पत्रक

Filter by:
टंचाई काळात पाण्याची कमतरता उद्भवू देऊ नका

टंचाई काळात पाण्याची कमतरता उद्भवू देऊ नका – पालकमंत्री सुभाष देसाई

प्रकाशित केले: 09/10/2020

औरंगाबाद,दि.09 (जिमाका): जिल्ह्यात सध्या मुबलक प्रमाणात पाणी साठा झालेला आहे. सर्व पाणी साठे, प्रकल्प सरासरी 98% भरलेली आहेत. टंचाई काळात पाण्याची कमतरता उद्भवू नये. यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील पाटबंधारे जलाशयातील पिण्याच्या पाण्याची गरजेची निश्चितीबाबत आयोजित बैठकीत श्री. देसाई बोलत होते. […]

छायाचित्र उपलब्ध नाही

राज्य सेवा पूर्व परिक्षा दि.11 ऑक्टोबर रोजी

प्रकाशित केले: 09/10/2020

औरंगाबाद, दि.08 (जि.मा.का.) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रावर जिल्हा राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 रविवार दि. 11 ऑक्टोबर 2020 रोजी दोन सत्रात सकाळी 10 ते 12 आणि सत्र 2 दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत 59 उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. या परिक्षेसाठी 19656 उमेदवारांना […]

छायाचित्र उपलब्ध नाही

बनावट क्रीडा प्रमाणपत्र सादर करणाऱ्या विरुध्द फौजदारी कार्यवाही

प्रकाशित केले: 09/10/2020

औरंगाबाद,दि, 08 :- (जि.मा.का.) ट्रॅम्पोलिन व टंबलिंग क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीबाबत पाच टक्के आरक्षणांतर्गत 262 प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रे, निकालाच्या आधारे पडताळणी केलेली आहे. 1998 ते 2005 कालावधीत विभागीय उपसंचालक कार्यालय औरंगाबाद येथे महाराष्ट्र ॲमॅच्युअर ट्रॅम्पोलीन असोसिएशन यांचे नावे स्पर्धाचे बनावट दस्त सादर करणाऱ्या व्यक्तीविरुध्द फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश क्रीडा आयुक्तांनी दिले असल्याचे क्रीडा उपसंचालक, उर्मिला मोराळे, […]

छायाचित्र उपलब्ध नाही

हॉटेल्स/फुड कोर्टस/रेस्टॉरंट्स्‍ आणि बार रात्री दहापर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी

प्रकाशित केले: 09/10/2020

औरंगाबाद,दि, 08 :- (जि.मा.का.) कोवीड -19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून औरंगाबाद जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांच्याव्दारा फौजदारी  दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) (3)  अन्वये औरंगाबाद जिल्ह्यात (पोलीस आयुक्त शहर औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) 31 ऑक्टोबर 2020 चे  24 वाजेपर्यंत मनाई आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व वाणिज्यक आस्थापना,दुकाने दिनांक 22 […]

छायाचित्र उपलब्ध नाही

निवृत्ती वेतन धारकांना आवाहन

प्रकाशित केले: 08/10/2020

औरंगाबाद, दि.07 (जिमाका):- राज्य शासनाच्या वित्त विभागाने  राज्यशासकीय निवृत्तीवेतन  धारक/ कुटुंब निवृत्तीवेतन  धारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास दि. 31 डिसेंबर पर्यंत  मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच ज्यांचे वय दि. 1 ऑक्टोबर रोजी 80  वर्षे पुर्ण होत आहे. अशा निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दि. 1 ऑक्टोबर 2020  ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत हयातीचा दाखला सादर […]

छायाचित्र उपलब्ध नाही

पालकमंत्री सुभाष देसाई यांचा दौरा कार्यक्रम

प्रकाशित केले: 08/10/2020

औरंगाबाद, दि.07 (जिमाका):- उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतआहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे गुरुवार, दिनांक 8 ऑक्टोबर  रोजी सायंकाळी 7.20 वा मुंबईहून आगमन व शासकीय विश्राम गृहाकडे प्रयाण. सायंकाळी 7.30 वा औरंगाबाद महानगरपालिकतील रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम आणि बढती याबाबत प्रतिनिधीक स्वरुपातील प्रत्येकी पाच कर्मचाऱ्यांचा गौरव कार्यक्रम (स्थळ : औरंगाबाद महानगरपालिका. […]

कोरोनातून बरे होण्याचा विश्वास वाढवण्यासाठी उपक्रमाचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ मन मे है विश्वास ’ उपक्रमाचे 13 रोजी आयोजन

प्रकाशित केले: 08/10/2020

कोरोनातून बरे होण्याचा विश्वास वाढवण्यासाठी उपक्रमाचे आयोजन औरंगाबाद, दि.07 (जिमाका):- जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वाढत असून नागरिकांच्या मनोधैर्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून कोरोना मूक्त झालेल्यांच्या सहकार्याने   मन मे है विश्वास हा नाविन्यपूर्ण उपक्रम  13 ऑक्टोबर रोजी  सकाळी 10 वाजता राबवण्यात येणार आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या उपक्रमाच्या […]

छायाचित्र उपलब्ध नाही

कोविड-19 मुळे नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आवाहन

प्रकाशित केले: 08/10/2020

औरंगाबाद,दि, 07 :- (जि.मा.का.) औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा (कोविड-19) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक  नवरात्रोत्सव  साजरा  करणेबाबत पुढील मार्गदर्शक सूचनानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व जनतेला सार्वजनिक  नवरात्रोत्सव  साजरा करणेबाबत काय करावे आणि काय करु नये याबाबत सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद  यांच्याद्वारे सूचना निर्गमित करण्यात येत  आहेत.   कोविड-19 या विषाणूचा […]

छायाचित्र उपलब्ध नाही

हॉटेल्स/फुड कोर्टस/रेस्टॉरंट्स् आणि बार यांनी मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक

प्रकाशित केले: 08/10/2020

औरंगाबाद, दि.07 (जिमाका):- कोवीड -19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून औरंगाबाद जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांच्याव्दारा फौजदारी  दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) (3)  अन्वये औरंगाबाद जिल्ह्यात (पोलीस आयुक्त शहर औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) 31 ऑक्टोबर 2020 चे  24 वाजेपर्यंत मनाई आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. सदरिल आदेशात नमुद केल्यानुसार हॉटेल्स/फुड कोर्टस/रेस्टॉरंट्स्‍ […]

सांघिक प्रयत्नांतून पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रीया यशस्वीरित्या राबवावी

सांघिक प्रयत्नांतून पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रीया यशस्वीरित्या राबवावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 08/10/2020

औरंगाबाद, दि.07 (जिमाका):- आगामी 5- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 ची अधिसूचना लवकरच जाहीर होईल. त्यादृष्टीने सर्व नोडल अधिकारी आणि संबंधितांनी परस्पर समन्वयाने ही निवडणूक प्रक्रिया सांघिक प्रयत्नांतून यशस्वीरित्या राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 पूर्वतयारी बाबतच्या […]