पत्रक

Filter by:
छायाचित्र उपलब्ध नाही

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा आज शुभारंभ

प्रकाशित केले: 09/12/2020

औरंगाबाद दि. 08 (जिमाका) – सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2020 संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथील सभागृहामध्ये होणार आहे. हा कार्यक्रम विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंती साजरी

प्रकाशित केले: 09/12/2020

औरंगाबाद दि. 08 (जिमाका) – संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  यावेळी  अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, मंदार वैद्य जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष झुंजारे, नायब तहसीलदार उद्धव नाईक आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती […]

छायाचित्र उपलब्ध नाही

महाआवास ग्रामीण अभियानाची विभागीय कार्यशाळा संपन्न महाआवास योजनेचा उपायुक्त डॉ.अविनाश गोटे यांनी घेतला आढावा

प्रकाशित केले: 09/12/2020

औरंगाबाद, दिनांक 08 (जिमाका) :- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत 2020 पर्यंत सर्वांसाठी घरे या धोरणाअंतर्गत महाआवास ग्रामीण अभियानातंर्गत विहित कालावधीत घरकुल उपलब्ध करुन द्यावेत. यासाठी विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, अटल बांधकाम […]

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली करणार

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली करणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 09/12/2020

टुरिस्ट गाईड आणि पर्यटकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केवळ ऑनलाईन तिकिट नोंदणी करता येणार पर्यटकांना मर्यादित प्रवेश ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक औरंगाबाद दि. 08 (जिमाका) – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानूसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत बंद ठेवण्यात आलेली अजिंठा, वेरूळ, दौलताबाद, बिबी का मकबरा ही पर्यटनस्थळे उद्या दिनांक 10 डिसेंबर पासून पर्यटकांसाठी खुली करावीत. त्यादृष्टीने यंत्रणांनी प्रतिबंधात्मक […]

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना द्या

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना द्या – अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे

प्रकाशित केले: 08/12/2020

औरंगाबाद, दिनांक 07 (जिमाका) : केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी असलेली प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसह शहरातील लाभार्थ्यांपर्यंत अधिकाधिक प्रमाणात पोहोचविण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या जिल्हास्तरीय सुकाणू व संनियंत्रण समितीची बैठक श्री. गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.व्ही.कुलकर्णी, जिल्हा […]

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम परिणामकारकरित्या राबवा

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम परिणामकारकरित्या राबवा – अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे

प्रकाशित केले: 08/12/2020

औरंगाबाद, दिनांक 07 (जिमाका) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात परिणामकारकरित्या राबवावा. सर्व शैक्षणिक संस्थांनी 100 यार्डच्या परिघात तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन विक्रीस प्रतिबंध असल्याचे फलक लावावेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास, थुंकण्यास प्रतिबंधासाठी कार्यालयात उल्लंघण करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना […]

छायाचित्र उपलब्ध नाही

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा, निवासी शाळा, वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 07/12/2020

औरंगाबाद, दिनांक 4 (जिमाका) – औरंगाबाद जिल्‍हयातील आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्‍य निवासी शाळा व नववी ते बारावीच्‍या विद्यार्थ्‍यांकरीता आदिवासी विभागांतर्गत असलेले शासकीय वसतिगृहे सुरु करण्‍यास मान्‍यता देण्यात येत आहे,असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी  कळवले आहे. संबंधित सर्व शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांनी जिल्‍हयातील प्राथमिक आरोग्‍य केंद्र, ग्रामीण रुगणालय, उपजिल्‍हा रुग्‍णालय व महानगरपालिका रुग्‍णालयात, मनपाने निश्चित […]

छायाचित्र उपलब्ध नाही

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या सूचना

प्रकाशित केले: 07/12/2020

औरंगाबाद, दिनांक 4 (जिमाका) – फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी (पोलिस आयुक्‍त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळुन) 06 डिसेंबर रोजी  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 64 व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्‍त औरंगाबाद जिल्‍हयातील सर्व जनतेला काय करावे आणि काय करु नये याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुढीलप्रमाणे जनतेला सूचना केल्या आहेत. अ.क्र. काय करावे काय करु नये     1.     कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या नगर […]

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क

प्रकाशित केले: 01/12/2020

  औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका) : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी किल्लेअर्क परिसरातील शासकीय महाविद्यालयात आज दुपारी 12 वाजता औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर श्री. चव्हाणे म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील 206 मतदान केंद्रांवर या निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्वोतोपरी तयारी केलेली आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. […]

छायाचित्र उपलब्ध नाही

शहर भागात 37 (1)(3) कलम लागू

प्रकाशित केले: 01/12/2020

          औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका) : औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र  पोलीस अधिनियम 1951 च्या  37 (1) व (3) कलमान्वये  जिल्ह्याच्या  शहरी हद्दीत दिनांक 14  डिसेंबर 2020  पर्यंत  शस्त्रबंदी आणि जमावबंदी  आदेश  लागू केला आहे, असे पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.