पत्रक
बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक) न्यायाधिकरणासमोर औरंगाबाद खंडपीठात 17 व 18 रोजी सुनावणी
प्रकाशित केले: 14/05/2019औरंगाबाद, दि.10 (जिमाका) :- सिमी संघटनेच्या बंदीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक), न्यायाधिकरणाचा दौरा दिनांक 17 व 18 मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत या प्रकरणी सुनावणी होणार असून न्यायाधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मुक्ता गुप्ता दिनांक 16 मे रोजी औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. या कालावधीत सिमी संघटनेच्या बंदीबाबतच्या […]
अचूक मतपत्रिका निर्गमित केल्याची जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती
प्रकाशित केले: 14/05/2019औरंगाबाद, (जिमाका) दि.10 – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने विविध प्रसार माध्यमातुन व काही संघटनाच्या माध्यमातुन EDC व टपाली मतपत्रिका प्राप्त झाले नसल्याचे तक्रारी विविध वर्तमान पत्रात प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. सदर प्रकरणात वस्तुस्थिती पुढील प्रमाणे मांडण्यात येत आहे. या कार्यालयाकडून सर्व सहायक निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कडुन निवडणुक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण दरम्यान […]
गोपनीय अहवालासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात कॅम्प
प्रकाशित केले: 14/05/2019औरंगाबाद, (जिमाका) दि.10 – औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालय व त्यांचे अधिनस्त असलेले कार्यालयातील अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे सन 2018-2019 या वर्षाचे गोपनीय अहवालाचे प्रतिवेदन व पुनर्विलोकन कॅम्प जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद येथील सभागृहामध्ये दिनांक 11 व 12 आणि 25 व 26 मे रोजी सकाळी 10 ते 5 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कॅम्प सुरळीतपणे […]
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातसरासरी 63.41 टक्के मतदानगंगापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
प्रकाशित केले: 29/04/2019औरंगाबाद, दि. 24 –औरंगाबाद लोकसभा मतदार संघात दि. 23 एप्रिल, 2019 रोजी मतदान प्रक्रिया सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत शांततेत व सुरळीत पार पडली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सरासरी 63.41 टक्के मतदान झाले असुन एकुण 11 लाख 95 हजार 242 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी […]
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान शांततेत अंदाजे एकूण 61.87 टक्के मतदान
प्रकाशित केले: 25/04/2019औरंगाबाद, 23 (जिमाका) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी एकूण 61.87 टक्के मतदान झाले, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपजिल्हाधिकारी […]
मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल
प्रकाशित केले: 25/04/2019औरंगाबाद, दि.23 (जिमाका) : लोकसभा निवडणूक अनुषंगाने आज झालेल्या मतदानाप्रसंगी एका अज्ञात व्यक्तीने मतदान कक्षामध्ये मोबाईलद्वारे चित्रीकरण करुन ते टिकटॉक या मोबाईल ॲप्लीकेशनच्या आधारे सोशल मीडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी सायबर पोलीस विभागाने सदर अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात नियुक्त नायब तहसीलदार सिध्दार्थ धनजकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी […]
लोकशाहीला मजबूत बनविण्यासाठी मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावावा- जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रकाशित केले: 22/04/2019औरंगाबाद- दि 21 (जि मा का) लोकशाही मजबूत बनविण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे आहे. मत आपला अधिकार आहे तशीच आपली जबाबदारी देखील आहे म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. क्रांती चौक येथे आयोजित मतदान जागरूकता सायक्लोथॉन उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालया तर्फे आयोजित RIDE FOR […]
लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सर्वोतोपरी सज्ज-जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रकाशित केले: 22/04/2019प्रशासनाकडून सर्वोतोपरी तयारी, 23 एप्रिलला मतदान मतदारांच्या सुविधांसाठी सर्व उपाययोजना पोलिसांचाही चोख बंदोबस्त औरंगाबाद, दि.21 (जिमाका) : औरंगाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय, नि:पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. मतदारांच्या सुविधांसाठी सर्वोतोपरी उपाययोजना प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या आहेत. मतदारांनी 23 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मतदानाचा हक्क बजावावा, असे […]
परिवहनेत्तर दुचाकीसाठी नवीन क्रमांक मालिका
प्रकाशित केले: 21/04/2019औरंगाबाद, दिनांक २० (जिमाका) – परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी नोंदणी मालिका एम एच 20 एफ एफ ही सद्यस्थितीत सुरू आहे. या मालिकेतील क्रमांकाचे वाटप संपत आलेले आहे. त्या अनुषंगाने परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी एम एच 20 एफ एच 0001 ते 9999 ही मालिका दि. 25 एप्रिल 2018 पासून सुरू करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले […]
शहर भागात 37(1)(3) कलम लागू
प्रकाशित केले: 21/04/2019औरंगाबाद,दि.०५ (जिमाका)- औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या ३७ (१) व (३) कलमान्वये जिल्हयाच्या शहरी हद्दीत दिनांक ३० एप्रिल २०१९ पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे यांनी कळविले आहे. *****