पत्रक

Filter by:
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते 'प्रतिसाद कक्षाचे' उद्घाटन

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ‘प्रतिसाद कक्षाचे’ उद्घाटन

प्रकाशित केले: 26/08/2020

औरंगाबाद दिनांक 25: औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून कामकाज करीत आहे अशा सर्व अधिकारी, कर्मचारी यांना किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांना कोविड-19 चा संसर्ग झाल्यास त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रतिसाद कक्षाचे’ उद्घाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी  […]

छायाचित्र उपलब्ध नाही

विनामास्क बैठकीस उपस्थित राहणाऱ्यांना जिल्हाधिका-यांनी केले दंडित

प्रकाशित केले: 26/08/2020

औरंगाबाद,दि.25(जिमाका)-  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मास्क परीधान न करणा-यांना  500 रुपये दंड लावून एक मास्क देण्याचा नुकताच आदेश काढला. सदरच्या आदेशाचे पालन होत आहे का नाही यावर स्वत: जिल्हाधिकारी लक्ष ठेवुन आहेत. या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरुच आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी […]

छायाचित्र उपलब्ध नाही

कोविड सेरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष जाहीर औरंगाबाद शहरात 11.81 टक्के लोकांमध्ये आढळली कोविड विरोधी प्रतिद्रव्ये कोविडवर मात करण्यासाठी लोकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 25/08/2020

औरंगाबाद, दि.24 (जिमाका) :- औरंगाबाद शहरात दि. 10 ते 16 ऑगस्ट 2020 या कालावधीत करण्यात आलेल्या  कोविड सेरो सर्वेक्षणात 11.81 टक्के लोकांमध्ये कोविड विरोधी प्रतिद्रव्ये आढळून आली. या सर्वेक्षणामुळे शहरात कोविड रोगाची स्थिती कशी आहे, हे समोर आले असून या रोगाचा समूळ नायनाट करण्यासाठी लोकांनी आता स्वंयशिस्त पाळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मास्कचा वापर, वारंवार […]

जिल्ह्यातील बाजारांच्या गावात कोरोना चाचण्यांवर भर देणार -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

जिल्ह्यातील बाजारांच्या गावात कोरोना चाचण्यांवर भर देणार -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 24/08/2020

औरंगाबाद, दि.24 (जिमाका) :-  कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार ग्रामीण भागात वाढत आहे. या प्रसाराच्या अटकावा करिता जिल्ह्यात 13 बाजारांच्या गावात तत्काळ कोरोना चाचणी करण्यात येणार असून, या चाचणीमुळे निश्चितच कोरोना विषाणुच्या प्रसारास आळा बसेल अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात दर सोमवारी लोकप्रतिनिधी समवेत कोरोना आढावा बैठक घेण्यात येते यावेळी ते बोलत […]

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्ह्यात 15712 कोरोनामुक्त, 4381 रुग्णांवर उपचार सुरू

प्रकाशित केले: 24/08/2020

औरंगाबाद, दिनांक 23 (जिमाका) :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 349 जणांना (मनपा 151, ग्रामीण 198) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 15712 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 288 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20727 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 634 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4381 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सकाळनंतर 131 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 61, मोबाईल स्वॅब कलेक्शन […]

जिल्ह्यातील नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक

जिल्ह्यातील नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 24/08/2020

कोरोना संकट रोखण्यात वैद्यकीय क्षेत्राचा मोठा वाटा डॉक्टरांवरील हल्ले खपवून घेणार नाही औरंगाबाद, दि.21 (जिमाका) :- कोरोना संसर्गाचा प्रसार ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर वेळेत योग्य उपचार व्हावेत, यासाठी संपर्कातील रुग्ण शोधणे, त्यांची चाचणी करणे आणि त्यावर तत्काळ उपचार करणे या त्रिसूत्रीचा वापर करून कोरोना संसर्गाचा अटकावासाठी प्रशासन प्रयत्नरत आहे. शिवाय खबरदारीचा उपाय […]

छायाचित्र उपलब्ध नाही

शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन अथवा विक्रीस प्रतिबंध

प्रकाशित केले: 22/08/2020

औरंगाबाद, दि.21 (जिमाका) :- शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिघाच्या आत तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस प्रतिबंधबाबत निर्देश देणारे फलक लावण्याच्या निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी संबधिताना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक तथा सदस्य सचिव एस.व्ही. कुलकर्णी, अन्न व […]

छायाचित्र उपलब्ध नाही

दिव्यांगासाठी मोफत संगणकीय प्रशिक्षण

प्रकाशित केले: 22/08/2020

औरंगाबाद, दि.21 (जिमाका) :-महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई ची शासन मान्यता असून दिव्यांगासाठी मोफत संगणकीय […]

छायाचित्र उपलब्ध नाही

आयटीआय प्रवेशासाठी अंतिम तारीख 31 ऑगस्ट

प्रकाशित केले: 22/08/2020

औरंगाबाद, दि.21 (जिमाका) :- आय टी आय ऑगस्ट 2020 सत्रासाठी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे व पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्याकरीता शेवटची तारीख 31 ऑगस्ट झाली आहे.या संधीचा प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याची लाभ घ्यावा, असे आवाहन औद्यागिक प्रशिक्षण संस्थेने केले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलींची) भडकल गेट जवळ, औरंगाबाद […]

छायाचित्र उपलब्ध नाही

घाटीचा बाहयरूग्ण विभाग 22 ऑगस्ट रोजी बंद.

प्रकाशित केले: 22/08/2020

औरंगाबाद, दि.21 (जिमाका) :- शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी श्री.गणेश चर्तुर्थी निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे शासकीय महाविदयालय व रुग्णालयाच्या बाहृय रूग्ण विभाग (ओ.पी.डी.) बंद राहील.तसेच रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी ओपीडी नेहमी प्रमाणे चालू ठेवण्यात येईल यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे शासकीय वैद्यकीय महाविदयालचे वैद्यकीय अधिक्षक यांनी कळविले आहे.