पत्रक
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीचे पालन करावे – जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रकाशित केले: 10/07/2020औरंगाबाद, दि.४ (जिमाका): कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन,आरोग्य , पोलिस यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.मात्र तरीही संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वाळूज परिसरात संचारबंदी लावण्यात आली आहे.त्याचे काटेकोरपण पालन करुन जनतेने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे केले. वाळूज औद्योगिक परिसरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक […]
मका पिकावर नव्याने आलेल्या अमेरिकन लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करा – जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रकाशित केले: 08/07/2019औरंगाबाद, दिनांक: 29 (जिमाका) – मका पिकावरील लष्करी अळी अत्यंत विध्वंसक कीड आहे. आफ्रिका खंडासह संपूर्ण भारत, चीन, फिलिपाईन्स या देशामध्ये या किडीने मोठा प्रकोप केला आहे. यामुळे मक्याचे २० ते ६० टक्के नुकसान झाल्याच्या नोंदी आहेत. या किडीचा प्रसार वेगाने होण्यासाठी विविध बाबी कारणीभूत आहेत. तेव्हा कृषी विभागाने सूचविलेल्या उपाययोजना तत्काळ अंमलात आणाव्यात, असे […]
पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न
प्रकाशित केले: 25/06/2019औरंगाबाद, दि.21 (जिमाका) : संयुक्त राष्ट्रसंघाने “21 जुन” हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणुन घोषित केलेला आहे. 5000 वर्षाहून अधिक पंरपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारिरीक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभुत आहे. करीता योग विद्येचा प्रचार व प्रसार करण्याकरीता आज दिनांक 21 जुन रोजी सकाळी 7.00 वा. इन्डोअर हॉल, […]
आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज करण्याचे आवाहन
प्रकाशित केले: 20/06/2019औरंगाबाद, दि 19 (जिमाका): राज्य शासनामार्फत कॉमन सर्विस सेंटर (सेतू सुविधा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व संग्राम केंद्र) यांचे कॉमन ब्रँडिगचा करण्यात आले असून त्यांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ असे नाव देण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शहरी भागातील ६० वार्डासाठी व ग्रामीण भागातील १३ ग्रामपंचायतीसाठी पात्र अर्जदारांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. […]
अल्पसंख्याक विभागाच्या योजनांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
प्रकाशित केले: 18/06/2019औरंगाबाद,दि.17 (जिमाका) – अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा विकास, डॉ. जाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनांचे प्रस्ताव 31 ऑगस्टपर्यंत सादर करावेत. शासन निर्णय व आवश्यक कागदपत्रांची यादी https://mdd.maharashtra.gov.in या संकतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले आहे. ******
मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून अकरा धरणे एकमेकांना जोडणार – बबनराव लोणीकर
प्रकाशित केले: 13/06/2019औरंगाबाद, दि.10 (जि.मा.का.) :- मराठवाड्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पहिला टप्प्यात मराठवाड्यातील अकरा लहान मोठी धरणे एकमेकांना जोडून पिण्याचे पाणी, शेती तसेच उद्योगाला लागणारे पाणी पुरविण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मराठवाड्यातील […]
वृक्षलागवडीच्या चळवळीत जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
प्रकाशित केले: 13/06/2019औरंगाबाद विभागात 9 कोटी 28 लाख 42 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मोहिमेचा कालावधी दि. 1 जुलै ते 30 सप्टेंबर सर्व विभागांनी समन्वयाने ‘मिशनमोड’वर कामे करावी मियावाकी संकल्पनेवर आधारित अटल आनंदवन औरंगाबाद, दि.10, (जिमाका) :- हरित मराठवाडा करण्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने वृक्षलागवडीच्या चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वृक्ष लागवडीसोबतच त्याच्या संगोपनावरही […]
मेल्ट्रॉनमध्ये मतमोजणीचा पूर्वआढावा; मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
प्रकाशित केले: 24/05/2019औरंगाबाद, दि.21 (जि.मा.का.) :- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दि.23 रोजी सकाळी 8 पासून सुरू होणार आहे. मतमोजणीत ऐनवेळी येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणी पूर्व तयारीचा आढावा निवडणूक निरीक्षकांनी आज मेल्ट्रॉनमध्ये घेतला. तसेच आवश्यक त्या सूचनाही संबंधितांना दिल्या. सिपेटमध्ये आज निवडणूक निरीक्षक ब्रजमोहन कुमार, देवेंद्र सिंग यांनी मतमोजणी प्रक्रिया राबवितांना घ्यावयाची काळजी, करावयाची कार्यवाही याबाबत […]
जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज
प्रकाशित केले: 24/05/2019औरंगाबाद, दि.21 (जि.मा.का.) :- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी 7 वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षीत कक्ष (स्ट्राँग रुम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला 8 वाजता सुरूवात होणार असून प्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार आहे. 8.30 वाजता सर्व ईव्हीएम मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात होणार असून […]
बाजारसावंगीतील चारा छावणीमुळे पशुपालकांना मिळतोय दिलासा !
प्रकाशित केले: 16/05/2019औरंगाबाद, दि.13 (जिमाका) : जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्याच्या बाजारसावंगी येथे शासनाच्यावतीने विद्यानंद सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या सहकार्याने चारा छावणी उभारण्यात आली आहे. ही छावणी पशुपालकांना दिलासा देणारी ठरत आहे. अपु-या पावसामुळे पडलेला दुष्काळ आणि या दुष्काळात जनावरांना जगवायचा पडलेला प्रश्न या चारा छावणीमुळे तात्पुरत्या स्वरुपात तरी मिटल्याचे पशुपालक म्हणतात. जिल्ह्यात पशुंना चारा पाणी वेळेवर मिळावा, या उद्देशाने […]