पत्रक
मिशन बिगीन अगेन अतंर्गत 30 सप्टेबर पर्यंतच्या कालावधीसाठी जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश जारी
प्रकाशित केले: 03/09/2020औरंगाबाद, दि.02 (जिमाका) :- शासन आदेशानुसार मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध सुकर करण्यासह लॉकडाऊनचा कालावधी दि. 30 सप्टेबर 2020 च्या मध्यरात्रीपर्यत वाढविण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व फौजदारी दंड प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) मनाई आदेश जारी केले असून हे आदेश यापुढे दिनांक 30 सप्टेबर 2020 चे […]
घाटीतील डॉक्टरांच्या अलगीकरणाबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश निर्गमित
प्रकाशित केले: 03/09/2020औरंगाबाद, दि.02 (जिमाका) :- कोविड – 19 विषाणू प्रादुर्भावात जिल्ह्यातील गंभीर स्थितीतील कोरोना बाधितांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) येथे उपचार केले जात आहेत. हा संसर्गजन्य आजार असून त्या पार्श्वभूमिवर सुनील चव्हाण जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण औरंगाबाद यांनी खबरदारीचा उपाय म्हणून घाटीतील सर्व डॉक्टरांच्या अलगिकरण व्यवस्थेसाठी आदेश निर्गमित केले आहे. त्या आदेशानूसार […]
जेईई परिक्षा 2020 परीक्षा केंद्रांवर कलम 144 लागू
प्रकाशित केले: 02/09/2020औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका) : जेईई परिक्षा 2020 चे आयोजन दि. 1 ते 6 सप्टेंबर 2020 या कालावधीत सकाळी 8 ते 6 वाजेपर्यत ऑनलाईन पध्दतीने औरंगाबाद शहरातील ION DIGITAL ZONE,CHIKALTHANA NEAR CTR MANUFACTURING COMPANY MIDC तसेच BYTEZ S INFORETCH,18 HEMKUNJ/SURANA NAGAR, JALNA ROAD AURANGABAD या उपकेंद्रावर करण्यात आले आहे. या परीक्षा कालावधीत औरंगाबाद परिसरात कायदा व […]
शहर भागात 37(1)(3) कलम लागू
प्रकाशित केले: 02/09/2020औरंगाबाद, दि.01 (जिमाका) :- औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या 37 (1) व (3) कलमान्वये औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दिनांक 1 ते 15 सप्टेंबर 2020 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे उप आयुक्त, (मुख्यालय) औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.
परिवहनेत्तर दुचाकीसाठी नवीन क्रमांक मालिका
प्रकाशित केले: 01/09/2020औरंगाबाद, दिनांक 31 (जिमाका) – परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी नोंदणी मालिका एम एच 20 एफ क्यू ही सद्यस्थितीत सुरू आहे. या मालिकेतील क्रमांकाचे वाटप संपत आलेले आहे. त्या अनुषंगाने परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी एम एच 20 एफ आर 1 ते 9999 ही मालिका दि. 7 सप्टेंबर 2020 पासून सुरू करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. ज्या वाहनधारकांना पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, सदरील आकर्षक क्रमांकाला […]
वाल्मी संस्थेला गतवैभव प्राप्त करुन द्यावे – जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख
प्रकाशित केले: 01/09/2020मृद व जलसंधारण आयुक्त कार्यालय बळकटीकरणास प्राधान्य औरंगाबाद,दि. 31 (जिमाका) – जल व भूमी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात वाल्मी या संस्थेचे योगदान उल्लेखनीय राहीलेले आहे. त्या पार्श्वभुमीवर या संस्थेला गतवैभव प्राप्त करुन देत ते वृद्धीगंत करण्याच्या दृष्टीने सर्वांनी अधिक सक्रियतेने काम करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे दिले. पैठण रोड कांचनवाडी […]
विना मास्क मॉर्निग वॉक करणाऱ्यांना प्रशासनातर्फे सक्त ताकीद: नियमांचे पालन न केल्यास गुन्हा नोंदवणार
प्रकाशित केले: 31/08/2020विद्यापीठ परिसरात प्रशासनातर्फे नागरिकांमध्ये जनजागृती औरंगाबाद, दि. 30 (जिमाका) : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. ह्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी हात वारंवार धुणे, शारीरिक अंतर ठेवण आणि मास्क परिधान करणे ही त्रिसुची अत्यंत महत्वाची आहे. नागरिकांनी दैनंदिन जीवनात ह्या त्रिसुचीचा वापर करावा यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण स्वत: प्रयत्नशील आहेत. याचाच एक भाग म्हणून […]
‘आपण समाजाचे देणे लागतो’ या भुमिकेतून रुग्णालयांनी उपचार करावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 31/08/2020· डॉ. हेडगेवार, धूत, कमलनयन बजाज रुग्णालयांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी · बिले तपासणी पथकांव्दारे बिले तपासणी अचुक करण्याचे निर्देश · ‘समथिंग गिव्ह बॅक टू सोसायटी’ ही लोकचळवळ उभा करण्याचा मानस औरंगाबाद,दि.30 (जिमाका) –कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी या संकटाचा वैज्ञानिक दृष्टीने सामना करणे आवश्यक आहे. त्यासाठी गुणवत्तापुर्वक काम करण्यावर आपला भर असून रुग्णालयांनी ‘आपण समाजाला परत देणे लागतो’ […]
सर्दी, ताप, खोकल्याची औषधे घेणाऱ्यांची माहिती औषध विक्रेत्यांनी नियमितपणे मनपाला द्यावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 28/08/2020औरंगाबाद,दि.28 (जिमाका) – जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यामध्ये प्रत्येकाची भूमिका महत्वाची आहे. बऱ्याच ठिकाणी नागरिक सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास झाल्यास स्थानिक डॉक्टरांकडे दाखवून औषध खरेदी करतात. मात्र अशा लक्षणातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकारच्या त्रासासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन प्रमाणे औषध खरेदी करणाऱ्यांची माहिती औषध विक्रेत्यांनी नियमितपणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडे देण्याबाबत जिल्हाधिकारी सुनील […]
जिल्ह्यात 16979 कोरोनामुक्त, 4534 रुग्णांवर उपचार सुरू
प्रकाशित केले: 28/08/2020औरंगाबाद, दिनांक 27 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 266 जणांना (मनपा 178, ग्रामीण 88) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 16979 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 426 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22185 झाली आहे. आजपर्यंत एकूण 672 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4534 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सकाळनंतर […]