पत्रक
राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित असणे बंधनकारक – भारत निवडणूक आयोग
प्रकाशित केले: 08/04/2019औरंगाबाद, दिनांक ०७ (जिमाका) – मतदानाच्या दिवशी तसेच मतदानाच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. अफवा पसरवणाऱ्या, आक्षेपार्ह स्वरूपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी व त्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध झाल्यास पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे प्रकार […]
निवडणूक निर्भय व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी चोख कायदा व सुव्यवस्था राखावी – अब्दुल समद
प्रकाशित केले: 08/04/2019औरंगाबाद, दि.०६, (जि.मा.का.) :- लोकसभा निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी जो कायदा व सुव्यवस्था राखावी तसेच नियोजित मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील सोयी सुविधा बाबत नियमित आढावा घेण्याचे निर्देश १८-जालना लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक अब्दुल समद यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित 18-जालना लोकसभा मतदारसंघाच्या नोडल अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आढावा […]
ग्रामीण भागात ३७(१)(३) कलम लागू
प्रकाशित केले: 05/04/2019औरंगाबाद,दि.०३ (जिमाका) – औरंगाबाद ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ च्या ३७(१) व (३) कलमान्वये जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत दिनांक १७ एप्रिल २०१९ पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी कळविले आहे. ******
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी परीक्षा ७ एप्रिल रोजी
प्रकाशित केले: 05/04/2019औरंगाबाद, दि.०३ (जि.मा.का.) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, औरंगाबाद जिल्हा केंद्रावर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यादंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-२०१९ रविवार, दि. ०७ एप्रिल २०१९ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत घेण्यात येणार आहे. ही परीक्षा औरंगाबाद शहरातील १७७ उपकेंद्रावर होणार आहे. परीक्षेसाठी ४२०० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे. परीक्ष केंद्रे औरंगाबाद शहरातील असून ती […]
‘सिमी’च्या सदस्यांना नोटीस बजावण्याचे आदेश
प्रकाशित केले: 05/04/2019औरंगाबाद,दि. ०३ (जिमाका) – अवैध कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम १९६७ चे कलम ३ मधील तरतुदीनुसार सिमी संघटनेस अवैध संघटना घोषित करण्याबाबत कार्यवाहीची सुनावणी मा. न्यायाधिकरणासमोर चालू असल्याने या संघटनेच्या सर्व सदस्यांना सदर संघटनेस अवैध (बेकायदेशीर) का घोषित करण्यात येऊ नये याबाबत खुलासा या प्रकरणातील पुढील तारीख १५ एप्रिल २०१९ पूर्वी सादर करण्याबाबत नोटीस तामिल करण्याबाबत […]
मतदानाच्या दिवशी मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी
प्रकाशित केले: 05/04/2019औरंगाबाद, दि.०२ (जि.मा.का.) – भारत निवडणूक आयोगाने दिनांक १० मार्च, २०१९ च्या प्रसिध्दीपत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ चा कार्यक्रम घोषित केला आहे. ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे, त्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे यासाठी त्या लोकसभा मतदारसंघामध्ये पराक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१) चा २६ कलम २५ खाली सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे आवश्यक आहे. त्यानुसार सामान्य […]
निवडणूक निरीक्षक ब्राज मोहन कुमार यांचे आज आगमन
प्रकाशित केले: 05/04/2019औरंगाबाद, दि.०२ (जि.मा.का.) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ अंतर्गत १९-औरंगाबाद लोकसभा मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून श्री.ब्राज मोहन कुमार (आय.ए.एस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षक यांचे दिनांक ३ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी औरंगाबाद शहरात आगमन होणार आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ८२७५७८७८५० हा आरक्षित करण्यात आला आहे. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीलेश श्रींगी यांनी […]
दिव्यांग, गर्भवती, ज्येष्ठांना एनएसएस, स्काऊट गाईडची मदत- उदय चौधरी
प्रकाशित केले: 01/04/2019औरंगाबाद, दि.२५ (जिमाका) – लोकसभा मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांबाहेर दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्तनदा माता, गर्भवती महिलांना अंगणवाडी मदतनीस, सेविका, आशा स्वयंसेविका विशेष काळजी घेणार आहेत. मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदारांना राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), स्काऊट गाईडचे विद्यार्थी सहाय्य करणार आहेत. यासंबंधीच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या […]
एमसीएमसी समितीने जाहिरात प्रमाणीकरणाबरोबरच पेडन्यूज वर ही बारकाईने लक्ष ठेवावे उप जिल्हाधिकारी निलेश श्रींगी
प्रकाशित केले: 01/04/2019औरंगाबाद दि.२६ (जि मा का ) जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीने राजकीय पक्ष व उमेदवारांच्या जाहीरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्याबरोबरच मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमात उमेदवार व राजकीय पक्षाबाबत आलेल्या वृत्त, विशेष वृत्त व लेखा अदि मजकूराची तपासणी करुन त्यातील पेडन्यूज वर बारकाईने लक्ष ठेवावे, उप जिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी निलेश श्रींगी यांनी सूचित […]
मतदान केंद्र परिसरात कलम १४४ लागू
प्रकाशित केले: 01/04/2019औरंगाबाद,दि.२७ (जिमाका)–औरंगाबाद जिल्ह्यामधील निवडणुकीच्या मतदान केंद्र परिसरात मतदान केंद्रावर गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टिकोनातून मतदान केंद्राजवळच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस मोबाईल घेवून जाण्यास व ध्वनीक्षेपके बंद ठेवणे आवश्यक असल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता सन १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. हा आदेश दि. २३.०४.२०१९ पासून मतदान संपेपर्यंत लागू राहील, असे आदेश जिल्हाधिकारी, औरंगाबाद शहर […]