पत्रक

Filter by:
रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक उपचार सुविधांयुक्त खाटा असणे बंधनकारक - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक उपचार सुविधांयुक्त खाटा असणे बंधनकारक – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

प्रकाशित केले: 15/10/2020

महिला, बाल रुग्णालयसह घाटीतील पदभरतीबाबत लवकरच कार्यवाही करणार, कोरोनातून बरे झाल्यानंतर घ्यावयाच्या खबरदारीबाबत जनजागृती करावी, औरंगाबाद,दि.15 (जिमाका):रुग्णालयांनी ऑक्सीजन, व्हेंटीलेटर सुविधांसह खाटा उपलब्ध ठेवणे हे नियमानुसार बंधनकारक आहे, त्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व रुग्णालयामध्ये पर्याप्त प्रमाणात अत्यावश्यक उपचार सुविधायुक्त खाटा ठेवाव्यात, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिले.             जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना […]

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.अब्दुल कलाम जयंती साजरी

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.अब्दुल कलाम जयंती साजरी

प्रकाशित केले: 15/10/2020

 औरंगाबाद,दि.15 (जिमाका):जिल्हाधिकारी कार्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

छायाचित्र उपलब्ध नाही

सार्वजनिक वाहन चालवतांना वाहन चालकाने मास्क वापरणे बंधनकारक -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 14/10/2020

औरंगाबाद, दि.१३ (जिमाका):- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्व प्रकारची सार्वजनिक वाहने चालवतांना प्रत्येक वाहन चालकाने मास्क घालून वाहन चालवणे बंधनकारक  आहे. सदरील नियमाचे पालन न करणाऱ्या परवाना धारकांविरुध्द नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ,यांनी आज येथे दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक सुनील चव्हाण,  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या […]

‘ मन में है विश्वास’ उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात संपन्न

कोरोनाला हरवण्यासाठी नियमबध्द जीवनशैली स्विकारावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 14/10/2020

‘ मन में है विश्वास’  उपक्रम  जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात संपन्न औरंगाबाद, दि.१३ (जिमाका):-जिल्हयाला कोरोनामुक्त करण्याचे उद्दिष्ट यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी धीराने,धैर्याने आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहीजे. या लढाईत आपण सगळे सोबत आहोत. ‘ मन में है  विश्वास’  या सकारात्मक  जाणिवेतून  सर्वांनी कोरोनाला हरवण्यासाठी नियमबध्द  जीवनशैली स्विकारावी , असेआवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज […]

CollectorSir_12102020

पदवीधर मतदाराला मतदान करतेवेळेस मास्क असणे आवश्यक – ‍जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 13/10/2020

औरंगाबाद, दिनांक 12  (जिमाका) : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबाबत काही आक्षेप असल्यास लेखी आक्षेप नोंदवावेत. त्याचबरोबर इतरही काही सूचना असल्यास थेट कळवाव्यात. तसेच कोविड 19 च्या अनुषंगाने खबरदारीचे उपाय देखील योजन्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रत्येक […]

छायाचित्र उपलब्ध नाही

पदवीधर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करा- डॉ. अनंत गव्हाणे पदवीधर निवडणूक : क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

प्रकाशित केले: 13/10/2020

औरंगाबाद,दि.12 (जिमाका):-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करुन निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडा. मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करा, असे अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय […]

छायाचित्र उपलब्ध नाही

हवामान आधारीत फळपीक विमा योजनेत सहभागासाठी कृषी विभागाचे आवाहन

प्रकाशित केले: 13/10/2020

औरंगाबाद,दि.12 (जिमाका):-पुनर्रचित हवामान आधारीत फळ पीक विमा योजनेत डाळिंब, द्राक्ष, मोसंबी, केळी व आंबा पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई विमा कंपनी काम करणार आहे. शेतकऱ्यांनी फळपिकांच्या हवामान धोक्यांची माहिती करुन घेऊन विहित मुदतीत नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक, वित्तीय संस्था यांच्यांशी संपर्क साधून योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागाने […]

छायाचित्र उपलब्ध नाही

विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक 13 ऑक्टोंबर रोजी

प्रकाशित केले: 13/10/2020

औरंगाबाद,दि.12 (जिमाका):- विभागीय आयुक्त, औरंगाबाद तथा अध्यक्ष, विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांचे अध्यक्षतेखाली विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक दिनांक 13 ऑक्टोंबर 2020 मंगळवार, सकाळी 11.00 वा. विभागीय आयुक्त यांचे दालनात आयोजित करण्यात आलेली आहे, असे सदस्य सचिव विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती तथा उप आयुक्त (महसूल) विभागीय आयुक्त कार्यालय,औरंगाबाद यांनी कळविले आहे. शासन यंत्रणेतील भ्रष्टाचाराचे समूळ […]

Collectorsir_12102020

पर्याप्त प्रमाणात उपचार सुविधा उपलब्ध -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण · रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.38%

प्रकाशित केले: 13/10/2020

औरंगाबाद, दि.12 (जिमाका) :- जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मास्क वापराबाबत अधिक जनजागृती करण्यात येत असून जिल्ह्यात पर्याप्त प्रमाणात कोरोना उपचार सुविधा उपलब्ध असल्याचे  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी समवेतच्या कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते. बैठकीला खा. इम्तियाज जलील, आ.अंबादास दानवे यांच्यासह मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलीस […]

आरोग्य, कृषीसह आवश्यक कामांसाठी पर्याप्त निधी उपलब्ध करुन देणा

आरोग्य, कृषीसह आवश्यक कामांसाठी पर्याप्त निधी उपलब्ध करुन देणार – पालकमंत्री सुभाष देसाई

प्रकाशित केले: 11/10/2020

आरोग्याच्या रिक्त पदभरतीसाठी तसेच  कृषीचा वीजप्रश्न सोडविण्यासाठी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेणार आयुष रुग्णालयासाठी जिल्हाधिकारी यांनी महिन्याच्या आत जागा निश्चित करण्याचे निर्देश औरंगाबाद, दि.09, (जिमाका) :- जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी आरोग्य यंत्रणाच्या बळकटीकरणाला प्राधान्याने निधी उपलध करुन दिला जात आहे. त्याचसोबत कृषी, शिक्षण, ग्रामविकास यासोबत अन्य आवश्यक कामांसाठीही पर्याप्त निधी उपलब्ध करुन दिला जाईल , असे राज्याचे […]