पत्रक
पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम
प्रकाशित केले: 26/02/2021औरंगाबाद, दिनांक 25 (जिमाका): उद्योग खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. शुक्रवार, 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.50 वा. विमानाने औरंगाबादकडे प्रयाण. सकाळी 9.50 वा. औरंगाबादमध्ये आगमन. सकाळी 10.15 ते 11.15 वाजेपर्यंत बाळासाहेब ठाकरे स्मृतीवनाला भेट व पाहणी. सकाळी 11.15 ते 1 राखीव. […]
औरंगाबाद ग्रामीण भागात 37 (1) (3) कलम लागू
प्रकाशित केले: 25/02/2021औरंगाबाद, दिनांक 24 (जिमाका): औरंगाबाद ग्रामीण भागात सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (37) (3) अन्वये प्रतिबंध घालण्याचे आदेश प्र.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिले आहेत. हा आदेश 7 मार्च पर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात म्हटले आहे. यामध्ये औरंगाबाद ग्रामीण भागात […]
जिल्हाधिकारी कार्यालयात होणार संशयित अभ्यागतांची अँटिजेन कोरोना चाचणी
प्रकाशित केले: 25/02/2021औरंगाबाद, दिनांक.24 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन कामकाजनिमित्त येणा-या नागरिक/अभ्यागतांकरिता कार्यालयात भेटी पूर्वी कोविड -१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शरीरातील ऑक्सीजन व तापमानाची तपासणी करण्यात येते. या तपासणीमध्ये जर कुणी अभ्यागत कोरोना संसर्ग संशयित आढळून आले तर त्यांची कोरोना रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट (RAT) प्रवेशव्दारावर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सध्यस्थितीत कोरोनाचा पुन:श्च प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा […]
वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर उपचार सुविधा सज्ज ठेवाव्यात – प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे
प्रकाशित केले: 23/02/2021प्रशासनासह नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे औरंगाबाद, दि. 22 (जिमाका) : राज्यात आणि जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता सर्वत्र वर्तवली जात असून त्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील सर्व उपचार सुविधा पूरेशा मनुष्यबळासह सज्ज ठेवण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी आज येथे संबंधितांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना […]
लॉकडाऊन कालावधी 28 फेब्रुवारी पर्यंत वाढवल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याव्दारा जारी
प्रकाशित केले: 17/02/2021औरंगाबाद, दिनांक 17 (जिमाका): राज्य शासनाने कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन, सदर कायद्यातील खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली आहे. तसेच आरोग्य मंत्रालय भारत सरकार, आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या इतर लोकांनी […]
शिवजयंती साजरी करण्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या सूचना
प्रकाशित केले: 16/02/2021औरंगाबाद, दिनांक- 16 (जिमाका) : फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार औरंगाबाद जिल्हयासाठी (पोलिस आयुक्त(शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) 19 फेब्रुवारी रोजी साजरा होणा-या “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” उत्सवानिमित्त औरंगाबाद जिल्हयातील जनतेला काय करावे आणि काय करु नये याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित केल्या आहेत. अ.क्र. काय करावे काय […]
कोरोना विरुद्ध लढाईत लोक कलापथकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जनजागृती महत्वाची ठरणार आहे – अपरजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे
प्रकाशित केले: 15/02/2021औरंगाबाद जिल्ह्यात आत्मनिर्भरभारत, COVID-19 लसीकरण जनजागृती पर चित्ररथ व लोक कलापथकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन औरंगाबाद, दिनांक- 15 (जिमाका):कोरोना विरुद्ध लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि या लढाईत लोक कलापथकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जनजागृती महत्वाची ठरणार आहे असे प्रतिपादन अपरजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा प्रदेश) च्या वतीने आत्मनिर्भरभारत, COVID-19 लसीकरण जनजागृती चित्ररथाच्या उद्घाटन प्रसंगी […]
भूजल अधिनियमानुसार 30 गावांतील 72 उद्भव जाहीर
प्रकाशित केले: 12/02/2021औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका): मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. औरंगाबाद यांचेकडून प्राप्त सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे गतवर्षी निर्माण करण्यात आलेल्या स्त्रोत जाहीर प्रगटन काढून प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. त्यावर कोणाचेही काही आक्षेप, सूचना अथवा हरकती प्राप्त झालेले नाहीत. महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 ची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जाहीर प्रगटनाव्दारे प्रसिद्ध करण्यात आलेले जिल्ह्यातील 30 गावांतील […]
मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांना आवाहन
प्रकाशित केले: 12/02/2021औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका): 108 औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघात, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, परंतु फोटो नाही अशा मतदारांनी, त्यांचा फोटो व त्यांचा सध्याचा रहिवासी पुरावा 20 फेब्रुवारी 2021 रोजी पर्यंत तहसिल कार्यालय, औरंगाबाद येथील निवडणूक शाखेत आणून द्यावा. नसता, सदर मतदार हे स्थलांतरीत झाल्याचे समजून त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल. तसेच […]
वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
प्रकाशित केले: 11/02/2021औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका): जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक मूल्य दर तक्ते सन 2021-22 तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत नगर रचना मूल्यांकन विभागाचे सहाय्यक संचालक अ.वा. गोडघासे यांनी वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करण्याच्या कार्यपद्धतीबाबत जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली. खरेदी-विक्री व्यवहाराची अनुषंगिक माहितीच्या आधारे वार्षिक मूल्य दर तक्ते अद्यावत […]