वैजापूर प्रथम तर सिल्लोड द्वितीय क्रमांकावर औरंगाबाद,दि. 15:- (जिमाका) :- ई-पीक पाहणी, स्मार्ट सिटी प्रकल्प, स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन, पाणी पुरवठा प्रकल्प योजना, अशा सर्व उपकमांची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी झालेली आहे. यासह अनेक नवनविन योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्याने उत्तरोत्तर विकास साध्य करावा अशा शुभेच्छा स्वातंत्र्यदिना निमित्त पालकमंत्री तथा […]