पत्रक

Filter by:
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करा

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करा – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

प्रकाशित केले: 30/09/2020

कन्नड, भगूर, मांजरी शिवारात केली पीक नुकसानीची पाहणी औरंगाबाद, दिनांक 29 (जिमाका) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सर्वांनी प्रयत्नपूर्वक यशस्वी करावी, असे आवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.  वैजापूर येथील पंचायत समिती सभागृहात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम अंमलबजावणी आणि पावसामुळे झालेल्या शेतपिकांचे नुकसान […]

माजी सैनिकांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या समर्पित भावनेने सोडवाव्यात

माजी सैनिकांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या समर्पित भावनेने सोडवाव्यात – अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे

प्रकाशित केले: 30/09/2020

औरंगाबाद, दिनांक 29, (जिमाका) – देश सेवेकरिता जिवाची पर्वा न करता विरमरण पत्करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या समस्या प्रशासनाने समर्पित भावनेने सोडवल्यास त्यांच्या सेवेची संधी आपल्याला मिळून त्यांच्या ऋणातून आपल्याला उतराई होता येईल, अशा भावना अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी आज येथे व्यक्त केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आयोजित शौर्य दिनानिमित्त वीरपत्नी, माता, […]

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्ह्यात 26359 कोरोनामुक्त, 5890 रुग्णांवर उपचार सुरू

प्रकाशित केले: 29/09/2020

औरंगाबाद, दिनांक 28 (जिमाका) :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 243 जणांना (मनपा 144, ग्रामीण 99) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 26359 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 181 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 33174 झाली आहे. आजपर्यंत एकूण 925 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5890 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन […]

ॲट्रॉसिटी प्रकरणांचा तपास, कायदेशीर प्रक्रिया तत्परतेने पूर्ण करावी

ॲट्रॉसिटी प्रकरणांचा तपास, कायदेशीर प्रक्रिया तत्परतेने पूर्ण करावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 29/09/2020

औरंगाबाद,दि. 28 (जिमाका) – अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली दाखल ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचा तपास आणि कायदेशीर प्रक्रिया योग्यरित्या तत्परतेने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, खासदार इम्त‍ियाज जलिल, आमदार अतुल सावे, जिल्हा […]

जिल्हाधिकारी कार्यालयात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' सामूहिक प्रतिज्ञेचे वाचन

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सामूहिक प्रतिज्ञेचे वाचन

प्रकाशित केले: 29/09/2020

औरंगाबाद, दि.28 (जिमाका) :- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानातील प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन केले. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, वर्षाराणी भोसले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील […]

बॅकांनी पीक कर्ज वितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करावे

बॅकांनी पीक कर्ज वितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 29/09/2020

औरंगाबाद, दि.28 (जिमाका) :- जिल्हृयातील सर्व पात्र शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज देऊन बॅकांनी पीक कर्ज वितरणाचे शंभर टक्के उद्द्दीष्ट साध्य  करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी  सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बँकांच्या समितीची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकार, बँक ऑफ […]

रेमेडीसीवीर इंजेक्शन आवश्यक प्रमाणात उपलब्ध

रेमेडीसीवीर इंजेक्शन आवश्यक प्रमाणात उपलब्ध – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 29/09/2020

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर 87 टक्क्यांवर औरंगाबाद, दि.28 (जिमाका) :-  जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून  88.87 टक्क्यांवर रुग्ण बरे होण्याचा दर गेला आहे.  प्रशासन प्राधान्याने रुग्ण बरे होण्यासाठी रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सीजन उपलब्धता पूरेशी ठेवण्यासाठी कार्यवाही करत असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी समवेतच्या कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी […]

पीक विम्याबाबत विमा कंपनीला देखील कळवा

पीक विम्याबाबत विमा कंपनीला देखील कळवा : दादाजी भुसे

प्रकाशित केले: 28/09/2020

औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : मागील काही दिवसांत झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे आठवडाभरात करा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले. तसेच या पावसामुळे झालेल्या विमा उतरवलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांचा विमा मिळवण्यासाठी संबंधित कंपनीला लेखी कळवण्याचे आवाहनही  श्री. भुसे यांनी केले. कन्नड तालुक्यातील नागद,  सायगव्हान येथे  शेतकऱ्यांच्या […]

जिल्ह्यातील पिकांचे तातडीने पंचनामे करावीत

जिल्ह्यातील पिकांचे तातडीने पंचनामे करावीत – कृषी मंत्री दादाजी भुसे

प्रकाशित केले: 28/09/2020

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा तातडीने लाभ द्यावा रानभाज्या विक्री व्यवस्था सातत्याने सुरु ठेवावी औरंगाबाद, दि. 26 (जिमाका): औरंगाबाद जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीमूळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसाने झाले आहे. त्या सर्व ठिकाणी तातडीने पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्ह्यातील पाऊस, पीक परिस्थीती आणि कृषी योजना […]

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या द्वारा एमजीएम रुग्णालयातील कोरोना उपचार सुविधांची पाहणी

प्रकाशित केले: 25/09/2020

औरंगाबाद,दि.२५(जिमाका)- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी एमजीएम  रुग्णालयालयास  दि.24 रोजी  भेट देऊन रुग्णालयातील  कोरोना उपचार सुविधांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.  जिल्ह्याचे पालकमंत्री  सुभाष देसाई व लोकप्रतिनिधी यांनी जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयातील कोवीड बेडची संख्या वाढवण्याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील रुग्णालयांना कोवीड बेडची […]