पत्रक
खाजगी व्यवसाय करणा-या डॉक्टरांच्या सेवा मनपा आरोग्य विभागात अधिग्रहित
प्रकाशित केले: 14/09/2020औरंगाबाद, दि.011 (जिमाका) :- औरंगाबाद शहरात कोरोना (कोव्हीड-19) या विषाणूमुळे जास्त प्रमाणात रुग्ण बाधीत होत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे शहरातील फ्रीलांन्सिग व खाजगी व्यवसाय करणा-या डॉक्टरांची सेवा शासकीय रुग्णालयमध्ये अधिग्रहित करणे आवश्यक झाले आहे. त्याअनुषंगाने सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद आपत्ती व्यवस्थापन अधिनियम […]
खाजगी व्यवसाय करणा-या डॉक्टरांच्या सेवा जिल्हा रुग्णालयात अधिग्रहित औरंगाबाखाजगी व्यवसाय करणा-या डॉक्टरांच्या सेवा जिल्हा रुग्णालयात अधिग्रहित
प्रकाशित केले: 14/09/2020औरंगाबाद, दि.011 (जिमाका) :- औरंगाबाद शहरात कोरोना (कोव्हीड-19) या विषाणूमुळे जास्त प्रमाणात रुग्ण बाधीत होत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे शहरातील फ्रीलांन्सिग व खाजगी व्यवसाय करणा-या डॉक्टरांची सेवा शासकीय रुग्णालयमध्ये अधिग्रहित करणे आवश्यक झाले आहे. त्याअनुषंगाने सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 […]
शासकीय, खाजगी रुग्णालयातील खाटा संनियत्रणासाठी कक्षाची स्थापना
प्रकाशित केले: 11/09/2020औरंगाबाद,दि. 11 (जिमाका) –जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात खाटा उपलब्ध करणे व त्याचे सनियंत्रण करणे, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना माहिती देणे व त्यासंबंधी माहितीचे संवहन करणे यासाठी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशान्वये अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये प्रशांत चौधरी प्र. उपायुक्त पशुसवर्धन मो. […]
बाल शक्ती, बाल कल्याण पुरस्कारासाठी 15 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
प्रकाशित केले: 10/09/2020औरंगाबाद,दि. 10 (जिमाका) – केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर असून सविस्तर माहिती पुढील प्रमाणे. बाल शक्ती पुरस्कार सन 2021 व बालकल्याण पुरस्कार 2021 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने […]
मुख्य सचिव संजय कुमार यांचा दौरा
प्रकाशित केले: 10/09/2020औरंगाबाद,दि. 10 (जिमाका) – मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य संजय कुमार यांचा औरंगाबाद दौरा खालील प्रमाणे राहील. शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 7 वा. पुणे येथून शासकीय वाहनाने पैठणकडे प्रयाण. सकाळी 11 वा. पैठण येथे आगमन. सकाळी 11.30 ते 12.30 पर्यंत पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान, पैठण येथे भेट व पाहणी. दुपारी 12.30 वा […]
कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रबळ उपाय योजना राबविणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 10/09/2020औरंगाबाद,दि. 10 (जिमाका) –जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रबळ अशा उपाय योजना राबविण्यात येत असून त्यादृष्टीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपलब्ध असलेल्या 200 बेड मध्ये अतिरिक्त बेडची वाढ करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी सांगितले. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी चिकलठाणा येथील सामान्य रुग्णालयालयास बुधवार 9 रोजी सायंकाळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. […]
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेतून कोविडबाबत जनप्रबोधन करणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 10/09/2020औरंगाबाद,दि. 10 (जिमाका) – कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देशित केलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात व्यापक स्वरूपात लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून या मोहिमेव्दारा कोविड-19 च्या संसर्गापासून बचाव करण्याच्या प्रतिबंधात्मक बाबींबाबत […]
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
प्रकाशित केले: 09/09/2020औरंगाबाद, दि.09 (जिमाका) :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) औरंगाबाद जिल्हा कार्यालयामार्फत बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले असुन सदर उद्दिष्ट पुर्तीसाठी मातंग समाजातील इच्छुक अर्जदारांकडेन कर्ज मागणी अर्ज मागविण्यात येत आहे, असे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे. अनुदान योजने अंतर्गत (प्रकल्प मर्यादा 50000/-) लाभ घेणाऱ्या मातंग समाजातील […]
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
प्रकाशित केले: 08/09/2020औरंगाबाद, दि.08 (जिमाका) :- प्रत्येक मातेची सुरक्षित प्रसूती व्हावी आणि बालकांचे मृत्यू टाळता यावे म्हणून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून 60 हजार महिलांना सदरील योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थींना लाभ हा थेट हस्तांतरण पद्धतीने (Direct Beneficiary Transfer मार्फत) त्यांच्या वैयक्तीक बँक/पोस्ट ऑफिस खात्यावर जमा करण्यात येतात. सदर […]
रेमडेसिवीर, टॉसीलीझुमॅब विक्रीची नियमित माहिती विक्रेत्यांनी द्यावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 08/09/2020औरंगाबाद, दि.08 (जिमाका) :- कोरोना उपचारांमध्ये रेमडेसिवीर, टॉसिलीझुमॅब या इंजेक्शन्सचा वापर केल्या जात आहे. त्यादृष्टीने त्याची पूरेशी उपलब्धता नियंत्रीत करणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर औषध विक्रेत्यांनी या औषधांच्या विक्रीबाबतची माहिती नियमितपणे अन्न व औषध प्रशासनास द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना औषधविक्री बाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. […]