पत्रक
ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निर्गमित केले आदेश
प्रकाशित केले: 16/04/2021औरंगाबाद दि 15 (जिमाका): जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबादचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 साथ रोग अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये औरंगाबाद जिल्ह्यात (पोलिस आयुक्त औरंगाबाद (शहर) यांचे कार्यक्षेत्र वगळून) दिनांक 01 मे, 2021 रोजीचे सकाळी 07.00 वा. अखेर संचारबंदी लागू राहणार असल्याचे आदेशाव्दारे कळविले आहे. या आदेशातील खालील नमूद इतर सर्व बाबी हया संपुर्ण औरंगाबाद जिल्हयासाठी (शहरासह) लागू राहतील. […]
कोरोना प्रतिबंधासाठी ग्रामीण पातळीवरील प्रशासकीय यंत्रणा आणि उद्योग समूह यांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 14/04/2021औरंगाबाद, दि.12, (जिमाका) :- जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीने स्वयंप्रेरणेने आपली सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून काम करावे असे आवाहन आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांच्या संघटनांच्या प्रतिनिधी सोबत असलेल्या कोरोना लसीकरण आणि आरटीपीसीआर तपासणी यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात […]
संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर उपचार सुविधांसह यंत्रणा सज्ज -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 12/04/2021ऑक्सीजन वापर आरोग्य क्षेत्रासाठी प्राधान्याने औरंगाबाद, दिनांक 12(जिमाका)-जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी चाचण्यांमध्ये भरीव वाढ करण्यात येत असून संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर उपचार सुविधांसह यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, आ. हरीभाऊ बागडे, […]
कोरोनावर नियंत्रणासाठी शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक : केंद्रीय पथकाचे मत
प्रकाशित केले: 12/04/2021औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, त्यावर नियंत्रणासाठी शासनाच्या सर्व नियमांचे नागरिकांनी पालन करणे आवश्यक आहे. सध्याचा काळ कठीण आहे, परंतु औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत, असे म्हणत केंद्रीय पथकाने प्रशासनाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड 19 च्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक पार पडली. बैठकीस डॉ.दीपक भट्टाचार्य, डॉ.अभिजित पाखरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदवले, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी नीता पाडळकर आदींसह आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार सर्वत्रच झाला आहे. मृत्यूचा दर कमी करण्यावर प्रशासनाने भर द्यायला हवा. ऑक्सिजन खाटा आवश्यक त्या रुग्णांना उपचारादरम्यान मिळाव्यात. ज्यांना ऑक्सिजन खाटा आवश्यक नाही, त्यांनी अशा खाटा अडवून ठेवणे उचित नाही, त्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी. त्याचबरोबर रेमडीसीविअर इंजेक्शन, एचआरसिटी चाचणी, गृह विलगीकरण, लसीकरण, कंटेंटमेंट झोन, मनुष्यबळ क्षमता बांधणी, याबाबतही डॉ.पाखरे आणि डॉ. भट्टाचार्य यांनी आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच प्रशासनाने राबवलेल्या उपाय योजनांबाबत समाधान व्यक्त केले. सुरुवातीला जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्वसमावेशक अशी कोविड परिस्थिती आणि प्रशासनाच्या उपाय योजनांबाबत पथकातील सदस्यांना माहिती दिली. यामध्ये जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील कोविड स्थिती आणि दुसऱ्या टप्प्यातील स्थिती, यावर प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या उपाययोजना, उपलब्ध सुविधा, त्यात केलेली वाढ, रुग्ण संख्या शोध, रुग्णांवर उपचार, कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी केलेले प्रयत्न, ऑक्सिजन साठा, त्याची उपलब्धता, लसीकरण मोहीम, मृत्यू दर आदीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती सादर केली, त्यावर पथकातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले. डॉ.पाडळकर यांनीही मनपाच्यावतीने शहरात राबविण्यात येत असलेली कार्यपद्धती, सर्वेक्षण, जनजागृती, कंटेंटमेंट झोन, स्टिकर्स चिटकवण्याबाबत माहिती दिली.
मेल्ट्रॉन, जिल्हा सामान्य रुग्णालय, घाटीला जिल्हाधिकारी यांनी दिली भेट
प्रकाशित केले: 12/04/2021ऑक्सिजन प्लांट, स्वच्छता आदींबाबत केल्या सूचना औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका) : शहरातील चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट दिली. तसेच येथील आवश्यक सोयीसुविधांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट,कोविड वॉर्ड,लॅब इत्यादींची पाहणी करत संपूर्ण […]
महात्मा फुले जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी
प्रकाशित केले: 12/04/2021औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका) : महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी केंद्रीय पथकातील डॉ. दीपक भट्टाचार्य, डॉ.अभिजित पाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदवले, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार आदींनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
कोविड रुग्णांसाठी दर्जेदार सुविधा वेळेत उपलब्ध करुन देण्यात याव्यात – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 09/04/2021औरंगाबाद, दि.08, (जिमाका) :- कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय उपचाराच्या सुविधांची पाहणी घाटी रुग्णालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केली. नव्याने तयार करण्यात येत असलेल्या कोरोना वार्ड क्रमांक-4 या ऑक्सिजन व्हेंटिलेटरसह बेडची अतिरिक्त सुविधा उपलब्धेसाठी तयार करण्यात येत असलेल्या वार्डाची पाहणी करतेवेळी जिल्हाधिकारी यांनी घाटी रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणांना सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त अधिष्ठाता डॉ.वर्षा रोठे यांच्यासह आरोग्य […]
रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता पडू देणार नाही – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 05/04/2021औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका) :- सध्या जिल्ह्यात 4 रुग्णालयांच्या माध्यमातून 61 केएल एवढी लिक्वीड ऑक्सिजन साठवणूक क्षमता आहे. शिवाय 33 केएल एवढ्या साठवणूक क्षमतेचे काम सुरू आहे. सध्याची कोविड 19 ची परिस्थिती पाहता जिल्ह्यात रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू देणार नसल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. आकस्मिक परिस्थितीमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुरळीत राहणसाठी करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने […]
‘मिशन बिगेन अगेन’मधील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 05/04/2021· नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी · विविध विभागांच्या पथकांची नियुक्ती औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका) :- सध्याची कोविडची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने मिशन बिगेलमधील तरतुदी 15 एप्रिल पर्यंत लागु केलेल्या आहेत. या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करुन कोरोना आटोक्यात आणावा असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. ि महाराष्ट्र शासनाच्या Mission Begin Again च्या गाईडलाईन्सची जिल्हयामध्ये अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी […]
लॉकडाऊनमध्ये नियमांचे कोटेकोर पालन करुन रुग्ण संख्या नियंत्रणात आणणार -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 31/03/2021· मुलाखतीनंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या डॉक्टरांचा परवाना रद्द करणार · लसीकरणाचा वेग वाढविणार · बेडची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार औरंगाबाद, दि.30 (जिमाका) – औरंगाबाद जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या पाहता यावर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने प्रशासनाला टप्याटप्याने पण काही कठोर निर्णय घेणे आवश्यक होते. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सुरूवातीला रात्रीची संचारबंदी, त्यानंतर अंशत: लॉकडाऊन आणि आता संपूर्ण […]