पत्रक
नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
प्रकाशित केले: 25/09/2020औरंगाबाद, दिनांक 25 (जिमाका): मराठवाड्यातील गोदावरी, दुधना, सिंदफना , पूर्णा आदी नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे. वेळोवेळी नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गाची माहिती मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष, औरंगाबाद येथून मिळू शकते. तेथील दूरध्वनी क्र . 0240-2351617 असा आहे, अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली. मराठवाड्यातील जायकवाडी, येलदरी, माजलगाव, निम्न दुधना […]
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
प्रकाशित केले: 25/09/2020औरंगाबाद दि. 25 (जिमाका)—पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षाराणी भोसले, तहसीलदार शीतल राजपूत यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
सोयाबीन पीकाची काळजी घेण्याचे जिल्हा कृषी अधिकारींचे आवाहन
प्रकाशित केले: 24/09/2020औरंगाबाद, दि.24 (जिमाका) :- सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक सुन केंद्र शासनाच्या सुचनांनुसार त्यामध्ये बियाणे बदलाचे प्रमाण 35 टक्के पर्यंत असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात पेरले जाणारे बियाणे हे सरळ वाणांचे असल्याने दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. दरवर्षी नवीन बियाणे घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चामध्ये वाढ होऊन पर्यायाने त्याला आर्थिक लाभ कमी होतो एकदा प्रमाणीत बियाणे वापरल्यानंतर त्याच्या […]
नागरी सेवा पूर्व परिक्षा 4 ऑक्टोंबर रोजी
प्रकाशित केले: 24/09/2020औरंगाबाद,दि. 24 (जिमाका) – संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली मार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रावर नागरी सेवा पूर्व परीक्षा रविवार दि. 4 ऑक्टोंबर 2020 रोजी दोन सत्रात घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत तर दुसरे सत्र दु. 14.30 ते 16.30 या कालावधीत घेणार असुन ही परीक्षा औरंगाबाद शहरातील 32 उपकेंद्रावर होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. या परिक्षेसाठी 11429 उमेदवारांना प्रवेशपत्रे पाठविण्यात आली आहे. या परीक्षेच्या कामासाठी 1623 अधिकारी/कर्मचारी […]
पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडारांचा व्यवहार 30 सप्टेंबरपर्यंत बंद
प्रकाशित केले: 24/09/2020औरंगाबाद, दि.24 (जिमाका) : – पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदणीकृत झालेल्या सर्व मुद्रक ,बांधणीकार व पुस्तक विक्रेते तसेच शैक्षणिक संस्था इत्यादिंना कळविण्यात येते की, दि. 26 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत पुस्तके, कागदची, वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी होणार असल्याने या कालावधीत मंडळाची विभागीय भांडारे गोरेगाव, पुणे, नागपूर, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर, पनवेल व अमरावती येथील सर्व […]
छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
प्रकाशित केले: 24/09/2020औरंगाबाद,दि. 24 (जिमाका) –भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात 30 सप्टेंबर 2020 ते 15 जानेवारी 2021 या कालावधीत सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी कळविले आहे. सदर कार्यक्रमांतर्गत पुर्व पुनरिक्षण […]
नाफेडमार्फत मुग, उडीद खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
प्रकाशित केले: 24/09/2020औरंगाबाद, दिनांक 23 (जिमाका) : केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हंगाम 2020-21 मधे नाफेड मार्फत मुग, उडीद खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन मार्फत जाधववाडी औरंगाबाद, गंगापुर, वैजापुर व खुलताबाद,कन्नड, सोयगाव, येथे तालुका खरेदी विक्री संघामार्फत ऑनलाईन नोंदणी सुरु असुन त्याकरिता शेतकऱ्यांनी आधारकार्ड, झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्स व […]
सामाजिक बांधिलकीतून खाजगी डॉक्टरांनी प्रशासनाला सहकार्य करावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 24/09/2020औरंगाबाद, दि.23 (जिमाका) : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या आपत्ती काळात प्रशासन युध्दपातळीवर कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न करत आहे. रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण लक्षात घेऊन प्रशासनाने खाजगी डॉक्टरांच्या सेवा शासकीय रुग्णालयांसाठी अधिग्रहित केल्या आहेत. त्याव्दारा वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढवणे हा प्रमुख उद्देश असून त्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीतून खाजगी डॉक्टरांनी प्रशासनाला सहकार्य करावे ,असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील […]
सोयाबीन पिकांसाठी शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाचा सल्ला
प्रकाशित केले: 22/09/2020औरंगाबाद, दि.22 (जिमाका) :- मराठवाडा विभागातील सोयाबीनची पेरणी खरीप हंगाम 2020 मध्ये साधारणत: 15 ते 30 जून दरम्यान झालेली आहे. हे पीक सध्या शारीरिक पक्वतेच्या (शेंगा भरलेल्या ) अवस्थेत आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण, कमी सूर्यप्रकाश व पाऊस सुरु असल्यामुळे दिवसाचे तापमान 20 ते 25 डिग्री सेल्सिअस आहे व आर्द्रता 90 […]
पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आजपासून • सेवायोजन नोंदणी करण्याचे आवाहन
प्रकाशित केले: 22/09/2020औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) :जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती केंद्राचे सहायक आयुक्त एन.एन. सूर्यवंशी यांनी दिली. या कार्यालयाकडील औरंगाबाद जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला […]