पत्रक
आय.आय.एच. टी. बरगढ (ओडीशा) येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु
प्रकाशित केले: 06/10/2020औरंगाबाद, दि.05 (जिमाका):-केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्था बरगढ (ओडिशा) येथे सन 2020-21 या शैक्षणिक सत्राकरीता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरीता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील-1 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांचेमार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दि. 09 […]
५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदान केंद्राची प्रारूप यादी प्रसिद्ध
प्रकाशित केले: 06/10/2020हरकती, सूचना सात दिवसात सादर करण्याचे आवाहन औरंगाबाद, दि.05 (जिमाका) :- राज्य सभा आणि राज्य विधान परिषदेसाठीच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशानुसार ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक २०२० करिता मतदान केंद्राची प्रारूप यादी दि.०६ ऑक्टोबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून सदरची यादी औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व […]
जिल्ह्यात आठशे खाटांची वाढ – अपर जिल्हाधिकारी डॉ गव्हाणे
प्रकाशित केले: 06/10/2020• 3008 रेमेडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध औरंगाबाद, दि.05 (जिमाका) :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.69 टक्के झाले आहे. त्याचसोबत उपचार सुविधांमध्ये वाढ करण्यात येत असून जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना खाटा वाढवण्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात आठशे खाटांची वाढ झाल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी […]
सामुहिक प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आवाहन
प्रकाशित केले: 04/10/2020औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका) – कोविड-19 नियंत्रणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी राज्यस्तरीय मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. औरंगाबादला कोविडमुक्त करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारीअंतर्गत लोकचळवळीचा भाग म्हणून जिल्हयातील सर्व नागरिकांनी प्रतिज्ञा घेऊन आपली जबाबदारी पार पाडण्याकरिता ‘सामुहिक प्रतिज्ञा कार्यक्रम’ घेण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. या अनुषंगाने सर्व […]
महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी
प्रकाशित केले: 04/10/2020औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका) – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून महापुरूषांना अभिवादन केले.
नागरी सेवा पूर्व परीक्षा 4 ऑक्टोबर रोजी
प्रकाशित केले: 04/10/2020औरंगाबाद,दि. 1(जिमाका) – संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली मार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रावर नागरी सेवा पूर्व परीक्षा रविवार दि. 4 ऑक्टोबर 2020 रोजी दोन सत्रात घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत तर दुसरे सत्र दु. 14.30 ते 16.30 या कालावधीत होणार आहे. ही परीक्षा औरंगाबाद शहरातील 32 उपकेंद्रावर होणार असल्याचे जिल्हाधिकारी […]
अतिरिक्त बिल आकारणाऱ्या 14 रुग्णालयांना जिल्हाधिकारी यांनी बजावली नोटीस
प्रकाशित केले: 01/10/2020औरंगाबाद,दि.३० (जिमाका) – राज्य शासनाने कोरोना रुग्णावर उपचार करताना रुग्णालयांनी आकारावयाचे दर निश्चित केलेले असून त्यानुसार कोरोना रुग्णांकडून जादा दराने आकारणी करू नये, असे स्पष्ट निर्देश दिलेले आहे . मात्र औरंगाबाद शहरातील 14 हॉस्पिटलने ६५६ कोरोना रुग्णांकडून 62 लाख 33 हजार इतकी जादा रक्कम आकारलेली आहे. त्याबाबत 25 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 14 […]
ग्रामिण भागातील रुग्णांवर वेळेत योग्य उपचार होणे महत्वाचे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 01/10/2020औरंगाबाद, दिनांक 30 (जिमाका) :जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस समाधानकारक वाढ होत असून ग्रामीण भागातील रुग्ण बरे करण्यात त्या रुग्णांना तातडीने त्याच ठिकाणी योग्य उपचार वेळेत मिळणे हा घटक महत्वाचा आहे. त्या दृष्टीने घाटीतील तज्ञांद्वारे ग्रामिण व उपजिल्हा रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहकारी यांना देण्यात येणारे हे प्रशिक्षण उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन
प्रकाशित केले: 01/10/2020औरंगाबाद, दिनांक 30 (जिमाका) : निर्यातक्षम व विष भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेस राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक तालुक्याने एक रोपवाटीका उभारण्याचा लक्षांक आहे. पात्र लाभार्थी महा डी बीटी (maha DBT) किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे 2 ते […]
जिल्ह्यात 26624 कोरोनामुक्त, 5857 रुग्णांवर उपचार सुरू
प्रकाशित केले: 30/09/2020औरंगाबाद, दिनांक 29 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 265जणांना (मनपा 92, ग्रामीण 173) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 26624 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 237 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 33411 झाली आहे. आजपर्यंत एकूण 930 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5857 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टद्वारे […]