पत्रक
पोस्टाची घरपोच जीवन प्रमाण सुविधा सुरू
प्रकाशित केले: 05/11/2020औरंगाबाद, दि.5 (जिमाका) – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून भारतीय डाक विभागाने “घरपोच” जीवन प्रमाण (डिजिटल जीवन प्रमाणपत्र, हयातीचा दाखला) सुविधा सुरू केली आहे. विशेषत: सध्याच्या परिस्थितीत पेन्शनधारकांसाठी हा मोठा दिलासा ठरेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनर त्यांच्या पोस्टमन किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकतात, असे पोस्ट विभागाने कळविले आहे. याशिवाय ‘postinfo’ ॲप डाउनलोड […]
कृषी विभागाच्या नियोजनाप्रमाणे खत उत्पादक कंपन्यांनी खताचा पुरवठा करावा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 05/11/2020औरंगाबाद, दि.5 (जिमाका) – खत उत्पादक कंपन्यांनी पुढील खरीप हंगामाची तयारी आतापासून करावी. येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये कृषी विभागाच्या महिनानिहाय नियोजनाप्रमाणे खत उत्पादक कंपनीने खताचा पुरवठा करावा. यावर कृषी विभागाने योग्य ते नियंत्रण ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या. खरीप हंगामात जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमानापेक्षा 156 टक्के पाऊस झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या रब्बी हंगाम […]
एमएचटी सीइटीचे अतिरिक्त सेशन 07 रोजी
प्रकाशित केले: 05/11/2020औरंगाबाद, दि.5 (जिमाका) – राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्या मार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रावर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी विज्ञान प्रवेशासाठी घेण्यात येणारी (MHT-CET)2020 अतिरिक्त सेशन 7 नोव्हेंबर रोजी आयऑन डिजिटल झोन, एमआयडीसी पोलीस स्टेशन, चिकलठाणा जवळ होणार आहे. परीक्षेसाठी 131 उमेदवारांना प्रवेश देण्यात आलेला आहे. परीक्षेच्या वेळेचा तपशील 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 12 […]
इस्रोच्या निबंध स्पर्धेत औरंगाबादची आर्या देशात सातवी · जिल्हाधिकाऱ्यांकडून आर्याचे कौतूक व गौरव
प्रकाशित केले: 05/11/2020औरंगाबाद, दि.5 (जिमाका) :- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ‘इस्रो सायबरस्पेस कॉम्पिटिशन 2020’ निबंध स्पर्धेचे आयोजन ऑनलाइन स्वरूपात केले होते. या स्पर्धेत औरंगाबादच्या वूडरिज शाळेच्या आर्या वैष्णव हिने देशात सातवा क्रमांक पटकावला. यासंबंधीची माहिती इस्त्रोने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना पत्राव्दारे कळविली. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी कौतुकास पात्र असलेल्या आर्यास जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून तिच्या या कामगिरीचे […]
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी विभागीय स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना
प्रकाशित केले: 05/11/2020औरंगाबाद, दि. 4 (विमाका) – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांच्या तक्रारीची दखल घेण्याकरीता विभागीय स्तरावर मुख्यालयाच्या ठिकाणी 24X7 तत्त्वावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द झाल्यापासून म्हणजे दिनांक 05 नोव्हेंबर 2020 पासून ते निवडणुकीची प्रक्रिया संपेपर्यंत विभागीय स्तरावर मुख्यालयाच्या ठिकाणी 24X7 तत्वावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात […]
जिल्हाधिकारी यांनी केली शहाजी राजे यांच्या गढी-स्मारकाची पाहणी
प्रकाशित केले: 04/11/2020औरंगाबाद, दिनांक 03 (जिमाका) :- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज शहाजीराजे यांच्या वेरूळ येथील गढीची आणि स्मारक स्थळाची पाहणी केली. यावेळी समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार निखिल धुळधर, गट विकास अधिकारी श्री.सुरडकर, पुरातत्व विभागाचे समन्वयक कामाजी डक, पुरातत्व उपआवेष्क बालाजी बनसोडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते शहाजी राजे […]
कलम 144 (1)(3) अन्वये जिल्हादंडाधिकाऱ्यांव्दारा जिल्ह्यात मनाई आदेश जारी
प्रकाशित केले: 04/11/2020औरंगाबाद, दिनांक 03 (जिमाका) : शासन आदेशानुसार मिशन बिगीन अगेन अंतर्गत लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 30 नोव्हेंबर 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) मधील तरतुदीनुसार जिल्ह्यासाठी (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) यापुर्वी लागू केलेले […]
शहरात कलम 144 (1)(3) अन्वये मनाई आदेश जारी
प्रकाशित केले: 04/11/2020औरंगाबाद, दिनांक 03 (जिमाका) : औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 (1) (3) अन्वये तसेच महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, नविन मंत्रालय मुंबई यांच्या अधिसुचना अन्वये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 (1) (3) प्रमाणे लागू […]
आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 04/11/2020औरंगाबाद, दिनांक 03 (जिमाका) : केन्द्रीय निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम दि. 2 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर केला असून या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कालावधीत आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी […]
पदवीधर निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांची यंत्रणा सज्ज
प्रकाशित केले: 03/11/2020औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक जाहीर झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी सर्व नोडल अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिकारी यांची बैठक श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अप्पर […]