पत्रक
जिल्ह्यात 23277 कोरोनामुक्त, 6040 रुग्णांवर उपचार सुरू
प्रकाशित केले: 18/09/2020औरंगाबाद, दिनांक 18 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 280 जणांना (मनपा 182, ग्रामीण 98) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 23277 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 313 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30168 झाली आहे. आजपर्यंत एकूण 851 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6040 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन […]
शहर भागात 37(1)(3) कलम लागू
प्रकाशित केले: 18/09/2020औरंगाबाद,दि.18 (जिमाका) — औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या 37 (1) व (3) कलमान्वये जिल्हयाच्या शहरी हद्दीत दिनांक 30 सप्टेंबर 2020 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम
प्रकाशित केले: 18/09/2020औरंगाबाद दि. 18 जिमाका – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे – शुक्रवार, दिनांक 18 रोजी सायं 7 वा विमानाने चिकलठाणा, औरंगाबाद येथे आगमन व सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम. शनिवार, दिनांक 19 रोजी सकाळी 9 […]
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
प्रकाशित केले: 18/09/2020औरंगाबाद, दि.18 (जिमाका) :- केंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्याक समाजातील इ. 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी सन 2020-21 साठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरुन स्वीकारणे सुरु आहे. प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरणे कामी नवीन व नूतणीकरण विद्यार्थ्यांसाठी दि. 31 ऑक्टोबर ही अंतिम मुदत दिली आहे , असे संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण महाराष्ट्र राज्य, […]
शिकाऊ, पक्क्या अनुज्ञप्तीचे कामकाज शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरु
प्रकाशित केले: 18/09/2020औरंगाबाद, दि. 18 (जिमाका):-कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर माहे मार्च 2020 पासून आर. टी. ओ. कार्यालय कार्यालयाचे बहुतांशी कामकाज बंद होते. 22 जून पासून ऑनलाईन आगाऊ अपॉन्टमेंट घेऊन मर्यादीत स्वरुपात कामकाज सुरु करण्यात आलेले आहे. परंतु शिकाऊ तसेच पक्क्या अनुज्ञप्ती साठी आगाऊ ऑनलाईन अपॉन्टमेंट ही साधारणत: तीन आठवड्यानंतरची मिळत आहे. सदर कामकाजाची प्रलंबितता कमी करणे व अर्जदारांना […]
सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ नवीन खाते उघडण्याची विशेष मोहीम
प्रकाशित केले: 18/09/2020औरंगाबाद, दि. 18 (जिमाका):- सुकन्या समृद्धी योजना व पी. पी. एफ नवीन खाते उघडण्याची विशेष मोहीम औरंगाबाद व जालना जिल्हयातील सर्व पोस्ट ऑफिस मध्ये 30 सप्टेंबर 2020 पर्यंत सुरु करण्यात आली आहे. तरी योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करावा किंवा अधिक माहितीसाठी 0240-2334885 या क्रमांकावर संपर्क करावा. नागरिकांनी मुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि उज्ज्वल […]
सेवायोजन नोंदणी कार्ड अद्ययावत करण्यास मुदत वाढ -सहायक आयुक्त
प्रकाशित केले: 18/09/2020औरंगाबाद, दि.18 (जिमाका) :- जिल्ह्यातील सर्व नोकरी इच्छूक व नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी अद्याप आपले आधार कार्ड संलग्न (लिंक)केले नसेल अशा सर्व उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2020 पर्यत ही प्रक्रिया www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन पध्दतीने पूर्ण करावी. अन्यथा 30 सप्टेंबर 2020 अखेर सेवायोजन नोंदणी रद्द करण्यात येईल,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजकार […]
विभागीय माहिती कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमीत्त ध्वजवंदन
प्रकाशित केले: 17/09/2020औरंगाबाद, दि. 17- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ध्वजवंदनाचा कार्यक्रम विभागीय माहिती कार्यालय परिसरात संपन्न झाला. यावेळी मराठवाडा विभागाचे संचालक (माहिती) गणेश रामदासी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी सर्वांनी राष्ट्रीय ध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत म्हटले. […]
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
प्रकाशित केले: 17/09/2020औरंगाबाद,दि. 17 (जिमाका)- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित्त जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करा – पालकमंत्री सुभाष देसाई
प्रकाशित केले: 17/09/2020स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू करा औरंगाबाद, दि.16, (जिमाका) :- जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करुन त्वरीत पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधितांना आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील विविध कामांचा व महानगर पालिके अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा पालकमंत्री सुभाष […]