पत्रक

Filter by:
छायाचित्र उपलब्ध नाही

सेवायोजन नोंदणी कार्ड अद्ययावत करण्यास मुदत वाढ -सहायक आयुक्त

प्रकाशित केले: 22/09/2020

औरंगाबाद, दि.22 (जिमाका) :- जिल्ह्यातील सर्व नोकरी इच्छूक व नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी अद्याप आपले आधार कार्ड संलग्न (लिंक)केले नसेल अशा सर्व उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2020 पर्यत ही प्रक्रिया www.mahaswayam.gov.in  या वेबसाईटवरुन ऑनलाईन पध्दतीने पूर्ण करावी. अन्यथा 30 सप्टेंबर 2020 अखेर सेवायोजन नोंदणी रद्द करण्यात येईल,अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, […]

छायाचित्र उपलब्ध नाही

कृषी औजारे संयंत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

प्रकाशित केले: 22/09/2020

औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत कृषी  औजारे, संयंत्राच्या लाभासाठी 20-21 पासून शेतकऱ्यांनी  ऑनलाईन mahadbtmahait.gov.in   या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे.      संकेतस्थळावर अर्ज सादर करण्याबाबत ‘ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना’ या सदरात सविस्तर माहिती आहे. मान्यताप्राप्त ट्रॅक्टर, पॉवर, टिलर व औजारांची यादी farmech.dac.gov.in  […]

छायाचित्र उपलब्ध नाही

मातंग समाजातील इच्छुकांनी कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

प्रकाशित केले: 22/09/2020

औरंगाबाद, दि.22 (जिमाका) : –  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा मातंग समाजातील 18 ते 50 वयोगटातील इच्छुकांनी 50 हजार प्रकल्प मर्यादा असलेल्या अनुदान योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव 14 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक किसन पवार यांनी केले आहे. प्रस्ताव नमुना (कर्ज मागणी अर्ज) www.slasdc.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, […]

coll

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेतील कोविड केअर केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांची भेट

प्रकाशित केले: 22/09/2020

औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेतील कोविड केअर केंद्रास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि मनपा प्रशासक अस्तिककुमार पांण्डेय यांनी आज भेट देऊन पाहणी केली. भविष्यातील कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन संस्थेत असलेल्या साधनसुविधांची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. या केंद्रात आवश्यक असलेल्या ऑक्सिजन खाटांबाबत, संभाव्य साधन सुविधांबाबबची माहिती मनपा आरोग्य अधिकारी […]

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्ह्यात 24286 कोरोनामुक्त, 5920 रुग्णांवर उपचार सुरू

प्रकाशित केले: 22/09/2020

औरंगाबाद, दिनांक 21 (जिमाका) :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 301 जणांना (मनपा 121, ग्रामीण 180) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 24286 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 31085 झाली आहे. आजपर्यंत एकूण 879 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5920 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन […]

'एकात्मिक बालविकास, बेटी बचाओ' सह 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम यशस्वी करा

‘एकात्मिक बालविकास, बेटी बचाओ’ सह ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वी करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 22/09/2020

औरंगाबाद, दि.21 (जिमाका) : –  एकात्म‍िक बालविकास सेवा, बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनांच्या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास साधावा. त्याचबरोबर शासनाच्या महत्वाकांक्षी अशा ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत सर्वांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून कोविड 19 ला आळा घालण्यास हातभार लावावा. तसेच माझे कुटुंब माझी जबाबादारी मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केले. […]

कोरोना उपचार सुविधासह औषधसाठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध

कोरोना उपचार सुविधासह औषधसाठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 21/09/2020

औरंगाबाद, दि.21 (जिमाका) :-  जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे समाधानकारक असून ते 76.1 टक्के इतके आहे. रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक औषधे, खाटा, ऑक्सीजन पुरवठ्यासह पूरक उपचार सुविधा जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात सध्या उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी समवेतच्या कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. बैठकीला आ. […]

छायाचित्र उपलब्ध नाही

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा – जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण

प्रकाशित केले: 20/09/2020

औरंगाबाद, दि.19 (जिमाका) :-कोविड-19 च्या नियंत्रणासाठी  “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीम उपयुक्त ठरणारी असून या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी यंत्रणांच्या सोबत लोकहभाग महत्त्वाचा  आहे. ‌त्यादृष्टीने सर्वसमावेशकपणे प्रभावीरीत्या मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधितांना आज येथे दिले.             जिल्हाधिकारी कार्यालय येथे  “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीमेच्या अमंलबजावणी बाबत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधितांना निर्देश दिले.  यावेळी […]

छायाचित्र उपलब्ध नाही

संतपीठ जानेवारीपासून सुरु करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

प्रकाशित केले: 20/09/2020

औरंगाबाद,दि.19(जिमाका):- वारकऱ्यांच्या मनातील भावनांना मूर्त स्वरुप देण्याच्या दृष्टीने,  महाराष्ट्राची संत परंपरा जपणारे संतपीठ पैठण नगरीत जानेवारीपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. या संतपिठास जगद्गुरु संत एकनाथांचे नाव असेल, असेही ते म्हणाले.             पैठण येथील प्रस्तावित करण्यात आलेल्या संतपीठ इमारतीत मंत्री श्री. सामंत माध्यमांशी बोलत होते. यावेळी […]

छायाचित्र उपलब्ध नाही

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना शेतकऱ्यांना ठरेल लाभदायक – संदिपान भुमरे

प्रकाशित केले: 18/09/2020

मुंबई,दि.18: राज्याच्या कृषी विभागामार्फत विकेल ते पिकेल या अभियानाचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला.त्याचवेळी त्यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेचाही शुभारंभ केला. ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. श्री.भुमरे म्हणाले,महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर आहे.तसेच मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाचे व्यावसायिक पद्धतीने लागवड करून […]