पत्रक
जिल्हाधिकारी कार्यालयात युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक संपन्न
प्रकाशित केले: 24/11/2020औरंगाबाद, दि.24 (जिमाका) : भारत सरकारच्या औरंगाबादेतील नेहरू युवा केंद्राच्या वतीने जिल्ह्यात विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक संकल्प शुक्ला यांनी यंदा घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. बैठकीस कौशल्य विकास विभागाचे एन. एन. सुर्यवंशी, बी. आर. रिठे, घाटीचे […]
निरपेक्ष, सकारात्मक वृत्तीने निवडणूक कामकाज पार पाडा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 24/11/2020सिल्लोड येथे निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण औरंगाबाद, दि.24 (जिमाका) : औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांनी निरपेक्ष, सकारात्मक वृत्तीने निवडणूक कामकाज पार पाडावे. त्याचबरोबर कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सिल्लोड येथील शासकीय तंत्र […]
प्राधान्याने पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 24/11/2020औरंगाबाद, दि.24 (जिमाका) : धरणातील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून प्राधान्याने पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना सुनील चव्हाण , जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,कालवा सल्लागार समिती, औरंगाबाद यांनी येथे दिल्या. औरंगाबाद, जालना व परभणी या जिल्ह्यास वरदान ठरलेल्या मराठवाडा विभागातील जायकवाडी, निम्न दुधना, नांदूर मधमेश्वर कालवा या मोठे प्रकल्पावरील सिंचन पाणी नियोजनासाठी प्रथम पाणीपाळी राबविणेच्या […]
कोरोना पार्श्वभूमीवर दक्षता घेत मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी – उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे
प्रकाशित केले: 23/11/2020औरंगाबाद, दि.20 (जिमाका) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण दक्षता घेत व सूचनांचे पालन करीत औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी तथा नोडल आरोग्य अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी केली. आज मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे पदवीधर निवडणूक प्रशिक्षण आयोजित करण्यात […]
पदवीधर मतदार संघ निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 20/11/2020v नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा घेतला आढावा औरंगाबाद, दि.20 (जिमाका) : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 च्या अनुषंगाने नोडल अधिकारी यांनी निवडणुकीत आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी योग्य कार्यवाही पार पाडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नोडल अधिकारी यांची आढावा बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तत्पूर्वी पोलिस बंदोबस्त नियोजनाबाबतही त्यांनी […]
कोविडच्या संसर्ग वाढीची शक्यता लक्षात घेऊन यंत्रणांनी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 19/11/2020कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे औरंगाबाद, दिनांक 19 (जिमाका) : कोविड-19 च्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पाश्वभूमीवर चाचण्यांचे आणि जनजागृतीचे प्रमाण वाढवावे तसेच जिल्ह्यातील कोवीडसाठी वाढवण्यात आलेल्या सर्व आरोग्य उपचार सुविधा पूर्ण क्षमतेने जानेवारी पर्यंत सुरू ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबतच्या […]
मतमोजणी केंद्रास विभागीय आयुक्तांनी दिली भेट चोख व्यवस्था ठेवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
प्रकाशित केले: 19/11/2020औरंगाबाद, दि.19 (जिमाका) :- आौरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या शहरातील मराठवाडा रिअल्टर्स प्रा. लि. येथील मतमोजणी केंद्रातील व्यवस्थेची पाहणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच मतमोजणी केंद्रावर सर्व व्यवस्था उत्तम, चोख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. पाहणी दरम्यान श्री. केंद्रेकर यांच्यासमवेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. […]
राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेत इंदिरा गांधी जयंती साजरी
प्रकाशित केले: 19/11/2020औरंगाबाद, दि.19 (जिमाका) :- देशाच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. सुरूवातीला इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस श्री. चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनीही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस […]
शहर भागात 37 (1)(3) कलम लागू
प्रकाशित केले: 19/11/2020औरंगाबाद, दि.18 (जिमाका) :- औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या 37 (1) व (3) कलमान्वये जिल्ह्याच्या शहरी हद्दीत दिनांक 29 नोव्हेंबर 2020 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध v हरकती, सूचना 15 डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन
प्रकाशित केले: 19/11/2020औरंगाबाद, दि.18 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक 01.01.2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर कार्यक्रमानुसार दिनांक 01.01.2021 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी औरंगाबाद जिल्ह्यातील 09 विधानसभा मतदारसंघांतर्गत सर्व मतदान केंद्रावर, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय इ. ठिकाणी दिनांक […]