पत्रक
मतदान केंद्राचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध
प्रकाशित केले: 30/11/2020औरंगाबाद ,दि.29 (जिमाका):- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातील “औरंगाबाद जिल्हयातील पदवीधर मतदारांना” त्यांचे मतदान केंद्र व मतदान केंद्र इमारतीचा तपशील कळावा याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक विभागाने मुख्य निवडणूक अधिकारी यांचेमार्फत उपलब्ध करुन दिलेली लिंक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://chhatrapatisambhajinagar.maharashtra.gov.in/05-aurangabad-division-graduate-constituency-election-2020/ या संकेतस्थळावर ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२० अंतर्गत “आपले […]
औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
प्रकाशित केले: 30/11/2020औरंगाबाद, दिनांक 29 (जिमाका) : 05 औरंगाबाद पदवीधर मतदार पदवीधर मतदार संघाची निवडणूक 01 डिसेंबर रोजी होत असून मतमोजणी 03 डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आलेले आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून करण्यात आलेली तयारी पुढीलप्रमाणे आहे. जिल्ह्यात एक लक्ष सहा हजार 379 मतदार आहेत. त्यामध्ये पुरूष 74959, महिला 31415 […]
मत कसे नोंदवावे याबाबत जिल्हाधिकारी यांच्या सूचना
प्रकाशित केले: 30/11/2020औरंगाबाद ,दि.29 (जिमाका):- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेसाठी व्दिवार्षिक निवडणूक 2020 करीता मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत पुढील सूचना केलेल्या आहेत. मतदान करण्यासाठी केवळ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केचपेनचाच वापर करावा. याशिवाय तुमची मतपत्रिका अवैध ठरेल असे इतर कुठलेही […]
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार
प्रकाशित केले: 30/11/2020औरंगाबाद ,दि.29 (विमाका):- आगामी 1 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन […]
सरपंच पदाचे आरक्षण निश्चितीकरीता सभेचे आयोजन
प्रकाशित केले: 30/11/2020औरंगाबाद,दि, 28 :- (जि.मा.का.)औरंगाबाद जिल्ह्यातील 09 तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाचे आरक्षण वाटप करण्यात आलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 09 तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 08 डिसेंबर 2020 रोजी सभेचे आयोजन तालुकास्तरावर करण्यात आलेले आहे. सभेच्या आयोजनाच्या वेळी कोरोना कोव्हीड-19 संबधाने सार्वजनिक आरोग्य विभाग व मदत व पुनवर्सन विभाग यांनी वेळोवेळी दिलेल्या आरोग्य […]
औरंगाबाद पदवीधर मतदार निवडणूक 2020 मतदारासाठी सूचना
प्रकाशित केले: 30/11/2020औरंगाबाद ,दि.28 (जिमाका):- येत्या 1 डिसेबंर रोजी मराठवाड्यातील 8 ही जिल्हयात पदवीधर मतदासंघाच्या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. यावेळी मतदान करताना पदवीधर मतदारांनी योग्य पध्दतीने मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा यासाठी मतदान करताना कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवून मतदान करावे याविषयी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे करण्यात आल्या आहेत. मतदान करण्यासाठी केवळ मतपत्रिकेसोबत […]
मतदान केंद्राचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध
प्रकाशित केले: 30/11/2020औरंगाबाद,दि.(जिमाका)- ०५- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातील “औरंगाबाद जिल्हयातील पदवीधर मतदारांना” त्यांचे मतदान केंद्र व मतदान केंद्र इमारतीचा तपशील कळावा याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक विभागाने मुख्य निवडणूक अधिकारी यांचेमार्फत उपलब्ध करुन दिलेली लिंक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://chhatrapatisambhajinagar.maharashtra.gov.in/05-aurangabad-division-graduate-constituency-election-2020/ या संकेतस्थळावर ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२० अंतर्गत “आपले […]
मतमोजणी प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडा -विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर
प्रकाशित केले: 26/11/2020औरंगाबाद, दि.26 (जिमाका) : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 ची मतमोजणी प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज अधिकारी, कर्मचारी यांना दिल्या. चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. येथे आयोजित मतमोजणी प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. केंद्रेकर बोलत होत. यावेळी निवडणूक निरीक्षक बी. वेणूगोपाल […]
आचार संहितेचे पालन करत निवडणूक प्रक्रिया सतर्कतेने पार पाडावी-मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह
प्रकाशित केले: 26/11/2020औरंगाबाद, दि.26 (जिमाका) : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत आचारसंहितेचे पालन करत कोवीडच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेने सर्व उपाय योजना सज्ज ठेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देश प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज येथे दिले. आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात औरंगाबाद विभागातील आठही जिल्ह्यांच्या निवडणूक विषयक पूर्व तयारीचा आढावा प्रधान सचिव तथा मुख्य […]
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 3 लाख 74 हजार 45 मतदार तर 813 मतदान केंद्र
प्रकाशित केले: 25/11/2020औरंगाबाद ,दि.25 (विमाका):- येत्या 01 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी विभागातील आठ जिल्ह्यात एकूण 3 लाख 74 हजार 45 मतदार असून मतदानासाठी एकूण 813 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्हानिहाय मतदार व मतदान केंद्रांची संख्या पुढील प्रमाणे आहे. मतदान केंद्रांची संख्या कंसात दर्शविली आहे. 1) औरंगाबाद-106379 (206) 2) जालना- 29765 (74) 3) […]