पत्रक

Filter by:
छायाचित्र उपलब्ध नाही

घाटीचा बाह्यरुग्ण विभाग 1 ऑगस्टला बंद व 2 ऑगस्टला सुरु

प्रकाशित केले: 01/08/2020

औरंगाबाद, दि.31 (जिमाका) :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय  शनिवार दि. 1 ऑगस्ट रोजी  “बकरी ईद” निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे बंद  राहिल, तसेच रविवार दि. 2 ऑगस्टला बाह्यरुग्ण विभाग सुरु राहील. असे वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद यांनी कळवले आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही

श्रावण महिण्याच्या पार्श्वभूमीवर वेरुळ-खुलताबाद वाहतूकीत बदल

प्रकाशित केले: 01/08/2020

औरंगाबाद दि.31 (जिमाका) :- वेरुळ खुलताबाद ही देवस्थाने सोलापुर-धुळे या  राष्ट्रीय महामार्ग क्र.52 वर असल्याने त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतुक चालु असते. तसेच खुलताबाद ते फुलंब्री या मार्गावर सुध्दा मोठ्या प्रमाणात  वाहनांची वाहतुक चालु असते.श्रावण महिण्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी,यासाठी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी […]

image

खाजगी रुग्णालयातील सर्व रुग्णांनी अॅण्टीजन टेस्टसाठी सहकार्य करावे – उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे

प्रकाशित केले: 01/08/2020

औरंगाबाद,दि.31(जिमाका) – वाळुज व रांजणगाव परिसरातील  कोरोना रुग्ण  वाढीला आळा घालण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत वैद्यकीय तपासणी, अॅण्टीजन टेस्‍ट  सुरू आहे.तरी वाळूज व रांजणगाव परिसरातील सर्व खाजगी रूग्‍णालयातील डॉक्‍टरांनी आपल्या  रूग्‍णालयात दाखल सर्व रूग्‍णांनी अॅण्टीजन टेस्‍ट केली असल्याची खबरदारी घ्यावी.सर्व आजाराच्या रुग्णांनी टेस्ट करून  कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आप्पासाहेब शिंदे, उपजिल्हाधिकारी व  नोडल अधिकारी […]

Collector_Sir_28072020

मका खरेदी साठी अंतिम मुदत ही 30 जुलै किंवा राज्याचे उद्दिष्ट पुर्ण झाल्यास मक्का खरेदी बंद

प्रकाशित केले: 28/07/2020

  औरंगाबाद दि. 28, (जिमाका)- पणन हंगाम 2019 -20 रब्बीमध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य मक्का खरेदीची अंतिम मुदत 30 जुलै किंवा त्यापूर्वी जर मका खरेदी  उदिष्ट पुर्ण झाल्यास त्या संदर्भातील पोर्टल बंद झाले तर 30 जुलै च्या पूर्वी सुद्धा मक्का खरेदी बंद होईल. यापुढे मक्का खरेदी साठी मुदतवाढ मिळणार नसल्याने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी […]

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्ह्यात 3915 रुग्णांवर उपचार सुरु, तीन रुग्णांची वाढ

प्रकाशित केले: 28/07/2020

औरंगाबाद दि. 28, (जिमाका)- जिल्ह्यातील तीन रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 13322 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 8953 बरे झाले, 454 जणांचा मृत्यू झाला. तर 3915 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा जिल्ह्यातील भागांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) मनपा (2)  राम  नगर, एन दोन, सिडको (1) छावणी परिसर (1) ग्रामीण (1)         रचना कॉलनी, वैजापूर […]

DSC

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात होणार “सेरो सर्वेक्षण”- जिल्हाधिकारी उदय चौधरी

प्रकाशित केले: 28/07/2020

औरंगाबाद दि. 28, (जिमाका) – जिल्ह्यात कोरोनामुळे झालेला प्रादुर्भाव लक्षात यावा व त्यादृष्टीने उपाययोजना करण्यास प्रशासनाला मदत व्हावी यासाठी केंद्रीय पथकाच्या शिफारसीनुसार जिल्ह्यात ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात “सेरो सर्वेक्षण” करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी व मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोविड-19 आजाराच्या अनुषंगाने […]

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्ह्यात ३६४१ रुग्णांवर उपचार सुरू, ६६ रुग्णांची वाढ

प्रकाशित केले: 16/07/2020

औरंगाबाद, दि. १६ (जिमाका) : जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या १००५ स्वॅबपैकी ६६ रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत ९५१० कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५४९९ बरे झाले, ३७० जणांचा मृत्यू झाला. तर ३६४१ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण […]

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत खाटांची संख्या वाढवावी

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत खाटांची संख्या वाढवावी – मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे

प्रकाशित केले: 16/07/2020

औरंगाबाद (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अँटीजेन टेस्टिंग वाढवावे, तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत शासकीय तसेच खाजगी रूग्णालयांमध्ये कोरोना बाधित रूग्णांच्या उपचाराकरीता खाटांची संख्या वाढवण्याचे निर्देश महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत शासकीय व खाजगी रूग्णालयांतील […]

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्ह्यात 5229 कोरोनामुक्त, 3227 रुग्णांवर उपचार सुरू

प्रकाशित केले: 14/07/2020

औरंगाबाद, दि. 13 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 168 जणांना (मनपा 122 , ग्रामीण 46 ) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 5229 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 350 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 295, ग्रामीण 55) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8814 झाली आहे. आजपर्यंत एकूण 358 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण […]

Representative Meeting

प्लाझ्मा थेरपीसाठी पाठपुरावा सुरु – जिल्हाधिकारी उदय चौधरी

प्रकाशित केले: 14/07/2020

औरंगाबाद (जिमाका) दि. 13 :- कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन कालावधीचा उपयोग करुण यंत्रणांमार्फत मोठया प्रमाणात सर्वेक्षण व ॲण्टीजन चाचण्या करण्यात येत आहेत .त्याचप्रमाणे घाटीत प्लाझ्मा थेरपी लवकरात लवकर सुरु होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली परवानगी मिळण्यासाठी एनआयव्हीकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधीसोबत कोरोना उपाययोजनांबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी […]