पत्रक
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांना यश – प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे
प्रकाशित केले: 18/08/2020गणेशोत्सव काळात गर्दी टाळण्याचे आवाहन औरंगाबाद, दि.17 (जिमाका) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपायोजनांना यश येत आहे. तरी पुढील काळात गाफील न राहता प्रसार पुर्णपणे रोखण्यासाठी अँटीजन चाचण्या वाढविण्यात येतील. त्याच बरोबर सध्याच्या अँटीजेन चाचण्यातील अँटीबॉडीजचा अंतीम अहवाल आल्यास त्यावरुन पुढील दिशा ठरविणे ही उपयुक्त ठरणार असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी […]
विभागीय माहिती कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन
प्रकाशित केले: 15/08/2020औरंगाबाद, दि.15 (जिमाका) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संचालक (माहिती) गणेश रामदासी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजवंदनाच्या वेळी शारिरीक अंतर पाळण्यात आले होते. यावेळी सर्वांनी राष्ट्रीय ध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत […]
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
प्रकाशित केले: 15/08/2020औरंगाबाद, दि.15 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात 13474 कोरोनामुक्त, 4209 रुग्णांवर उपचार सुरू
प्रकाशित केले: 14/08/2020औरंगाबाद, दि.14 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 220 जणांना (मनपा 69, ग्रामीण 151) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 13474 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 292 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18259 झाली आहे. आजपर्यंत एकूण 576 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4209 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुपारनंतर […]
विशेष लेख जिल्हा सदृढ, सक्षम बनवू या आत्मनिर्भर भारताचे शिलेदार होऊ या……
प्रकाशित केले: 14/08/2020भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अनेकांच्या बलिदानातून, असीम शौर्यातून आपल्या स्वातंत्र्याच्या खडतर लढाईला 15 ऑगस्ट 1947 रोजी यश मिळाले. म्हणुनच हा स्वातंत्र्य दिन प्रत्येक भारतीयासांठी, देशाच्या सर्व नागरिकांसाठी आनंदाचा,अभिमानाचा प्रेरणा दिवस आहे. देशभरात दरवर्षी हा स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा केल्या जातो.मात्र यावर्षी कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याचे आव्हान पेलत आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत […]
जिल्ह्यात 4256 रुग्णांवर उपचार सुरू, चार रुग्णांची वाढ
प्रकाशित केले: 14/08/2020औरंगाबाद, दि.14 (जिमाका) : जिल्ह्यातील चार रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 18085 एवढी झाली आहे. त्यापैकी 13254 बरे झाले तर 575 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4256 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) : मनपा (04) एन तीन हडको (1), अन्य […]
नगर रचना कार्यालयाचे जुने, निकामी जडसंग्रह वस्तूबाबत आवाहन
प्रकाशित केले: 14/08/2020औरंगाबाद दि. 14 जिमाका – सहसंचालक, नगर रचना मूल्य निर्धारण, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद, एम.बी.सी.टॉवर, दुसरा मजला, बाबा पेट्रोल पंप जवळ, अदालत रोड, औरंगाबाद (फोन नं. 0240-2334354) या कार्यालयातील जुने व निकामी झालेल्या जडसंग्रह वस्तू (फर्निचर) लिलावाने विक्री करावयाची असल्याने ज्या संस्थेत, व्यक्तीस साहित्य खरेदी करावयाचे असल्यास त्यांनी 17.8.2020 ते 26.8.2020 या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी […]
प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना अस्तित्त्वात नाही – कृषी आयुक्तालय
प्रकाशित केले: 14/08/2020औरंगाबाद दि. 14 जिमाका – प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना अशा आशयाची पोस्ट सध्या समाज माध्यमामध्ये मोठ्याप्रमाणात प्रसारित केली जात असून, त्याव्दारे शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना अशा नावाची कोणतीही योजना अस्तित्त्वात नाही किंवा याबाबत केंद्र शासनाकडून कोणतीही सूचना प्राप्त नाही. सन 2020-21 अतंर्गत राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण […]
लोकवर्गणी जमा करण्यासाठी सहायक धर्मादाय आयुक्तांची पूर्व परवानगी आवश्यक
प्रकाशित केले: 14/08/2020औरंगाबाद दि. 14 जिमाका – जिल्ह्यातील सर्व गणेश उत्सव साजरा करण्यासाठी इच्छुक मंडळाच्या पदाधिकारी यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 वे कलम 41 (क) नुसार धार्मिक व सार्वजनिक स्वरुपाच्या कार्यक्रमाकरीता लोक वर्गणी (देणगी) जमा करावयाची असल्यास सहाय्यक धर्मादाय आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे बंधकनकारक आहे. अशा परवानगी शिवाय (देणगी) वर्गणी जमा करणे बेकायदेशीर आहे. कलम 14 […]
ओबीसी महामंडळाच्या कर्ज प्रस्तावाबाबत आवाहन
प्रकाशित केले: 14/08/2020औरंगाबाद, दि. 13 (जिमाका):- इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीने (ओबीसी) 20 टक्के बीज भांडवल, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा व थेट कर्ज योजनांचे परिपूर्ण प्रस्ताव दोन प्रतीत दाखल करावेत. यावेळी मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी प्रत्यक्ष कार्यालयात सादर केल्याशिवाय कर्ज प्रस्ताव अर्जदाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीकडून स्वीकारले जाणार नाहीत, असे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी […]