अवर्गीकृत

Filter by:
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते पोलिस बांधवांसाठी प्रतिक्षा कक्ष व सुसज्ज शौचालय बांधकामाचा शुभारंभ विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती जिल्ह्यातील पोलीस बांधवांना पायभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देवू- राज्यमंत्री अब्दुल सत्तार

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते पोलिस बांधवांसाठी प्रतिक्षा कक्ष व सुसज्ज शौचालय बांधकामाचा शुभारंभ विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती जिल्ह्यातील पोलीस बांधवांना पायभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देवू- राज्यमंत्री अब्दुल सत्तार

प्रकाशित केले: 10/08/2021

 औरंगाबाद, दिनांक 9 (जिमाका) :-  सोयगाव तालुक्यासह जिल्हा पोलिस दलाला सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून सोयगाव, फर्दापूर , अजिंठा याठिकाणी पोलीस ठाण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून येथे सुसज्ज नवीन पोलीस स्टेशन ईमारतीसाठी प्रस्ताव सादर करा यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री […]

औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका) : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत जिल्ह्यातील जून, जुलै महिन्यातील घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा‍ जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज घेतला. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी.जी. वाबळे, सहायक पोलिस आयुक्त रवींद्र साळोखे, पोलिस उपअधीक्षक एस.एस. केंद्रे , सहायक पोलिस निरीक्षक एन. के.चव्हाण आदींची उपस्थिती होती. जून महिन्यात चार बलात्कार, प्रत्येकी एक विनय भंग, जातीवाचक शिविगाळ, इतर चार असे एकूण दहा गुन्हे घडले. तर जुलैमध्ये एक बलात्कार, दोन विनयभंग, एक जातीवाचक शिविगाळ, इतर तीन असे एकूण सात गुन्हे घडल्याची माहिती श्री. वाबळे यांनी दिली.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला जिल्हा दक्षता समितीचा आढावा

प्रकाशित केले: 10/08/2021

औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका) :  अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत जिल्ह्यातील जून, जुलै महिन्यातील घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा‍ जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज घेतला. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  सभागृहात पार पडली.  यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी.जी. वाबळे, सहायक पोलिस आयुक्त रवींद्र साळोखे, पोलिस उपअधीक्षक एस.एस. […]

माझे झाड माझी जबाबदारी

माझे झाड माझी जबाबदारी ! – महसूलमंत्री अब्दुल सत्तार

प्रकाशित केले: 26/07/2021

औरंगाबाद, दि. 24 (जिमाका) –कोरोना संसर्गाच्या काळात आपण सर्वांनी ऑक्सिजनचे महत्व जाणलेच आहे. वृक्षारोपणाच्या माध्यमातून अधिकाधिक ऑक्सीजन निर्माण होऊन पर्यावरणाचे संतुलन राखणे काळाजी गरज झाली असल्याने प्रत्येक व्यक्तीने किमान एक झाड लावून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे असून ‘ माझे झाड माझी जबाबदारी ’ या उदे्शाने प्रेरित होऊन  जैवविविधता टिकवण्याकरीता नागरिकांनी हातभार लावावा, असे आवाहन महसूल, […]

छायाचित्र उपलब्ध नाही

औरंगाबाद येथील प्राणीसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे; परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठवावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रकाशित केले: 14/07/2021

मुंबई, दि. 13 : औरंगाबाद महापालिकेतर्फे मिटमिटा येथे सुरू असलेल्या प्राणीसंग्रहालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, त्यादृष्टीने लागणाऱ्या अतिरिक्त जागेचा तसेच निधीचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी लवकरात लवकर पाठवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.             वर्षा येथील समिती कक्षात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांच्यासह महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नगरविकास विभागाचे […]

सायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा -गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

सायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा -गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

