पत्रक
कोरोना बाधित गंभीर रुग्णांना प्रथम प्राधान्याने खाटा उपलब्ध करुन द्याव्यात – जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रकाशित केले: 14/07/2020औरंगाबाद (जिमाका) दि. 13 :- कोरोना संसर्गात बाधित रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या तसेच विशेष त्रास नसणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून अशा रुग्णांवर कोवीड केअर सेंटरमध्ये यशस्वीपणे उपचार केले जात आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयांनी आपल्या खाटा प्रथम प्राधान्याने गंभीर स्थितीतील कोरोना बाधित रुग्णांना उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात […]
लॉकडाऊनमध्ये खतांचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार – जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रकाशित केले: 11/07/2020औरंगाबाद (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात खतांचा पुरवठा लॉकडाऊन कालावधीतही सुरळीतपणे सुरू राहणार असून शेतकऱ्यांना सुलभतेने आवश्यक प्रमाणात खत उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील लॉकडाऊन कालावधीत करण्यात येणाऱ्या खत पुरवठा व वितरणाबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी संबधिताना विविध सूचना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव […]
कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्यावर भर द्या -जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रकाशित केले: 11/07/2020वडगाव कोल्हाटी आरोग्य उपक्रेंद्रास जिल्हाधिकाऱ्यांची भेट औरंगाबाद, दि. 11 (जिमाका) : सर्दी, ताप, खोकला, दम लागणे,श्वास घेण्यास त्रास होत असणाऱ्या व्यक्तींचे नमुने तपासावेत. सर्वेक्षणात वाढ करावी, तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती शोधण्यावर भर द्यावा, अशा सूचना आज जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिल्या. वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव कोल्हाटी आरोग्य उपकेंद्रास श्री. चौधरी यांनी भेट देऊन येथील […]
जिल्ह्यात 4162 कोरोनामुक्त, 3172 रुग्णांवर उपचार सुरू
प्रकाशित केले: 10/07/2020औरंगाबाद, दि. 09 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 129 जणांना (मनपा 85, ग्रामीण 44) सुटी देण्यात आली असून आजपर्यंत 4162 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 334 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 204, ग्रामीण 130) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7672 एवढी झाली आहे. आजपर्यंत 338 जणांचा मृत्यू झाला असल्याने एकूण […]
अंत्योदय अन्न योजनेसह इतर योजनांचे नियतन प्राप्त धान्याचे वाटप 31 जुलै पर्यंत
प्रकाशित केले: 10/07/2020औरंगाबाद (जिमाका) दि 8: औरंगाबाद जिल्ह्यासाठी जुलै महिन्याचे अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना आणि एपीएल शेतकरी योजनेचे नियतन प्राप्त झालेले असून या सर्व योजनांच्या अन्नधान्याची उचल झालेली आहे . तसेच या सर्व योजनांचे धान्य जवळपास सर्व दुकानांवर पोहोचलेले आहे असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने कळविले आहे. जुलै महिन्यासाठीच्या या सर्व योजनांचे धान्याचे वाटप 31 […]
मिशन बिगेन अगेन फेज पाच अंतर्गत जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश
प्रकाशित केले: 10/07/2020कंटेन्मेंट झोन बाहेरील हॉटेल्स, अतिथीगृहे, लॉजेस, उपहारगृहांना अटीं व शर्तींच्या अधीन परवानगी मिशन बिगेन अगेन फेज पाच अंतर्गत जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश औरंगाबाद, दि.8 (जिमाका):- राज्य शासनाने दि. 8 जुलै 2020 पासून मिशन बिगेन अगेन फेज पाच लागू करून हॉटेल्स, अतिथीगृहे, लॉजेस, उपहारगृहे आदी अटी व शर्तीच्या अधीन राहून चालु करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यानुसार औरंगाबाद […]
खासगी रुग्णालयांच्या देयक तपासणीसाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती
प्रकाशित केले: 10/07/2020औरंगाबाद, दि. 08 (जिमाका) :- कोवीड 19 प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खासगी रुग्णालयांकडून आकारली जात असलेली देयके ही अवाजवी स्वरूपात आकारली जाऊ नये असे निर्देशित करण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जात असलेल्या देयकांची तपासणी करण्यासाठी उदय चौधरी, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण औरंगाबाद यांच्या द्वारा लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात […]
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनतेने प्रशासनास सहकार्य करावे – जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रकाशित केले: 10/07/2020औरंगाबाद, दि. 07 (जिमाका) :कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन दिवस रात्र सर्वतोपरी प्रयत्न करत असून जनतेने प्रशासनास सहकार्य करावे. त्यादृष्टीने 10 ते 18 जुलै दरम्यान लावण्यात येणाऱ्या संचारबंदीचे कोटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी उदय चौधरी बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक […]
कारागृहात कोरोनाप्रतिबंधक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात -जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रकाशित केले: 10/07/2020जिल्हाधिकाऱ्यांनी साधला बंदींशी संवाद: जाणुन घेतल्या समस्या औरंगाबाद (जिमाका) दि.5: जिल्हा मध्यवर्ती कारागृहात राबविण्यात येत असलेल्या कोरोनाप्रतिबंधक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात जेणेकरुन कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे सांगितले. हर्सूल कारागृहातील कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांविषयी आढावा घेऊन आवश्यक त्या सुचना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज अचानक कारागृहाला भेट दिली. यावेळी […]
जिल्हाधिकारी यांनी घेतला कोविड केअर सेंटरचा आढावा
प्रकाशित केले: 10/07/2020जिल्हाधिकारी यांनी घेतला कोविड केअर सेंटरचा आढावा • शहरातील 3 सेंटर्सला दिली भेट : कोविड योध्यांचे वाढविले मनोधैर्य • रुग्णांशी साधला संवाद : एमआयटी येथील रिकव्हरी रुमची पाहणी औरंगाबाद (जिमाका) दि.5: जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज शहरातील पद्मपुरा येथील Emergency Operation Center, एमआयटी येथील कोविड केअर सेंटर आणि कांचनवाडी येथील छत्रपती शाहु महाराज संस्थेच्या आयुर्वेदीक […]