पत्रक
नाथषष्ठी सुट्टीचा निवडणूक कामकाजावर परिणाम नाही -उदय चौधरीनिवडणूक कामकाज २८ मार्च रोजीही सुरू
प्रकाशित केले: 01/04/2019औरंगाबाद, दिनांक २७ (जि.मा.का.) – औरंगाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. गुरुवार, दिनांक २८ रोजी प्रशासनामार्फत पैठण येथील नाथषष्ठी निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी औरंगाबाद लोकसभा निवडणूक कामकाजावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. या दिवशी निवडणूक व नामनिर्देशन पत्रासंबंधीचे कामकाज सुरू राहणार असल्याचे औरंगाबाद लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी […]
निवडणूक खर्च निरीक्षक श्री. चंदनानी यांचे आगमन
प्रकाशित केले: 01/04/2019औरंगाबाद, दिनांक २८ (जि.मा.का.) – भारत निवडणूक आयोगाने दिनांक 10 मार्च 2019 ला प्रसिद्धी पत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०१९ चा कार्यक्रम घोषित केला आहे. सदर कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्यात ४ टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार असून आज दिनांक २८ मार्च २०१९ रोजी नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यास सुरूवात […]
लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे एप्रिल व मे महिन्याचा लोकशाही दिन स्थगित
प्रकाशित केले: 01/04/2019औरंगाबाद, दि.२८ (जिमाका) :- जिल्हा स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते. परंतु सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०१९ निवडणूक कार्यक्रम आदर्श आचार संहिता १० मार्च २०१९ पासुन लागु केलेली असुन ती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच २७ मे २०१९ पर्यंत लागु राहणार असल्याचे निर्देशित केलेले आहे. शासन परिपत्रक दिनांक […]
मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदविण्याबाबत आवाहन
प्रकाशित केले: 01/04/2019औरंगाबाद, दि. ३० (जि.मा.का.) – औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील मतदान दिनांक २३ एप्रिल २०१९ रोजी होणार असल्याचे भारत निवडणूक आयोग यांचेकडून जाहीर करण्यात आले आहे. सदर निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, या हेतूने दिनांक ३१ मार्च २०१९ रोजी सकाळी ५:१५ वाजता Run for democracy मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट येथून […]
वैद्यकीय सवलतीचे १८ अर्ज मान्य
प्रकाशित केले: 01/04/2019औरंगाबाद, दिनांक ३० – लोकसभा निवडणुकीत वैद्यकीय कारणास्तव कामगिरी नको, अशी विनंती जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रशासनाकडे केली होती. यामध्ये जवळपास चारशे ते साडेचारशे अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश होता. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या विनंती अर्जाचा विचार करून अर्ज धारकांना वैद्यकीय मंडळाकडे पाठविले, मंडळाकडे प्राप्त 75 प्रकरणातील 18 विनंती अर्ज मान्य असल्याचे मंडळाने प्रशासनाला सांगितले, अशी […]
मुद्रक, प्रकाशक,पक्ष,उमेदवारांवरनमुना मतपत्रिकेसाठी निर्बंध
प्रकाशित केले: 01/04/2019औरंगाबाद, दि. ३१ (जिमाका) – आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही. निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने, त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी मुद्रणालयाच्या सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने, प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापताना उमेदवाराचे नाव, त्यांना नेमून दिलेले चिन्ह छापणे, नमुना मतपत्रिकेसाठी निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे. कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे […]
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात १४४ कलम
प्रकाशित केले: 01/04/2019औरंगाबाद- दि ३१ (जिमाका) – औरंगाबाद शहर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात आलेले आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे, गाणे म्हणणे, कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रचार करण्यास, वाहनाच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटार वाहने […]
औरंगाबाद जिल्ह्यात तीन हजार ६७ मतदान केंद्रे
प्रकाशित केले: 01/04/2019औरंगाबाद, दि. ३१ (जिमाका) – औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दोन हजार ९५७ मतदान केंद्र होती. विशेष मोहिमेंतर्गत नवीन मतदार नोंदणीचा विचार करून भारत निवडणूक आयोगाने नवीन ११० सहाय्यकारी मतदान केंद्रांना मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण तीन हजार ६७ मतदान केंद्र झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी निलेश श्रिंगी यांनी सांगितले आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दोन हजार ९५७ मतदान केंद्रे […]
लोकशाही सुदृढ व सक्षम बनविण्यासाठी मतदान करा- जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रकाशित केले: 01/04/2019औरंगाबाद- दि ३१ (जि मा का) लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. विद्यापीठ कॅम्पस मधील आंबेडकर महाविद्यालयात आयोजित मतदान जागरूकता मरेथॉन दौडच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालया तर्फे आयोजित RUN […]
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात चार नामनिर्देशन पत्र दाखल
प्रकाशित केले: 01/04/2019औरंगाबाद, दि.०१ (जि.मा.का.) – लोकसभा निवडणुकीसाठी दिनांक ०१ एप्रिल रोजी १९- औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी चार नामनिर्देशन दाखल झालेले आहेत. यामध्ये संगीता निर्मळ, शेख नदिम शेख करीम, तर झांबड सुभाष माणकचंद यांनी दोन असे एकूण चार नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी कळविले आहे. ******