प्रकाशित केले: 13/07/2021

औरंगाबाद, दिनांक 12(जिमाका)-तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन नागरिकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत असून  पोलिसांनी  प्रभावीपणे कारवाई करत सायबर आणि आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. पोलिस आयुक्तालयात आयोजित औरंगाबाद शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीत गृहमंत्र्यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त  डॉ. निखिल गुप्ता यांच्यासह शहर पोलीस […]

गुन्हे सिध्दतेचे प्रमाण वाढवावे - गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

गुन्हे सिध्दतेचे प्रमाण वाढवावे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

प्रकाशित केले: 13/07/2021

डिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार कोरोना काळात पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद औरंगाबाद, दिनांक 12 (जिमाका):- कायदा सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी  गुन्हे सिध्दतेचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. औरंगाबाद पोलिस परीक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते. यावेळी पोलिस महासंचालक संजय पांडे, विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम.एम.प्रसन्ना,  पोलिस आयुक्त […]

कोविड बचावासाठी लसीकरणच प्रभावी पर्याय

कोविड बचावासाठी लसीकरणच प्रभावी पर्याय – आरोग्य मंत्री राजेश टोपे

प्रकाशित केले: 05/07/2021

· जिल्हा परिषद प्रांगणात नऊ रुग्णवाहिकांचे लोकार्पण औरंगाबाद, दि. 2 (जिमाका) – कोविड लसीकरणास सुरुवात झालेली आहे. लशींचा पुरवठा अखंडित राहावा. कोविड-19 विषाणूच्या प्रतिबंधासाठी लसीकरणच एकमेव प्रभावी पर्याय आहे. या कामांना केंद्र शासनाकडून अधिक गती मिळावी, अशी अपेक्षा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आरोग्य सेवा विभागाच्यावतीने […]

छायाचित्र उपलब्ध नाही

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

प्रकाशित केले: 29/06/2021

औरंगाबाद, दिनांक 29 (जिमाका) : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत  यांचा औरंगाबाद दौरा पुढील प्रमाणे राहील. बुधवार, दिनांक 30 जून 2021 रोजी दुपारी 1 वा. जालना येथून औरंगाबादकडे प्रयाण. दुपारी 2 वा.औरंगाबाद येथे आगमन पदधिकाऱ्यांच्या भेटी व राखीव स्थळ- सुभेदारी शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद. दुपारी 2.30 वा. अदित्य ठाकरे मंत्री ( पर्यावरण ) यांच्या पुढाकाराने देण्यात […]

आरोग्य सुविधेबाबत औरंगाबाद जिल्ह्याने रोल मॉडेल म्हणून काम करावे

आरोग्य सुविधेबाबत औरंगाबाद जिल्ह्याने रोल मॉडेल म्हणून काम करावे – पालकमंत्री सुभाष देसाई

प्रकाशित केले: 28/06/2021

जिल्हा परिषदेच्या विकास कामांचा घेतला आढावा औरंगाबाद, दि.28, (जिमाका):- जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने आरोग्य सुविधेविषयीचे रोल मॉडेल म्हणून काम करावे, तसेच रोड मॉडेल म्हणून काम करत असताना ग्रामीण भागात सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक असणारे प्रस्ताव तत्काळ सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आज दिले. […]

सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुर्णाकृती पुतळा म्हणजे मुर्तीमंत तेज

सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुर्णाकृती पुतळा म्हणजे मुर्तीमंत तेज – पालकमंत्री सुभाष देसाई

प्रकाशित केले: 28/06/2021

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महानगरपालिकेद्वारे संचलित पेट्रोलपंपाचे उद्घाटन औरंगाबाद, दि.28, (जिमाका):- भारताच्या इतिहासात सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव आदराने घेतले  जाते, त्यांनी भारताला अखंड ठेवण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. शहरातील शहागंज भागात उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुर्णाकृती पुतळा हा मुर्तीमंत तेज असून  हा पुतळा  आपल्या सर्वांना देशभक्तीची प्रेरणा देत राहिल असे उद्गार […]