पत्रक

Filter by:
शासकीय कला महाविद्यालयाचे जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार

शासकीय कला महाविद्यालयाचे जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 01/02/2021

औरंगाबाद,दिनांक.30(जिमाका): औरंगाबाद जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. शहरातील  शासकीय कला महाविद्यालयास एक प्रकारे ऐतिहासिक मुल्य आहे. परंतु विविध कारणामुळे ऐतिहासिक इमारतीची जीर्णाअवस्था  झाली आहे. परंतु यापुढे जिल्ह्याचा ऐतिहासीक वारसा जतन करुन कला शिक्षण  व पर्यटन वाढीच्या दृष्टीनेही  शासकीय कला महाविद्यालयाचे जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी  मदत करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. […]

ग्रामीण भागातील लसीकरण पूर्ण करा

ग्रामीण भागातील लसीकरण पूर्ण करा – डॉ. अनंत गव्हाणे

प्रकाशित केले: 28/01/2021

औरंगाबाद, दिनांक 27 (जिमाका) :  कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील सर्वांना लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणामध्ये ग्रामीण भागातील लसीकरण पूर्ण करण्यावर अधिक भर द्यावा, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी यंत्रणांना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोना लसीकरण आढावा बैठक श्री. गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन […]

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्हाधिकारी कार्यालयात 1 रोजी लोकशाही दिन

प्रकाशित केले: 28/01/2021

औरंगाबाद, दिनांक 27 (जिमाका) :  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येतो.   फेब्रुवारी महिन्याचा लोकशाही दिन 1 फेब्रुवारी रोजी दु. 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविले आहे. लोकशाही दिनामध्ये  पोलि.स आयुक्त, पोलिस अधीक्षक (ग्रामीण), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, […]

लोकशाहीवरचा विश्वास अधिक दृढ करा - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

लोकशाहीवरचा विश्वास अधिक दृढ करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 27/01/2021

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त उपस्थितांनी घेतली शपथ औरंगाबाद, दिनांक 25 (जिमाका) : लोकशाहीवरचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केले. एमजीएम परिसरातील रूख्म‍िणी सभागृहात आयोजित राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, ले.कर्नल व्यंकटेश पी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. […]

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

प्रकाशित केले: 27/01/2021

औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) :  औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, संगिता सानप, संगिता चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

लोकशाहीवरचा विश्वास अधिक दृढ करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 27/01/2021

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त उपस्थितांनी घेतली शपथ औरंगाबाद, दिनांक 25 (जिमाका) : लोकशाहीवरचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केले. एमजीएम परिसरातील रूख्म‍िणी सभागृहात आयोजित राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, ले.कर्नल व्यंकटेश पी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. […]

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

प्रकाशित केले: 27/01/2021

360 कोटींचा आराखडा मंजूर वाढीव निधीतून जिल्ह्यातील गरजा पूर्ण होणार मानव विकास निर्देशांक वाढीसाठी प्रयत्न क्रीडा विद्यापीठ स्थापन्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न 160 कोटींची नवीन गुंतवणूक जिल्ह्यात होणार औरंगाबाद, दि.25, (जिमाका) :- सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी 360 कोटींचा आराखडा मंजूर केला असून औरंगाबाद शहराच्या सर्वांगिण विकासाबरोबरच आरोग्य, शिक्षण, […]

खेळाच्या सरावासाठी विभागीय क्रीडा संकुल खुले -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

खेळाच्या सरावासाठी विभागीय क्रीडा संकुल खुले -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 25/01/2021

विविध क्रीडा प्रकारच्या खेळाडूंशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद राष्ट्रीय मतदार दिवसांची खेळाडूंसोबत घेतली शपथ औरंगाबाद, दिनांक 25 (जिमाका): कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विभागीय क्रीडा संकुल नऊ महिने बंद होते, परंतु आता काही अटी व शर्तींच्या अधीन राहून विविध खेळांच्या सरावासाठी विभागीय क्रीडा संकुल खुले केल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले. […]

छायाचित्र उपलब्ध नाही

एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र पाहण्यासाठी प्रशासनाची परवानगी

प्रकाशित केले: 20/01/2021

  औरंगाबाद,दिनांक.20(जिमाका): औरंगाबाद येथील एपीजे अब्‍दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्‍लब तसेच 3-D थियटर आणि तारांगण विद्यार्थी व नागरिकांना पाहण्‍यासाठी या विज्ञान केंद्राच्या  मागणी प्रमाणे अटी व शर्तींच्‍या अधीन राहून परवानगी देण्‍यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निर्गमित केले आहेत. सेंटरच्‍या व्‍यवस्‍थापनामधील सर्व अधिकारी, कर्मचारी,साधन व्‍यक्‍ती इत्‍यादींची कोव्‍हीड-19 च्‍या अनुषंगाने RT-PCR चाचणी करणे बंधनकारक […]

छायाचित्र उपलब्ध नाही

लसीकरण मोहीमेच्या यशस्वीतेसाठी सज्ज रहावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 20/01/2021

औरंगाबाद, दिनांक 20 (जिमाका) :कोविड प्रतिबंधात्मक उपायांमध्ये लसीरण महत्वाचे असून त्यादृष्टीने जिल्ह्यात ही मोहीम यशस्वी करण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात लसीकरण मोहीमेंतर्गत करण्यात आलेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला. बैठकीस जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, […]